AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मृतदेहासोबत लग्न करून आयुष्यभर सासरी राहण्याची शपथ घेणारी आंचल गेली घरातून निघून, सासऱ्याचा मृत्यू, सासूने थेट..

Nanded Crime Aanchal Mamidwar Saksham Tate case : सक्षम ताटे याच्या मृतदेहासोबत आंचल मामीडवार हिने लग्न केले. ज्याचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाली. सर्वजण भावूक झाली होती. आंचल मामीडवार हिच्या कुटुंबियांनी सक्षम ताटे याची हत्या केल्यानंतर तिने आयुष्यभर सक्षमची बायको म्हणून राहण्याची शपथ घेतली होती.

मृतदेहासोबत लग्न करून आयुष्यभर सासरी राहण्याची शपथ घेणारी आंचल गेली घरातून निघून, सासऱ्याचा मृत्यू, सासूने थेट..
Saksham Tate Anchal Mamidwar
| Updated on: Jun 11, 2026 | 4:10 PM
Share

नांदेडच्या सक्षम ताटे याची प्रेम प्रकरणातून थेट गोळ्या झाडून आणि फरशी डोक्यात घालून हत्या करण्यात आली. या घटनेने राज्यात खळबळ उडाली होती. सक्षम ताटे याची प्रेयसी आंचल मामीडवार हिच्या वडिलांनी आणि भावांनी सक्षमची हत्या केली. आंचल मामीडवार आणि सक्षम यांच्यात प्रेमसंबंध होते. सक्षम आणि आंचलचे भाऊ मित्रच होते, त्यामुळे आंचल मामीडवार हिच्या घरी सक्षम येत जात असत. आंचल मामीडवार हिच्या कुटुंबियांना या दोघांच्या प्रेमसंबंधांबद्दल कळताच त्यांनी सक्षमचा काटा काढला. मात्र, त्यानंतरही आंचल मामीडवार हिने हार मानली नाही आणि थेट सक्षमच्या मृत्यूनंतर तिने त्याच्या मृतदेहासोबत लग्न केले. आंचल मामीडवार हिने सक्षमच्या मृत्यूनंतर त्याच्या नावाची हळद लावत लग्न केले. ज्या घटनेची चर्चा देशभरात झाली.

आयुष्यभर सक्षमच्या कुटुंबासोबत राहण्याची आणि सक्षमची बायको म्हणून राहणार असल्याची शपथ तिने घेतली. मात्र, आयुष्यभरसोबत राहणार अशी शपथ सक्षमच्या मृतदेहाजवळ घेणारी आंचल मामीडवार काही महिन्यातच सक्षमच्या कुटुंबाला सोडून निघून गेली. सक्षमच्या जाण्याने त्याच्या वडिलांना इतका जास्त धक्का बसला की, त्यांचाही काही महिन्यांपूर्वी मृत्यू झाला. आता सक्षमची आई एकटीच कुटुंबात आहे.

सक्षमची आई संगीता ताटे यांनी एका वृत्तपत्राला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये बोलताना त्यांनी म्हटले की, ज्यावेळी सक्षमची हत्या झाली त्यावेळी तिने मला म्हटले होते की, मम्मी सक्षमची जागा मी घेईल, आता आजपासून तुमचा मुलगा मीच आहे. तुमच्यासोबत राहिल, तुमची काळजी घेईल. ती साडेतीन महिने आमच्यासोबत राहिली. आजीची तब्येत खूप जास्त खराब आहे, मला तिला भेटायला जायचे आहे म्हणून तिने सांगितले.

मी तिला तिच्या घरी सोडवायला गेले. पण त्यानंतर ती परत आलीच नाही. ती तिच्या काकांच्या संपर्कात होती. ती कोणाला बोलायची, ती काय करायची? यावर आम्ही कधीच बंधन तिच्यावर ठेवले नाही. ती घरातून गेली आणि आता परत आलीच नाही. सध्या आंचलसोबत कोणताही संपर्क नाही, असेही सक्षमच्या आईने म्हटले.

Follow Us
भाजपमध्ये जाताच राघव चड्ढांचं मोठं विधान; थेट म्हणाले,आप म्हणजे एक...
भाजपमध्ये जाताच राघव चड्ढांचं मोठं विधान; थेट म्हणाले, आप म्हणजे एक...
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यावर... गुलाबराव पाटलांचं वक्तव्य पुन्हा..
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यावरच... गुलाबराव पाटलांचं वक्तव्य पुन्हा चर्चेत
बुलेटमधील लोखंडी रॉड, हातातील कडा अन्... बड्या मंत्र्याच्या भावाला...
बुलेटमधील लोखंडी रॉड, हातातील कडा अन्... बड्या मंत्र्याच्या भावाला मारहाणीचं वेगळंच कारण समोर
1 हजार 800 कोटींचा निधी मंजूर; महारष्ट्र सरकारचा सर्वात मोठा निर्णय;
1 हजार 800 कोटींचा निधी मंजूर; महारष्ट्र सरकारचा सर्वात मोठा निर्णय; नगरविकास विभागाकडून...
जरांगेंच्या उपोषणाचा 14 वा दिवस; तोडगा निघणार?
Manoj Jarange | जरांगेंच्या उपोषणाचा 14 वा दिवस; तोडगा निघणार?
राजीनामा झाल्याशिवाय शांत बसायचं नाही; बड्या नेत्याची...
राजीनामा झाल्याशिवाय शांत बसायचं नाही; बड्या नेत्याची... राज्यात पुन्हा नव्या राजीनाम्याची मागणी
राज्यातील लहान मुलांमध्ये SMA या दुर्मिळ आजाराची लक्षणं! पालकांनी...
SMA | राज्यातील लहान मुलांमध्ये SMA या दुर्मिळ आजाराची लक्षणं! पालकांनी या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका!
अंगावर आलात तर शिंगावर घेऊ; भंडाऱ्यात महायुतीत पुन्हा ठिणगी!
BJP VS Shiv Sena | अंगावर आलात तर शिंगावर घेऊ; भंडाऱ्यात महायुतीत पुन्हा ठिणगी! शिवसेना-भाजप आमनेसामने
पुण्यात स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्याचं अपहरण! अभ्यासिकेतून बाहेर..
MPSC Studant | पुण्यात स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्याचं अपहरण! अभ्यासिकेतून बाहेर पडताच गाडीत कोंबलं; नेमकं काय घडलं?
MPSC विद्यार्थ्यांच्या सर्व मागण्या मान्य? फडणवीस ॲक्शन मोडमध्ये
MPSC विद्यार्थ्यांच्या सर्व मागण्या मान्य? फडणवीस ॲक्शन मोडमध्ये; पेपरफुटी प्रकरणात मोठी अपडेट समोर