Nanded Crime : नांदेडमधील अल्पवयीन मुलीवर गुजरातमध्ये नेऊन लैंगिक अत्याचार, आरोपी अटक

मुलीच्या वडिलांच्या तक्रारीनुसार पोलिसांनी फोन रेकॉर्डिंग, खबऱ्यांकडून मिळालेली माहिती आणि फोन ट्रेसिंग करीत या अपहरणाचा शोध लावला. या दरम्यान अपहरण केलेल्या अल्पवयीन मुलीशी आरोपीने शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याने आरोपीवर पोस्को सहित अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Nanded Crime : नांदेडमधील अल्पवयीन मुलीवर गुजरातमध्ये नेऊन लैंगिक अत्याचार, आरोपी अटक
प्रातिनिधीक फोटो
Follow us
| Updated on: Jan 28, 2022 | 8:20 PM

नांदेड : नांदेडमधून एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर लैंगिक अत्याचार(Rape) केल्याप्रकरणी एका आरोपीला भाग्यनगर पोलिसांनी अटक केली आहे. संतोष भंडारे(Santosh Bhandare) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचेना नाव आहे. संतोष हा पेशाने कार ड्रायव्हर आहे. संतोषने पीडित मुलीचे आधी अपहरण केले. त्यानंतर तिला गुजरातमधील अहमदाबाद शहरात घेऊन गेला. तिथे तिच्यासोबत शारिरीक संबंध प्रस्थापित केले. याप्रकरणी मुलीच्या वडिलांनी भाग्यनगर पोलीस ठाण्यात मुलीच्या अपहरणाची तक्रार दाखल केली होती. तक्रारीनुसार पोलिसांनी कारवाई करीत आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. आरोपीवर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. आरोपीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने चार दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. (Accused arrested for sexually abusing a minor girl from Nanded)

फोन ट्रेसिंगद्वारे आरोपीचा शोध घेतला

नांदेडमधील कंधार तालुक्यातील बहादरपुरा येथे व्यवसायाने कार ड्रायव्हर असलेल्या संतोष भंडारे याने नांदेड शहरातील एका मुलीचे अपहरण केले होते. त्यानंतर गुजरातमध्ये नेत तिच्याशी शरीरसंबंध प्रस्थापित केले. मुलीच्या वडिलांच्या तक्रारीनुसार पोलिसांनी फोन रेकॉर्डिंग, खबऱ्यांकडून मिळालेली माहिती आणि फोन ट्रेसिंग करीत या अपहरणाचा शोध लावला. या दरम्यान अपहरण केलेल्या अल्पवयीन मुलीशी आरोपीने शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याने आरोपीवर पोस्को सहित अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दिल्लीत महिलेवर सामूहिक बलात्कार

पूर्ववैमनस्यातून एका महिलेवर सामूहिक बलात्कार करुन पीडितेची धिंड काढल्याची धक्कादायक घटना दिल्लीत घडली आहे. धक्कादायक महिलेवर बलात्कार होत असताना तेथे काही महिलाही उपस्थित होत्या आणि या महिला बलात्काऱ्यांना बलात्कार करण्यास प्रोत्साहन देत होत्या. याप्रकरणी आतापर्यंत नऊ आरोपींना अटक करण्यात आली आहे. महिलेचा धिंड काढल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यानंतर दिल्ली महिला आयोगाने पोलिसांना नोटीस जारी केली होती. अटक केलेल्या आरोपींमध्ये सात महिलांचा समावेश आहे.

पीडित महिलेचे आधी अपहरण करण्यात आले मग तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला होता. अपहरण करणारा आरोपी हा महिलेच्या आईच्या घराजवळ राहत असून पीडित महिला आणि सदर आरोपी आधी एकमेकांचे मित्र होते. पोलिसांच्या माहितीनुसार आरोपीच्या घरातील एका तरुणाने वर्षभरापूर्वी आत्महत्या केली होती. या आत्महत्येला पीडित महिला जबाबदार असल्याचे तरुणाच्या घरच्यांचे मत होते. यामुळेच सूडाच्या भावनेतून महिलेसोबत हे कृत्य करण्यात आले. (Accused arrested for sexually abusing a minor girl from Nanded)

इतर बातम्या

WhatsApp group | आता व्हॅाट्सॲप ग्रुप ॲडमीनची ‘पॅावर’ वाढणार; म्हणजे मॅसेजबाबत नेमकं काय होणार?

Mumbai Crime : मुंबईतून 8 कोटींच्या सोन्याची चोरी, राजस्थानमध्ये खड्ड्यात पुरलं, मुंबई पोलिसांकडून 10 जणांना अटक

Non Stop LIVE Update
ठाकरे गट 'इतक्या' जागा लढणार? 36 पैकी ‘या’ 25 मतदारसंघासाठी आग्रही
ठाकरे गट 'इतक्या' जागा लढणार? 36 पैकी ‘या’ 25 मतदारसंघासाठी आग्रही.
मुलाला आत्महत्येपूर्वी व्हिडीओ कॉल अन्...सी-लिंकवरून त्यानं घेतली उडी
मुलाला आत्महत्येपूर्वी व्हिडीओ कॉल अन्...सी-लिंकवरून त्यानं घेतली उडी.
राऊतांचा थेट मुख्यमंत्र्यांना सवाल, शिंदेंच्या बहिणीचं, सुनेचं घर...
राऊतांचा थेट मुख्यमंत्र्यांना सवाल, शिंदेंच्या बहिणीचं, सुनेचं घर....
लोकलमधून उतरताच प्लॅटफॉर्मवरून प्रवाशी धावत सुटले... अंधेरी स्थानकात..
लोकलमधून उतरताच प्लॅटफॉर्मवरून प्रवाशी धावत सुटले... अंधेरी स्थानकात...
राज्यात पुन्हा पावसाची बॅटिंग, आज कुठे कसा पडणार पाऊस? बघा IMDचा अंदाज
राज्यात पुन्हा पावसाची बॅटिंग, आज कुठे कसा पडणार पाऊस? बघा IMDचा अंदाज.
आंदोलन होतं विशाळगडासाठी, टार्गेट झालं गजापूर, नेमका कोणी घातला धुडगूस
आंदोलन होतं विशाळगडासाठी, टार्गेट झालं गजापूर, नेमका कोणी घातला धुडगूस.
मनोज जरांगेंचा पुन्हा फडणवीसांवर निशाणा, आंबेडकरांच्या भूमिकेवरही सवाल
मनोज जरांगेंचा पुन्हा फडणवीसांवर निशाणा, आंबेडकरांच्या भूमिकेवरही सवाल.
बहिणीनंतर भाऊही लाडके...शिंदेंकडून नव्या योजना, कोण पात्र अन् अटी काय?
बहिणीनंतर भाऊही लाडके...शिंदेंकडून नव्या योजना, कोण पात्र अन् अटी काय?.
शिवकालीन वाघनखं लंडनहून महाराष्ट्रात दाखल, कधी-कुठे पाहता येणार?
शिवकालीन वाघनखं लंडनहून महाराष्ट्रात दाखल, कधी-कुठे पाहता येणार?.
आता तरूणांसाठी शिंदेंकडून मोठी घोषणा, दरमहा कोणाला किती पैसे मिळणार?
आता तरूणांसाठी शिंदेंकडून मोठी घोषणा, दरमहा कोणाला किती पैसे मिळणार?.