कुणाच्या बापाचं ऑफिस नाहीये, मी जाणीवपूर्वक सांगतोय, फडणवीस का संतापले?

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी नगरविकास खात्यात जाऊन काही फायली तपसाल्या. फायली चेक करत असल्याचा किरीट सोमय्यांचा फोटो व्हायरल झाला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली.

कुणाच्या बापाचं ऑफिस नाहीये, मी जाणीवपूर्वक सांगतोय, फडणवीस का संतापले?
devendra fadnavis lashes out at maha vikas aghadi over notice issue to kirit somaiya
Follow us
| Updated on: Jan 26, 2022 | 10:52 AM

नागपूर: भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी नगरविकास खात्यात जाऊन काही फायली तपसाल्या. फायली चेक करत असल्याचा किरीट सोमय्यांचा फोटो व्हायरल झाला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली. त्यानंतर सोमय्या यांना नोटीस बजावण्यात आली आहे. तसेच नगर विकास खात्यातील (urban development office) अधिकाऱ्यांनाही नोटीस बजावण्यात आली आहे. त्यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. हे सरकारी ऑफिस आहे कुणाच्या बापाचं ऑफिस नाहीये. मी जाणीवपूर्वक हा शब्द वापरत आहे. ही खासगी मालमत्ता आहे, अशा शब्दात देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र संताप व्यक्त केला. तसेच किरीट सोमय्यांना कोणत्या अधिकारात नोटीस बजावली याचा खुलासा करा, असं आव्हानच देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे सरकारला दिलं आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी मीडियाशी संवाद साधताना ही सवाल केला आहे. या सरकारचं डोकं फिरलं आहे. अण्णा हजारे यांच्या संघर्षानंतर माहितीचा अधिकार प्राप्त झाला. त्यामुळे कोणत्याही ऑफिसात जाऊन इन्स्पेक्शन करण्याचा अधिकार सामान्य माणसाला मिळाला आहे. तोच अधिकार किरीट सोमय्यांनी बजावला. कागदपत्रे तपासताना ऑफिसमधील खुर्चीवर बसण्याचाही अधिकार आहे. हे सरकारी ऑफिस आहे. कुणाच्या बापाच्या मालकीचं ऑफिस नाहीये. मी जाणीवपूर्वक बापाच्या मालकीचं ऑफिस नाहीये असा शब्द वापरत आहे. कारण ही खासगी मालमत्ता आहे, असं फडणवीस म्हणाले.

ही मिलीभगत आहे

अशा पद्धतीने नोटीसा बजावल्या जात आहेत. त्यामुळे मी कडक शब्द वापरत आहे. किरीट सोमय्यांना नोटीस देण्याचा अधिकार तुम्हाला नाही. कोणत्या अधिकारात देता. ते छायाचित्रं प्रसिद्ध झालं, ते नेमकं कुणी काढलं हे तिथल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालं आहे. तेच तक्रारदार आहेत. त्यामुळे ही मिलीभगत आहे. एकीकडे चोरी करायची आणि ती उघड करण्याचा कणी प्रयत्न केला तर त्याला बदनाम करायचं हे खपवून घेतलं जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

नेमकं प्रकरण काय?

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी नगर विकास खात्यात जाऊन काही फायली चेक केल्या. अधिकाऱ्यांच्या खुर्चीवर बसून फायली चेक करत असल्याचा सोमय्यांचा फोटोही व्हायरल झाला होता. त्यावर काँग्रेसने तीव्र आक्षेप घेतला होता. भाजप नेत्यांची मानसिक स्थिती अत्यंत हालाखीची झाली आहे. सत्ता गेल्यापासून त्यांचं वर्तन बेफाम झालं आहे. महाराष्ट्र विकास आघाडी सरकारला बदनाम करण्यासाठी भाजप नेते कोणत्याही स्तरावर जात आहेत. किरीट सोमय्या मंत्रालयात जाऊन अधिकाऱ्यांच्या खुर्चीवर बसून फायली तपासत होते. त्याची चौकशी केली पाहिजे. त्यांनी माहिती अधिकारात परवानगी घेतली नसेल तर हा गंभीर गुन्हा आहे. त्यामुळे त्याची चौकशी व्हावी. चौकशी अंती हा गुन्हा घडल्याचं सिद्ध झालं तर ऑफिशियल सिक्रेट अॅक्टनुसार कारवाई करावी, तसेच सरकारी कार्यालयात घुसखोरी करण्याच्या कलमान्वये त्यांच्यावर गुन्हा दाखल केला पाहिज, असं काँग्रेस नेते सचिन सावंत म्हणाले होते.

संबंधित बातम्या:

VIDEO: सोमय्यांचा एक फोटो आणि ठाकरे सरकारमध्ये खळबळ, कोण फाईली पुरवतंय आणि कोण चेक करतंय?

Corona, Omicron Cases Maharashtra LIVE: महाराष्ट्रात कोरोनाच्या 33 हजार नव्या रुग्णांची नोंद

चर्चा तर होणारचः मालेगावमध्ये काँग्रेसला पाडलेल्या खिंडारानंतर भुजबळ हसून म्हणतायत की…!

Non Stop LIVE Update
राणेंचं एक ट्विट अन् कोकणातील राजकारणात नवा ट्विस्ट,नेमकं काय म्हणाले?
राणेंचं एक ट्विट अन् कोकणातील राजकारणात नवा ट्विस्ट,नेमकं काय म्हणाले?.
मुंबईतील लोकसभेच्या जागांचा मविआचा फॉर्म्युला ठरला, कुठे कोण लढणार?
मुंबईतील लोकसभेच्या जागांचा मविआचा फॉर्म्युला ठरला, कुठे कोण लढणार?.
'मविआ'चा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला, कोणता पक्ष लढणार सर्वाधिक जागा
'मविआ'चा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला, कोणता पक्ष लढणार सर्वाधिक जागा.
भाजपकडून कुणाला तिकीट? या 6 जणांची समिती ठरवणार, कोणाचा समितीत सहभाग?
भाजपकडून कुणाला तिकीट? या 6 जणांची समिती ठरवणार, कोणाचा समितीत सहभाग?.
'नमो महारोजगार मेळावा' कार्यक्रम पत्रिकेतून शरद पवार यांचं नावच गायब
'नमो महारोजगार मेळावा' कार्यक्रम पत्रिकेतून शरद पवार यांचं नावच गायब.
सदावर्तेंना दिलासा,सनद निलंबित करण्यासंदर्भात बार काऊंसिलचा निर्णय काय
सदावर्तेंना दिलासा,सनद निलंबित करण्यासंदर्भात बार काऊंसिलचा निर्णय काय.
लोकसभा लढणार की नाही? पंकजा मुंडे यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या..
लोकसभा लढणार की नाही? पंकजा मुंडे यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या...
भल्या मोठ्या अस्वलांची मंदिरात एन्ट्री, गेट उघडत प्रसादावर मारला ताव
भल्या मोठ्या अस्वलांची मंदिरात एन्ट्री, गेट उघडत प्रसादावर मारला ताव.
भाजपच्या प्रविण दरेकर यांना कुणाची शिवीगाळ? ऑडिओ होतोय व्हायरल
भाजपच्या प्रविण दरेकर यांना कुणाची शिवीगाळ? ऑडिओ होतोय व्हायरल.
अमित शाहांच्या 'त्या' वक्तव्यानंतर भाजप नेत्यानं सांगितलं सत्य?
अमित शाहांच्या 'त्या' वक्तव्यानंतर भाजप नेत्यानं सांगितलं सत्य?.