Nagpur Tiger | वाहन अपघातात वाघ जखमी, जंगलात थांबताच दाम्पत्यावर केला हल्ला; उपचाराचे काय?

वाघाने दाम्पत्यावर प्राणघातक हल्ला केल्याची घटना वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना माहिती झाली. त्यानंतर वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. महामार्गावरील एका बाजूची वाहतूक बंद करण्यात आली.

Nagpur Tiger | वाहन अपघातात वाघ जखमी, जंगलात थांबताच दाम्पत्यावर केला हल्ला; उपचाराचे काय?
प्रातिनिधीक फोटो
Follow us
| Updated on: Jan 26, 2022 | 12:02 PM

नागपूर : मिथिलेश तिवारी आणि विमला तिवारी (Mithilesh Tiwari and Vimala Tiwari) हे मध्यप्रदेशातील नरसिंगपूरचे रहिवासी. उपचारासाठी नागपूरला येत होते. मंगळवार सकाळ साडेनऊची वेळ. थोडा वेळ रिफ्रेश व्हावे म्हणून ते (पवनी) रामटेक वनक्षेत्र परिसरात थांबले. दरम्यान, एका जखमी वाघाने त्यांच्यावर हल्ला केला. हा वाघ एका वाहन अपघातात जखमी ( Tiger injured in car accident) झाल्याचे सांगितलं जातं. रस्त् ओलांडत असताना ही घटना घडली. नागपूर-जबलपूर राष्ट्रीय महामार्गावरील पवनी-चोरबाहुली दरम्यान (Between Pavani-Chorbahuli) ही घटना घडली. यात वाघाने केलेल्या हल्ल्यात दोघेही जखमी झाले. जखमींना रुग्णालयात दाखल करावं लागलं. वाघाने दाम्पत्यावर प्राणघातक हल्ला केल्याची घटना वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना माहिती झाली. त्यानंतर वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. महामार्गावरील एका बाजूची वाहतूक बंद करण्यात आली. देवलापारचे ठाणेदार प्रवीण बोरकुटे यांनी घटनास्थळी धाव घेतली. वनपरिक्षेत्र अधिकारी रितेश भोंगाडे, आणि एफडीसीएमचे वनपरिक्षेत्र अधिकारी आर जी. रंगारी तसेच वनविभागाच्या चमूने या कारवाईत भाग घेतला.

जखमी वाघावर गोरेवाड्यात उपचार

जखमी वाघाला गोरेवाड्याच्या उपचार केंद्रात आणण्यात आले. नागपूरचे उपवनसंरक्षक भगतसिंह हाडा, पेंचचे सहाय्यक वनसंरक्षक अतुल देवकर, राज्यवन्यजीव मंडळाचे सदस्य कुंदन हाते, पशुचिकित्सक डॉ. सय्यद बिलाल, यांच्या मार्गदर्शनात ही कारवाई करण्यात आली. वन्यजीव संशोधन व प्रशिक्षण केंद्र गोरेवाडा येथे उपसंचालक डॉ. व्ही. एम. धूत, पशुचिकित्सक डॉ. मयूर पावशे यांच्या निगराणीत जखमी वाघावर उपचार सुरू आहेत.

जंगलातून प्रवास करताना सावध व्हा

जंगलातून प्रवास करताना सावध राहणे गरजेचे आहे. जंगली प्राणी फिरत असतात. अशावेळी आपण त्यांच्या अधिवासात गेलो तर ते आपल्यावर हल्ला करणारच. त्यामुळं कोअर झोनमध्ये प्रवेश करताना स्वतःची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. अन्यथा इतर अस्वलासारखे प्राणीही हल्ला करू शकतात.

कुणाच्या बापाचं ऑफिस नाहीये, मी जाणीवपूर्वक सांगतोय, फडणवीस का संतापले?

Gondia Naxals | नक्षलवाद्यांनी सालेकसा पोलीस ठाण्याजवळ झळकवले पत्रक; कुणाचे केले समर्थन?

Nagpur Crime | नागपूरच्या ज्या एरियात केली नोकरी तिथंच चोरी; चाकूच्या धाकावर का केली लुटपाट?

आनंद आश्रमातील प्रकाराबाबत राऊतांचा हल्लाबोल तर काय म्हणाले शिंदे?
आनंद आश्रमातील प्रकाराबाबत राऊतांचा हल्लाबोल तर काय म्हणाले शिंदे?.
तो निर्णय आम्हाला मान्य, खडसेंच्या प्रवेशावर काय म्हणाले फडणवीस?
तो निर्णय आम्हाला मान्य, खडसेंच्या प्रवेशावर काय म्हणाले फडणवीस?.
देवेंद्र फडणवीसांनी नागपुरात दणक्यात वाजवला ढोल, बघा व्हिडीओ
देवेंद्र फडणवीसांनी नागपुरात दणक्यात वाजवला ढोल, बघा व्हिडीओ.
आता मराठी विषय सक्तीचा... सरकारी-खासगी शाळांना शासनाचा निर्देश काय?
आता मराठी विषय सक्तीचा... सरकारी-खासगी शाळांना शासनाचा निर्देश काय?.
दिघे असते तर... आनंद आश्रममधील घडलेल्या प्रकाराबाबत राऊतांचा हल्लाबोल
दिघे असते तर... आनंद आश्रममधील घडलेल्या प्रकाराबाबत राऊतांचा हल्लाबोल.
'तो लिंबू कापणारा चमत्कारी बाबा, त्यानं म्हातारपणात..', जरांगेंची टीका
'तो लिंबू कापणारा चमत्कारी बाबा, त्यानं म्हातारपणात..', जरांगेंची टीका.
मोदींच्या घरात खास पाहुण्याचं आगमन; नाव ऐकून तुम्हीही म्हणाल वाह!
मोदींच्या घरात खास पाहुण्याचं आगमन; नाव ऐकून तुम्हीही म्हणाल वाह!.
मुख्यमंत्र्यांनी मराठ्यांसोबत दगाफटका केला तर..., जरांगेंचा इशारा काय?
मुख्यमंत्र्यांनी मराठ्यांसोबत दगाफटका केला तर..., जरांगेंचा इशारा काय?.
'ते दिघेंच्या विचाराचे नाही तर बारमधील',ठाकरे गटातील नेत्याचा हल्लाबोल
'ते दिघेंच्या विचाराचे नाही तर बारमधील',ठाकरे गटातील नेत्याचा हल्लाबोल.
हा सर्व धर्मराव आत्राम अन् त्यांच्या मुलीचा गेम, भाजप नेता काय म्हणाला
हा सर्व धर्मराव आत्राम अन् त्यांच्या मुलीचा गेम, भाजप नेता काय म्हणाला.