भाजपचा शनिवारी होणारा मोर्चा ऐनवेळी स्थगित, कार्यकर्त्यांना नोटीसा देऊन अडचणीत आणण्याचा प्रयत्न-भाजप

भाजपचा शनिवारी होणारा मोर्चा ऐनवेळी स्थगित, कार्यकर्त्यांना नोटीसा देऊन अडचणीत आणण्याचा प्रयत्न-भाजप
भाजपचा मोर्चा ऐनवेळी स्थगित

आमचा कार्यकर्ता अडचणीत येऊ नये यासाठी हा मोर्चा आम्ही स्थगित केला आहे. परवानगीसाठी प्रयत्न करणार आणि मोर्चा काढणार अशी माहिती भाजप आमदार रविंद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांनी दिली आहे.

अमजद खान

| Edited By: दादासाहेब कारंडे

Jan 28, 2022 | 8:24 PM

कल्याण : सरकार आणि पोलिसांच्या विरोधात शनिवारी भाजपकडून (Bjp) मोर्चा काढण्यात येणार होता. मात्र हा मोर्चा स्थगित करण्यात आला आहे. मोर्चाच्या पाश्र्वभूमीवर पोलिसांकडून नोटीसा पाठवून अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. आमचा कार्यकर्ता अडचणीत येऊ नये यासाठी हा मोर्चा आम्ही स्थगित केला आहे. परवानगीसाठी प्रयत्न करणार आणि मोर्चा काढणार अशी माहिती भाजप आमदार रविंद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांनी दिली आहे. दोन मोठे मोर्चे ऐन वेळी स्थगित करण्यात कल्याण डोंबिवलीत (Kalyan-dombivli) भाजपमध्ये चालले आहे काय असा प्रश्न उपस्थित होत आहे. भाजपचे माजी नगरसेवक मनोज राय, सचिन खेमा आणि भाजपला समर्थन देणारे अपक्ष नगरसेवक कुणाल पाटील यांच्या विरोधात विविध पोलिस ठाण्यात गुन्हे दाखळ करण्यात आले आहेत. भाजप नगरसेवकांच्या विरोधात दबाव तंत्र आण्यासाठी महाविकास आघाडी सरकार  पोलिसांचा वापर करुन खोटेनाटे गुन्हे दाखल करण्याचा आरोप भाजप कडून करण्यात आला.

पोलीस कार्यालयावर मोर्चा काढणार

भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार यांनी याच्या निषेधार्थ 29 जानेवारीला भाजपकडून विशाल मोर्चा पोलिस कार्यालयावर काढण्याचा घोषणा केली. यासाठी भाजपने संपूर्ण तयारी सुरु केली. कार्यकत्र्यांनी या मोर्चासाठी जास्त जास्तीत जास्त कार्यकर्ते सहभागी व्हावे यासाठी बैठका घेतल्या. मात्र आज भाजप प्रदेश सरचिटणीस माजी मंत्री आणि आमदार रविंद्र चव्हाण यांनी पत्रकार परिषद घेत हा मोर्चा तात्पुरता स्थगित करण्याचा निर्णय घेतला. या वेळी भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार, जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे हे देखील उपस्थित होते.

रविंद्र चव्हाण यांचे म्हणणे आहे की, भाजपच्या एक हजार कार्यकत्र्यांना पोलिसांनी नोटिस पाठविली आहे.  आंदोलन केले गेले तर भाजप कार्यकर्ते अडचणीत येतील. आमचे कार्यकर्ते अडचणीत येऊ नये यासाठी हा मोर्चा तात्पुरता स्थगित केला आहे. मोर्चासाठी परवानगी मागणार आहोत. परवानगी मिळाली की, हा मोर्चा काढला जाणार आहे. मात्र आमदार चव्हाण यांनी मोर्चा स्थगित करण्याचा निर्णय हा दुसऱ्यांदा घेतला आहे. काही महिन्यापूर्वी घनकचरा करा संदर्भात आयोजित विशाल मोर्चा ऐनवेळी स्थगित करण्यात आला. आत्ता पोलिस आणि सरकार विरोधातील नियोजित मोर्च स्थगित करण्यात आला आहे.

VIDEO: तर तालिका अध्यक्ष म्हणून सभागृहात बसणार नाही; भास्कर जाधवांची मोठी घोषणा

कोर्टाचे दोन वेगवेगळे न्याय कसे असू शकतात?; अनिल परब म्हणाले, निकालाचा अभ्यास करून निर्णय घेऊ

राज्यपालांनी हे सरकार बरखास्त करावे, भाजपनंतर आता संभाजी भिडेही खवळले

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें