नांदेडच्या शाळकरी मुलाला प्रधानमंत्री बालशौर्य पुरस्कार जाहीर, गतवर्षी दोघांचा वाचवलेला जीव

| Updated on: Jan 23, 2021 | 7:37 PM

कंधार तालुक्यातील घोडज इथल्या कामेश्वर वाघमारे या मुलाला प्रधानमंत्री बाल शौर्य पुरस्कार जाहीर झालाय. Nanded Kameshwar Waghmare

नांदेडच्या शाळकरी मुलाला प्रधानमंत्री बालशौर्य पुरस्कार जाहीर, गतवर्षी दोघांचा वाचवलेला जीव
कामेश्वर वाघमारे
Follow us on

नांदेड: नांदेडमधील शाळकरी मुलाला प्रधानमंत्री बालशौर्य पुरस्कार जाहीर झालाय. कंधार तालुक्यातील घोडज इथल्या कामेश्वर वाघमारे या मुलाला हा पुरस्कार जाहीर झालाय. गेल्यावर्षी नदीत बुडणाऱ्या दोन मुलांचे प्राण कामेश्वरने वाचवले होते. स्वतःच्या जीवाची पर्वा न करता त्याने केलेल्या या धाडसाचे चीज व्हावे यासाठी आमदार श्यामसुंदर शिंदे यांनी शासन दरबारी प्रयत्न केले. आमदार श्यामसुंदर शिंदे यांच्या पाठपुराव्यामुळे केंद्र सरकारने कामेश्वरला प्रधानमंत्री बाल शौर्य पुरस्कार जाहीर केलाय. अत्यंत हलाखीची परिस्थिती असणाऱ्या कामेश्वरला हा पुरस्कार जाहीर झाल्यानंतर आमदार शिंदे यांनी त्याचा सत्कार केलाय. त्यासोबतच घोडज इथल्या गावकऱ्यांनी आमदार शिंदे यांचे आभार मानले. (Nanded Boy Kameshwar Waghmare got Prime Minister Child Bravery Award)

आमदार श्यामसुंदर काय म्हणाले

कोणतीही व्यक्ती आपला जीव धोक्यात घालून दुसऱ्याचा जीव वाचवते ही मोठी गोष्ट आहे. त्यामुळे कामेश्वर वाघमारे यानं दाखवलेल्या धाडसाचं कौतुक व्हाव म्हणून प्रयत्न केले. मुख्यमंत्री , उपमुख्यमंत्री, नांदेडचे जिल्हाधिकारी, महिला व बाल आरोग्य अधिकारी यांनी प्रयत्न केल्याचं आमदार श्यामसुंदर शिंदे यांनी सांगितले. कामेश्वर वाघमारे यानं दाखवलेल्या धाडसामुळे त्याला पंतप्रधान बाल शौर्य पुरस्कार मिळाला आहे.याचा त्याला निश्चितच फायदा होईल, असं आमदार शिंदे म्हणाले.

कामेश्वर वाघमारे

जीव वाचवलेल्या मुलांनी पोलीस ठाण्यात घटनेची माहिती दिल्यानं पोलिसांकडून सत्कार करण्यात आला. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आमदार श्यामसुंदर शिंदे यांनी माझा सत्कार केला. प्रधानमंत्री बालशौर्य पुरस्कार मिळाल्यानं आनंद वाटत असल्याचं कामेश्वर वाघमारे यांनं सांगितलं. अडचणीत असलेल्या व्यक्तींच्या मदतीला धावून गेले पाहीजे, असंही कामेश्वर वाघमारे म्हणाला. गावकऱ्यांसमोर आमदारांच्या हस्ते सत्कार झाल्यानं वाघमारे याचे कुटुंबीय आनंदी झाले होते.

दोघांचा जीव वाचवला

कंधार तालुक्यातील घोडज गावाजवळ 22 फेब्रुवारी 2020 रोजी मन्याड नदीत 3 मित्र पोहण्यासाठी गेले होते. ओम मठपती, गजानन श्रीमंगले आणि आदित्य डुंडे असं या तिघांचं नाव होतं. ते पोहण्यासाठी नदीत उतरले, मात्र या तिघांना नीट पोहता येत नव्हतं. ते बुडत असताना कामेश्वर वाघमारे या मुलाने पाहिलं. कामेश्वरने जीवाची बाजी लावत गजानन आणि आदित्यला वाचवलं. मात्र, यावेळी ओम मठपती या मुलाचा मृत्यू झाला.

संबंधित बातम्या:

Special Story | Dragon Fruit चं गुजरातमध्ये नामकरण, महाराष्ट्रातील ड्रॅगन फ्रुट शेतीची स्थिती काय?

आनंदाची बातमी! शेतीसाठी सरकार देतंय 50 हजार रुपये; जाणून घ्या, PKVY योजनेबद्दल सर्व काही

(Nanded Boy Kameshwar Waghmare got Prime Minister Child Bravery Award)