नागपुरातील न्यूड डान्स प्रकरण, उमरेडच्या ठाणेदाराची बदली; आणखी कुणाकुणावर कारवाईचा बडगा?

नागपुरातील न्यूड डान्स प्रकरण, उमरेडच्या ठाणेदाराची बदली; आणखी कुणाकुणावर कारवाईचा बडगा?
प्रातिनिधीक फोटो

नागपूर जिल्ह्यातील न्यूड डान्स प्रकरण ठाणेदाराला भोवले. उमरेडचे ठाणेदार यशवंत सोलसे यांची तडकाफडकी बदली करण्यात आली. उमरेड पोलिस स्टेशनचा चार्ज प्रमोद भोंगे यांच्याकडे सोपवला.

सुनील ढगे

| Edited By: गोविंद हटवार, टीव्ही 9 मराठी डिजीटल

Jan 26, 2022 | 4:26 PM

नागपूर : जिल्ह्यातील न्यूड डान्स प्रकरण (Nagpur Dance case) ठाणेदाराला भोवले. उमरेडचे ठाणेदार (Umred Thanedar) यशवंत सोलसे यांची तडकाफडकी बदली करण्यात आली. उमरेड पोलिस स्टेशनचा चार्ज प्रमोद भोंगे यांच्याकडे सोपवला. ब्राम्हणी न्यूड डान्स (obscene dance) प्रकरणी आणखी एका आरोपीला अटक करण्यात आली. न्यूड डान्स प्रकरणी आतापर्यंत बारा जणांना अटक करण्यात आली. लावणीच्या नावावर अश्लील नृत्य झाल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानं खळबळ उडाली होती. नागपूर जिल्ह्याच्या उमरेड तालुक्यातील भुगाव येथे लावणीच्या कार्यक्रमात अश्लील नृत्य करण्यात आले. पोलिसांनी सुरुवातीला चार आयोजकांवर गुन्हे दाखल केले. मात्र व्हायरल व्हिडीओ याच लावणी कार्यक्रमातील आहे का, याबाबत पोलिसांना खात्री नव्हती. पोलिसांनी केलेल्या चौकशीवरून असा डान्स झाला नसल्याची माहिती होती.

आयोजकांच्याही आवळल्या होत्या मुसक्या

उमरेड तालुक्यातील ब्राम्हणी शिवारात अश्लील नृत्य प्रकरणात चंद्रकांत मांढरे, सुरज नागपुरे आणि अनिल दमके यांना अटक करण्यात आली. तिघांनी ऍलेक्स डान्स शो आयोजित केला होता. कोरोना नियमांचं उल्लंघन, बेकायदेशीरपणे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करणे आणि अश्लील नृत्य करण्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. अश्लील नृत्य करणाऱ्या नागपुरातील ऍलेक्स डान्स गृपच्या तरुण-तरुणीवरही गुन्हा दाखल करण्यात आला.

शंभर रुपयांत पाहत होते हंगामा

नागपूर जिल्ह्यात सर्जा राजाच्या नावावर रात्रीस अशाप्रकारे खेळ चालत होता. दिवसा शंकरपट रात्री शामियान्यात न्यूड डान्स असे हे प्रकरण सुरू होते. जिल्ह्यात बीभत्सपणाचा कळस गाठला गेला होता. कुही, उमरेड तालुक्यातील काही गावांमध्ये डान्स हंगामाचे आयोजन केले जात होते. कुही तालुक्यातील मुसळगाव, भुगाव आणि सिल्ली तर उमरेड तालुक्यातील ब्राम्हणी या गावांमध्ये डान्स हंगामा झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. डान्स हंगामाच्या नावावर तरुण-तरुणींचा विवस्त्र डान्स सुरू होता. 100 रुपयांमध्ये डान्स बघण्यासाठी तरुणांची गर्दी होत असे.

आंबट शौकिनांवर चाप

काही लोकं आंबट शौकीन असतात. त्यांना अशाप्रकारचे नृत्य पाहायला आवडते. पाहुण्यांच्या मनोरंजनासाठी ग्रामीण भागात अशा कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. पोलिसांची परवानगी न घेता असे कार्यक्रम बहुधा घेतले जातात. कारण ठाण्यात गेल्यास अशा कार्यक्रमांना अधिकृत परवानगी मिळत नाही. हे प्रकरण उघडकीस आल्यानं कारवाईचा बगडा उगारला गेला. पण, काही ठिकाणी अशा प्रकारचे कार्यक्रम असूनही सुरू आहेत. त्यावर नियंत्रण कोण ठेवणार असा प्रश्न आहे.

Republic Day 2022 | तिरंगी रंगाच्या फुलांच्या सजावटीत श्री विठ्ठल मंदिर नाहुन निघाले

flag hoisting | नागपुरात भिक मागणाऱ्याने फडकविला तिरंगा; झोपडीबाहेरच ध्वजारोहण, कारण काय?

Nagpur Tiger | वाहन अपघातात वाघ जखमी, जंगलात थांबताच दाम्पत्यावर केला हल्ला; उपचाराचे काय?

 

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें