मृतदेहासोबत लग्न करणारी आंचल सासरचे घर सोडून कुठे गेली? मोठा प्रश्न, सासूने माहेरच्या घरी..

Nanded Aanchal Mamidwar Saksham Tate Case : प्रियकर सक्षम ताटे याच्या मृतदेहासोबत लग्न करणारी आणि आयुष्यभर त्याच्याच घरी राहण्याचे वचन देणारी आंचल मामीडवार अचानक त्याचे घर सोडून गेली. आता आंचल नक्की कुठे आहे याबाबत प्रश्न उपस्थित केली जात आहेत.

मृतदेहासोबत लग्न करणारी आंचल सासरचे घर सोडून कुठे गेली? मोठा प्रश्न, सासूने माहेरच्या घरी..
Aanchal Mamidwar Saksham Tate Case
| Updated on: Jun 12, 2026 | 9:02 AM

तुमचा मुलगा गेला असला तरी मी आयुष्यभर तुमच्या घरी तुमचा मुलगा म्हणून राहणार अशी शपथ मृतदेहासमोर घेणारी नांदेडची आंचल मामीडवार ही प्रियकर सक्षम ताटे याच्या मृत्यूनंतर अवघ्या आठ महिन्यात सासर सोडून तिच्या घरी गेली. सक्षम ताटे आणि आंचल मामीडवार यांचे तीन वर्षांपासूनचे प्रेमसंबंध होते. दोघांची जात वेगळी होती. या प्रेम प्रकरणाची कुणकुण लागताच आंचल मामीडवार हिचे वडील गजानन मामीडवार आणि माझे दोन भाऊ हिमेश मामीडवार, साहिल मामीडवार यांनी सक्षमला गोड बोलून चहा प्यायला चल म्हणून नेले आणि तिथेच त्याची हत्या केली. थेट सक्षमवर गोळ्या झाडण्यात आल्या. सक्षमचा हत्येबद्दल आंचलला काहीच कल्पना नव्हती. तिला दुसऱ्या दिवशी सक्षमच्या हत्येची माहिती मिळाली. त्यानंतर थेट आपल्या कुटुंबियांच्या विरोधात जात आंचल मामीडवार सक्षमच्या घरी पोहोचली.

सक्षमच्या मृतदेहासोबत आंचल मामीडवार हिने लग्न केले. चक्क हळद लावून घेत तिने त्याच्या नावाचे कुंकू भरले. या भावनिक प्रसंग अख्ख्या देशाने बघितला. मम्मी माझे वय कमी असले तरीही काय झाले. आता सक्षम गेला असला तरीही मी आयुष्यभर तुमचा सांभाळ करेल आणि तुमची काळजी घेऊन याच घरात राहील. मी तुम्हाला कुठेही सोडून जाणार नाही, असे आंचल मामीडवार म्हणताना दिसली.

ज्यावेळी आंचल मामीडवार ही सक्षम ताटे याच्या मृतदेहासोबत लग्न करत होती, त्यावेळी सर्वांच्या डोळ्यात पाणी होते. आयुष्यभर तुमची साथ सोडणार नाही म्हणणारी आंचल ही गेल्या साडेतीन महिन्यांपासून एकट्या सासूला सोडून तिच्या घरी गेली. सक्षम ताटे याच्या निधनाच्या धक्कादायक वडिलांचेही निधन झाले. गेल्या काही महिन्यांपासून सक्षमची आई आणि आंचलच राहत होत्या.

सक्षम ताटे याची आई संगिता ताटे यांनी म्हटले की, तिने एकेदिवशी अचानक म्हटले की, माझ्या आजीची तब्येत खराब झाली आहे, मी घरी जाते. त्यानंतर मी स्वत: तिला तिच्या घराजवळ सोडून आले. पण त्यानंतर तिचा काहीच संपर्क झाला नाही. गेल्या साडेतीन महिन्यापासून ती कुठे आहे काहीच माहिती नाही. यादरम्यानच आता आंचल मामीडवार नक्की कुठे आहे? हा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

सक्षम ताटे याच्या निधनानंतर त्याला न्याय मिळून देण्याकरिता अनेकदा आंदोलन करताना आंचल मामीडवार ही दिसली. सक्षमच्या कुटुंबियांसोबत ती राहत होती. मात्र, आता आंचल मामीडवार नक्की कुठे आहे, असा सवाल विचारला जात आहे. सक्षमचे घर सोडून ती पुन्हा आपल्या घरच्यांकडे राहिला गेली का असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे.

Follow Us