राज्यातील 75 हजार बुथवर ‘मन की बात’ होणार, महाराष्ट्रात कमबॅकसाठी भाजपचा प्लॅन काय? वाचा

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Modi) यांच्या 30 जानेवारी रोजी होणाऱ्या मन की बात (Man ki Bat) निमित्त राज्यातील भारतीय जनता पार्टीच्या 75 हजार बुथवर कार्यक्रम होणार आहेत,

राज्यातील 75 हजार बुथवर 'मन की बात' होणार, महाराष्ट्रात कमबॅकसाठी भाजपचा प्लॅन काय? वाचा
मन की बात बाबत प्रसाद लाड यांची माहिती
Follow us
| Updated on: Jan 28, 2022 | 9:52 PM

दादासाहेब कारंडे, प्रतिनिधी, मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Modi) यांच्या 30 जानेवारी रोजी होणाऱ्या मन की बात (Man ki Bat) निमित्त राज्यातील भारतीय जनता पार्टीच्या 75 हजार बुथवर कार्यक्रम होणार आहेत, अशी माहिती भारतीय जनता पार्टीचे प्रदेश (Bjp) उपाध्यक्ष व या कार्यक्रमाचे संयोजक प्रसाद लाड यांनी शुक्रवारी दिली. भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. मन की बात कार्यक्रम समाजातील शेतकरी, माजी सैनिक, वकील, डॉक्टर, ऊसतोड कामगार यांच्यापर्यंत पंतप्रधान मोदींचा थेट संवाद पोहोचावा यासाठी हा प्लॅन भाजपकडून करण्याात आला आहे. येत्या काही दिवसातच मुंबई महापालिकेसह राज्यात इतर महापालिकांच्या निवडणुका होणार आहेत, काही जिल्हा परिषदेच्या निवडणुकाही होणार आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवर पक्ष संघटनेला मजबूत करण्यासाठी भाजपकडून प्रयत्न सुरू आहेत.

मन की बात साठी भाजपची विषेश बैठक

लाड यांनी सांगितले की , मन की बात कार्यक्रम पक्षाच्या सर्व बूथ वर ऐकला जावा असा निर्णय प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रीय सरचिटणीस व या कार्यक्रमाचे राज्य प्रभारी विनोद तावडे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत नुकताच घेण्यात आला. त्यासाठी राज्यस्तरीय संयोजन समिती स्थापन केली गेली आहे. या समितीचे प्रवीण घुगे हे सहसंयोजक असून या समितीत आ. संजय कुटे, राजेश बकाणे, इद्रिस मुलतानी, चैतन्य देशमुख, बबनराव चौधरी, बाळासाहेब सानप, प्रमोद जठार, संदीप लेले, अमित गोरखे, संजय उपाध्याय यांचा समावेश आहे.

सर्व घटकांपर्यंत पोहोचण्यासाठी उपक्रम

मन की बात कार्यक्रम समाजातील शेतकरी, माजी सैनिक, वकील, डॉक्टर, ऊसतोड कामगार या वर्गापर्यंत पोहचविण्यासाठी पक्षाचे कार्यकर्ते विशेष प्रयत्न करणार आहेत. यावेळी प्रत्येक बूथ समितीची बैठकही होणार आहे. या बैठकीत संघटनात्मक कार्याचा आढावाही घेतला जाईल, असे आ. लाड यांनी नमूद केले. मोदींचा मन की बात हा कार्यक्रम आजपर्यंत चांगलाच गाजला आहे. मन की बात कार्यक्रमातून मोदी थेट संवाद साधत असतात, त्यामुळे त्यांचा मोठा प्रभाव पडतो. याची मदत भाजपला नक्कीच होणार आहे.

अनूसूचित जाती जमातींच्या पदोन्नतीतील आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयाचे शिक्कामोर्तब, नेमका निर्णय काय? वाचा सविस्तर

Kidney Stones: कोणतेही ऑपरेशन न करता सहज गळून जाईल किडनी स्टोन! या रसांचे करा नेहमी सेवन

Kalyan : बांधकाम परवानगीमधील अनियमितता केडीएमसीच्या पाच माजी आयुक्तांसह 18 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Non Stop LIVE Update
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास.
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?.
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.