नागपुरात दिव्यांग मुलीचे तलावात ध्वजारोहण; पाचशे फूट तिरंगा ध्वजाची तरुणाईने काढली रॅली!

नागपुरात दिव्यांग मुलीचे तलावात ध्वजारोहण; पाचशे फूट तिरंगा ध्वजाची तरुणाईने काढली रॅली!
अंबाझरी तलावात ध्वजारोहण करताना जलतरणपटू.

नागपुरात ध्वजारोहणाचा उत्साह अनोख्या पद्धतीनं साजरा करण्यात आला. अंबाझरी तलावात पोहणाऱ्यांना एका दिव्यांग मुलीच्या हस्ते ध्वजारोहण केलं. तर दुसरीकडं पाचशे फूट लांब तिरंगा ध्वजाची रॅली काढण्यात आली.

सुनील ढगे

| Edited By: गोविंद हटवार, टीव्ही 9 मराठी डिजीटल

Jan 26, 2022 | 3:50 PM

नागपूर : प्रजासत्ताक दिन प्रत्येकजण ओतप्रोत प्रेमाने साजरा करतात. प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असते. नागपुरातील काही मंडळी दरवर्षी अंबाझरी तलावात पाण्यावर झेंडा फडकवतात. राष्ट्रगीत गाऊन प्रजासत्ताक दिन (Republic Day) साजरा केला जातो. युवकानं पोहण्याप्रती जागरूकता निर्माण केले. देशभक्तीची प्रेरणा देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविला. नागपूरच्या अंबाझरी तलावात (Ambazhari Lake) झेंडा घेऊन पोहत जाणारे हे देशभक्त नागपूरचे आहेत. दरवर्षी 26 जानेवारीला हे या तलावाच्या मधोमध पोहत जातात. त्या ठिकाणी झेंडा फडकावितात. पाण्यातच राहून राष्ट्रगीत गातात. देशाप्रती प्रेम आणि अनोखं झेंडावंदन (Anokhan Zendavandan) बघण्यासाठी या ठिकाणी लोकसुद्धा मोठ्या उत्साहाने येतात. जवळपास पाचशे मीटरचे अंतर हे लोक पोहून जातात. पाण्यावर उंच ठिकाणी झेंडा फडकवतात. ही परंपरा गेल्या पंचेवीस वर्षापासून सुरू आहे. दरवर्षी यात नवनवीन लोकं जुळतात. ही सर्व मंडळी वर्षभर या तलावात पोहतात. 26 जानेवारी आणि 15 आगस्टला या ठिकाणी झेंडावंदन करतात, अशी माहिती स्वीमर दिव्यांग मुलगी तसेच आयोजकांनी दिली.

500 फूट लांब तिरंगा ध्वजाची रॅली

देशभरात 26 जानेवारीचा उत्साह पाहायला मिळतो. नागपुीरातसुद्धा हा उत्साह जोरात आहे. भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी 500 फूट लांब तिरंगा बनविला. रॅली काढण्यात आली. या रॅलीच्या माध्यमातून प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. रामनगर चौकातून ही रॅली निघाली. फुटाळा तलावापर्यंत काढण्यात आली. यावेळी शाळकरी विद्यार्थ्यांसोबतच मोठ्या संख्येने युवा मोर्चाचे कार्यकर्तासुद्धा सहभागी झाले होते. हा विशाल असा तिरंगा बघण्यासाठी लोकांनी सुद्धा गर्दी केली. हा तिरंगा युवकांच्या खांद्यांवर लहरत असताना देशभक्तीसुद्धा दिसत होती. प्रत्येक जण या तिरंग्याकडं पाहत होता.

देशाला प्रगतीच्या वाटेवर नेण्याचा संकल्प करा

नागपूर महानगरसंघचालक राजेश लोहिया यांनीसुद्धा प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या. स्वीकारलेल्या गणतंत्रानुसार आतापर्यंत आपण चाललो की नाही, पुढे किती चालायला हवं. याचं स्मरण करण्याचा आजचा दिवस आहे, असं ते म्हणाले. स्वातंत्र्य कुणी मिळवून दिलं. कोण-कोण क्रांतीवीर स्वातंत्र्य लढ्यात सहभागी होते, त्याची आठवण करण्याचा आजचा दिवस असल्याची आठवण त्यांनी करून दिली. जसं आपण आपल्या जन्मदिनी संकल्प करतो, तसा संकल्प आज करावा. देशाला प्रगतीच्या वाटेवर नेण्याचा संकल्प करावा. हेडगेवार आणि सुभाषचंद्र बोस यांच्या भेटीवर राजेश लोहिया म्हणाले, संघाचे स्वयंसेवक, अधिकाऱ्यांनी स्वातंत्र्य लढ्यात सहभाग घेतला. स्वातंत्र्य लढ्यात अनेक क्रांतीवीरांशी संपर्क आला. संघ स्वयंसेवकांनी त्यांना मदत केली. फक्त संघ स्वयंसेवकच नाही, तर सर्वसामान्य नागरिकांनीही क्रांतीवीरांना मदत केली. भेटीबाबत जे वास्तव आहे ते आहे. ज्या बातम्या चालतात त्यावर आज चर्चा नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Republic Day 2022 | तिरंगी रंगाच्या फुलांच्या सजावटीत श्री विठ्ठल मंदिर नाहुन निघाले

flag hoisting | नागपुरात भिक मागणाऱ्याने फडकविला तिरंगा; झोपडीबाहेरच ध्वजारोहण, कारण काय?

Nagpur Tiger | वाहन अपघातात वाघ जखमी, जंगलात थांबताच दाम्पत्यावर केला हल्ला; उपचाराचे काय?

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें