Kalyan : बांधकाम परवानगीमधील अनियमितता केडीएमसीच्या पाच माजी आयुक्तांसह 18 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Kalyan : बांधकाम परवानगीमधील अनियमितता केडीएमसीच्या पाच माजी आयुक्तांसह 18 जणांविरुद्ध गुन्हा दाखल
बांधकाम परवानगीमधील अनियमितता केडीएमसीच्या पाच माजी आयुक्तांसह 18 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

माणिक कॉलनीतील एक इमारत 2010 मध्ये तर 2012-13 मध्ये दुसरी इमारत पाडण्यात आली होती. कल्याण पश्चिमेकडील माणिक कॉलनी इमारत पुनर्वसन प्रकरणी केडीएमसी अधिकारी, कर्मचाऱ्यांनी विकासकाशी संगनमत करून सर्व नियमांचे उल्लंघन केले आहे.

अमजद खान

| Edited By: वैजंता गोगावले, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

Jan 28, 2022 | 8:54 PM

कल्याण : इमारतीचा पुनर्विकास प्रकरणी फसवणूक आणि अनियमितता झाल्याचा ठपका ठेवत केडीएमसीच्या पाच माजी महापालिका आयुक्तां(Ex Commissioner)सह बिल्डर व आर्किटेक्ट अशा तब्बल 18 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कल्याण पश्चिमेकडील माणिक कॉलनी(Manik Colony)तील इमारतींच्या पुनर्विकास प्रकल्पातील फसवणूक प्रकरणी कल्याणच्या बाजार पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कल्याण न्यायालयाच्या आदेशानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणी पोलिस पुढील तपास करत आहेत. गोविंद राठोड, रामनाथ सोनवणे, एसएस भिसे, ई रवींद्रन, गोविंद बोडके अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या माजी आयुक्तांची नावे आहेत. तत्कालीन नगरसेवक अरुण गिध यांनी याबाबत तक्रार दाखल केली होती. (Irregularities in building permits have been registered against 18 persons, including five former KDMC commissioners)

नगरसेवक अरुण गिध यांच्या तक्रारीनंतर न्यायालयाने दिले आदेश

माणिक कॉलनीतील एक इमारत 2010 मध्ये तर 2012-13 मध्ये दुसरी इमारत पाडण्यात आली होती. कल्याण पश्चिमेकडील माणिक कॉलनी इमारत पुनर्वसन प्रकरणी केडीएमसी अधिकारी, कर्मचाऱ्यांनी विकासकाशी संगनमत करून सर्व नियमांचे उल्लंघन केले आहे. निर्धारित नियमांचे उल्लंघन करत मालमत्तेच्या विकासास परवानगी दिली असल्याचा आरोप तत्कालीन नगरसेवक अरुण गिध यांनी केला आहे. याबाबत गिध यांनी केडीएमसीसह पोलिसांनाही या प्रकरणाची माहिती दिली होती. मात्र काहीच कारवाई न झाल्याने अखेर गिध यांनी न्यायालयात धाव घेतली होती. अखेर न्यायालयाने या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिलेत.

विविध कलमांन्वये गुन्हे दाखल

न्यायालयाच्या आदेशानंतर कल्याण बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी गोविंद राठोड, रामनाथ सोनवणे, एसएस भिसे, ई रवींद्रन, गोविंद बोडके या पाच तत्कालीन केडीएमसी आयुक्तांसह, केडीएमसी अधिकारी, संबंधित विकासक, आर्किटेक्ट अशा 18 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सर्व आरोपींवर कलम 420, 418, 415, 467, 448, 120 बी, 34, 9, 13 अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याप्रकरणी पुढील तपास सुरू असल्याचे बाजारपेठ पोलिसांनी सांगितले.

इतर बातम्या

Nanded Crime : नांदेडमधील अल्पवयीन मुलीवर गुजरातमध्ये नेऊन लैंगिक अत्याचार, आरोपी अटक

WhatsApp group | आता व्हॅाट्सॲप ग्रुप ॲडमीनची ‘पॅावर’ वाढणार; म्हणजे मॅसेजबाबत नेमकं काय होणार?

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें