VIDEO : पत्नीचा गळा दाबला, सासूची झोपडी जाळली, मेव्हणीच्या लग्नात धिंगाणा, पटोलेंनी सांगितलेल्या गावगुंड मोदीच्या ‘नाना’ करामती!

उमेश घरडेचे त्याच्या सासुरवाडीत अनेक किस्से चर्चेत आहेत. त्यातलाच एक म्हणजे त्यांनी चुलत सासूची जाळलेली झोपडी. हा पठ्ठा बायकोला मारत होता. शेजारी राहणारी चुलत सासू समजवायला गेली. याचा राग त्याच्या मनात होता. तो मध्यरात्री उठला आणि सासू योगीता बनसोड यांच्या झोपडीला आग लावली.

VIDEO : पत्नीचा गळा दाबला, सासूची झोपडी जाळली, मेव्हणीच्या लग्नात धिंगाणा, पटोलेंनी सांगितलेल्या गावगुंड मोदीच्या 'नाना' करामती!
पटोलेंनी सांगितलेल्या गावगुंड मोदीच्या 'नाना' करामती!
Follow us
| Updated on: Jan 26, 2022 | 11:46 PM

नागपूर : काँग्रेस प्रदेशाध्य नाना पटोले यांची क्लीप व्हायरल झाली, आणि कथित गावगुंड मोदी म्हणजेच उमेश घरडे(Umesh Gharade)ची महाराष्ट्रभर चर्चा सुरु झाली. “बायको सोडून गेली म्हणून लोक मला मोदी म्हणतात” असं ‘टीव्ही 9 मराठी’ शी बोलताना उमेश घरडे यांनी सांगितलं. पण पत्नी का सोडून गेली? हे जाणून घेण्यासाठी आम्ही उमेश घरडे याची पत्नी शिल्पा घरडे(Shilpa Gharade) यांना शोधलं. त्या सध्या उमेश घरडेला याला सोडून माहेरी म्हणजेच मांडळ या गावात राहतात. अनेक वर्ष वडिलांच्या घरी राहिल्यानंतर काही महिन्यांपूर्वी त्या उमेश घरडे सोबत रहायला गेल्या. पण त्याचं दारु पिणं, मारणे हे नेहमीचंच होतं. शेवटी एक दिवस पैशासाठी त्यानं बायकोची नरडी दाबली, येवढ्यावरंच थांबला नाही तर चाकूही लावला. म्हणून त्याची बायको त्याला कायमची सोडून आली. आता तिला तो घटस्फोट देत नाही. (The wife of goon Umesh Gharde told about the harassment from her husband)

काय म्हणाल्या शिल्पा घरडे?

2011 मध्ये आमचं लग्न झालं. पहिल्या गरोदरपणापासून दारुचं व्यसन लागलंय. मला मारायचा, कुणाशी पण भांडण करतो, शिव्या देतो. इथे पण तो आला की तसंच करतो मी गावी गेली होती तेव्हा मी उमेश घरडेची पत्नी म्हणून सांगितलं तर कुणी ओळखलं नाही. मोदीची बायको म्हणून सांगितलं तेव्हा ओळखलं. मोदी म्हणतात तिकडे त्यांना. नागपूरला भाड्याने राहत होतो तेव्हा घरभाडं द्यायचा नाही, नोकरी करायचा नाही, दारु प्यायचा म्हणून सोडून आली. चार-पाच वर्षापूर्वी माझ्याशी भांडण झालं तेव्हा माझ्या काकूची झोपडी पेटवली होती. मजुरी करुन मुलींचं पोट भरते. तीन महिन्यांपूर्वी त्याच्याकडे गेली होती तेव्हा दारु पिऊन चाकू दाखवला होता, गळा दाबला होता. घटस्फोट मागितला तर देत नाही.

सासुरवाडीत वाघाचं चमडं असल्याची थाप पोलिसांकडे मारली होती

शिल्पा आणि उमेश घरडे यांचे 25 मे 2011 रोजी लग्न झालं. लग्नानंतर भंडारा जिल्ह्यातील गोंदी गावात दोघेही रहायला गेले. पण काही महिन्यातंच भांडण सुरु झालं. हा दारु प्यायचा आणि भांडणं करायचा. पत्नी सोडून आली. मग त्यानेही गाव सोडलं. सासऱ्याच्या मांडळ गावात दोघेही किरायाच्या घरात रहायला लागले. पण सासुरवाडीतंही तोच तमाशा. सासुरवाडीत वाघाचं चमडी असल्याची थाप मारल्याचा किस्सा अवघ्या मांडळमध्ये प्रसिद्ध आहे.

चुलत सासूची झोपडीही जाळली

उमेश घरडेचे त्याच्या सासुरवाडीत अनेक किस्से चर्चेत आहेत. त्यातलाच एक म्हणजे त्यांनी चुलत सासूची जाळलेली झोपडी. हा पठ्ठा बायकोला मारत होता. शेजारी राहणारी चुलत सासू समजवायला गेली. याचा राग त्याच्या मनात होता. तो मध्यरात्री उठला आणि सासू योगीता बनसोड यांच्या झोपडीला आग लावली. त्यावेळी गावातील लोकांनी त्याला चांगलाच चोप दिला. उमेश घरडे याने दारु पिऊन अनेक तमाशे केले. आपल्या मेव्हणीच्या लग्नात तो पत्नीच्या मागे चाकू घेऊन फिरत होता. शेवटी त्याच्यावर लग्नातली गरम कढी फेकली असं शेजारी सांगतात. (The wife of goon Umesh Gharde told about the harassment from her husband)

Non Stop LIVE Update
दोन मुडदे पडलेत आणि आरोपीला पिझ्झा-बर्गर, पुणे अपघातावर राऊत आक्रमक
दोन मुडदे पडलेत आणि आरोपीला पिझ्झा-बर्गर, पुणे अपघातावर राऊत आक्रमक.
कपिल पाटलांकडून निवडणूक आणि पोलीस अधिकाऱ्यांना शिवीगाळ? नेमकं काय घडल?
कपिल पाटलांकडून निवडणूक आणि पोलीस अधिकाऱ्यांना शिवीगाळ? नेमकं काय घडल?.
पोलिसांवर दबाव? पुणे अपघात प्रकरणी पुणे पोलीस आयुक्त काय म्हणाले?
पोलिसांवर दबाव? पुणे अपघात प्रकरणी पुणे पोलीस आयुक्त काय म्हणाले?.
ठाकरे कुटुंब लंडनला पळून जाण्याच्या तयारीत, भाजप नेत्याचं वक्तव्य
ठाकरे कुटुंब लंडनला पळून जाण्याच्या तयारीत, भाजप नेत्याचं वक्तव्य.
या जिल्ह्यातील विद्यार्थीन 12 वीत पटकावले 100 %; सांगितला फ्युचर प्लॅन
या जिल्ह्यातील विद्यार्थीन 12 वीत पटकावले 100 %; सांगितला फ्युचर प्लॅन.
संजय शिरसाट म्हणाले, कितीही मोठ्या बापाचा माजलेला लेक असला तरीही…
संजय शिरसाट म्हणाले, कितीही मोठ्या बापाचा माजलेला लेक असला तरीही….
बच्चू कडूंचे सचिन तेंडुलकरला 'हे' 2 पर्याय अन् घरासमोर आंदोलनाचा इशारा
बच्चू कडूंचे सचिन तेंडुलकरला 'हे' 2 पर्याय अन् घरासमोर आंदोलनाचा इशारा.
पिसारा फुलवणाऱ्या मोरासोबत सेल्फी काढलाय? व्हिडीओ बघा, तुम्ही म्हणाल..
पिसारा फुलवणाऱ्या मोरासोबत सेल्फी काढलाय? व्हिडीओ बघा, तुम्ही म्हणाल...
EVM हॅकचा प्रयत्न फसला म्हणून... संजय राऊतांचा भाजपसह आयोगावर हल्लाबोल
EVM हॅकचा प्रयत्न फसला म्हणून... संजय राऊतांचा भाजपसह आयोगावर हल्लाबोल.
झाले Election जपा Relation, मतदान संपताच बॅनरबाजी; ठाण्यात एकच चर्चा
झाले Election जपा Relation, मतदान संपताच बॅनरबाजी; ठाण्यात एकच चर्चा.