जवळच्यांनीच घात केला, भय्यू महाराज आत्महत्याप्रकरणी तिघांना सहा वर्षाची शिक्षा

जवळच्यांनीच घात केला, भय्यू महाराज आत्महत्याप्रकरणी तिघांना सहा वर्षाची शिक्षा
bhayyu maharaj

महाराष्ट्रासह देशात ज्या आत्हत्येमुळे खळबळ उडाली होती, त्या भय्यू महाराज यांच्या आत्महत्येप्रकरणी आता तिघांना दोषी ठरवून सहा सहा वर्षाची शिक्षा ठोठविण्यात आली आहे. इंदौर न्यायालयाने हा निर्णय दिला आहे. यामध्ये तिघांना दोषी ठरवून त्यांची शिष्या पलक, महाराजांची सेवा करणारा सेवक आणि त्यांच्या चालकाचा या प्रकरणात सहभाग होता.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: भीमराव गवळी

Jan 28, 2022 | 4:32 PM

इंदौरः मध्य प्रदेशातीली भय्यू महाराज यांच्या आत्महत्येप्रकरणी इंदोर (Indore) न्यायालयाने (Court) महत्वपूर्ण निर्णय दिला आहे. यामध्ये प्रकरणात मुख्य सेवक विनायक, चालक शरद आणि शिष्य पलक यांना दोषी ठरविण्यात आले आहे. या तिघांनाही सहा सहा वर्षाची शिक्षा देण्यात आली आहे. या प्रकरणात आता तिघांना शिक्षा देण्यात आली असली तरी भय्यू महाराज यांच्या आत्महत्येनंतर त्यांची मुलगी आणि त्यांची दुसरी पत्नी यांच्यातील वाद उफाळून आला होता. त्यामुळे या भय्यू महाराज यांच्या आत्महत्येला वेगळे वळण लागण्याची शक्यता वर्तवली जात होती. आत्महत्याप्रकरणात त्यांची मुलीचे आणि दुसऱ्या पत्नीचे नाव गोवले गेल्याने या आत्महत्येची जोरदार चर्चा झाली होती. त्यामुळे न्यायालयाचा निकाल काय लागणार याकजडे महाराजांच्या भक्तांसह अनेकांच्या नजरा लागल्या होत्या.

भय्यू महाराज यांच्या नावाला एक वलय प्राप्त झाले होते. ते महाराज म्हणून नावारुपाला आल्यानंतर त्यांचा भक्तगणही मोठ्या प्रमाणात वाढला होता. सामान्य नागरिकांसह अनेक सेलिब्रेटीही त्यांचे भक्त होते. त्यामुळे त्यांच्या आत्महत्येनंतर अनेकांना धक्का बसला होता.  त्यानंतर त्यांची शिष्या आणि भय्यू महाराज यांच्या व्हॉटस्अप चॅट पोलिसांना तपासल्यानंतर धक्कादायक माहिती समोर येत गेली. त्यामुळे प्रत्येक तपासानंतर वेगवेगळी माहिती समोर येत गेली.

स्वतःच्या रिव्हॉलवरने आत्महत्या

भय्यू महाराज यांनी आपल्या मालकीची असलेली रिव्हॉलरने 2018 मध्ये गोळी झाडून त्यांनी आत्महत्या केली होती. ज्या तिघांना शिक्षा ठोठावण्यात आली आहे, त्यांनी भय्यू महाराज यांना आत्महत्या करण्यास कारणीभूत असल्याच्या कारणावरुन त्यांना दोषी ठरवण्यात आले आहे. भय्यू महाराज यांना शिक्षा झालेले आरोपी पैश्यासाठी त्रास देत होते. त्यामुळे न्यायालयाने पलक, शरद आणि विनय यांना आत्महत्यप्रकरणी दोषी ठरविण्यात आले आहे. यामधील पलक ही त्यांची शिष्या होती. तर विनायक सेवाकार आणि शरद हा त्यांचा खासगी चालक होता.

महाराजांना आर्थिक आणि मानसिक त्रास

इंदौरच्या भय्यू महाराज यांच्या आत्महत्येप्रकरणी या तिघांना 2019 मध्ये त्यांना अटक केली होती. त्यावेळीच ही माहिती समोर आली की, या तिघांनी मिळून भय्यू महाराज यांना आर्थिक आणि मानसिक त्रास दिला होता. भय्यू महाराज यांनीच आपल्या सुसाईड नोटमध्ये विनायक यांनाच आपल्या आत्महत्येला जबाबदार धरले होते. कारण त्यांनी आत्महत्या करण्याअगोदर गेल्या पंधरा वर्षापासून त्यांचा सेवक म्हणून तो होता.

भय्यू महाराज यांच्या आत्महत्येनंतर त्यांची मुलगी आणि त्यांची दुसरी पत्नी आयुषी यांच्या वादाचे चित्र रंगवण्यात आले होते.त्यानंतर त्यांच्या आत्महत्येची मुख्य कारणे समजली की, त्यांच्या जवळचीच माणसे त्यांच्या जीवावर उठली होती.

संबंधित बातम्या

कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा यांच्या नातीची आत्महत्या; बंगळुरूच्या फ्लॅटमध्ये घेतला गळफास

Bhandara Nagar Panchayat | मोहाडी, लाखनी नगरपंचायतीमध्ये महिलाराज, लाखांदुरात अध्यक्षपद कोणाकडे?

आमदारांच्या निलंबनाचा निर्णय सरकारचा नसून सभागृहाचा : Dilip Walse-Patil

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें