तोराच भारी… स्मार्टफोनपेक्षाही जास्त कोंबड्याची किंमत.. माळेगावच्या यात्रेत तब्बल ‘इतक्या’ हजारांचा कोंबडा दाखल

हौसेला मोल नसतं, असं म्हणतात. जगात अनेक महागड्या, आलिशान वस्तू आहेत. पण नांदेडच्या माळेगाव यात्रेत एक कोंबडा दाखल झाला आहे. ज्याची किंमत तर एखाद्या स्मार्टफोनपेक्षाही जास्त आहे.

तोराच भारी... स्मार्टफोनपेक्षाही जास्त कोंबड्याची किंमत.. माळेगावच्या यात्रेत तब्बल इतक्या हजारांचा कोंबडा दाखल
| Updated on: Jan 12, 2024 | 2:53 PM

यशपाल भोसले, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, नांदेड | 12 जानेवारी 2024 : हौसेला मोल नसतं, असं म्हणतात. पण हौस किती करावी. जगात अनेक महागड्या, आलिशान वस्तू आहेत. पण नांदेडच्या माळेगाव यात्रेत एक कोंबडा दाखल झाला आहे. ज्याची किंमत तर एखाद्या स्मार्टफोनपेक्षाही जास्त आहे. अडीच फूट उंची असलेल्या या कोंबड्याचा तोराच भारी आहे. माळेगावमधील यात्रेचं आकर्षण ठरलेल्या या कोंबड्याची किंमत ऐकाल तर तुम्हीही म्हणाल कोंबडा आहे की मजा !

स्मार्टफोनपेक्षाही महागडा कोंबडा-कोंबडीचा जोडा

नांदेडच्या माळेगावमध्ये सध्या यात्रा भरली आहे. या यात्रेसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आहे.तिथे सध्या पशू प्रदर्शनही सुरू असून त्यामध्ये असलेल्या एका कोंबड्याने सर्व उपस्थितांचं लक्ष वेधलं आहे. या कोंबड्याने माळेगाव यात्रेतील पशू प्रदर्शनात पहिला क्रमांक पटकावला आहे. लातूर जिल्ह्यातील उदगीर तालुक्यातील डोंगरशेळकी या गावातील बाबुराव मुंडे यांचा हा फायटर कोंबडा असून यात्रेमधील अनेक लोक हा कोंबडा पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दीही करत आहेत.

अवघ्या आठ महिन्यांचा हा कोंबडा फायटर कोंबडा म्हणून प्रसिद्ध आहे. अडीच फूट उंची, काळसर रंग अशा या कोंबड्या सोबत एक कोंबडीही असून त्यांच्या या जोडीची किंमत तर एखाद्या स्मार्टफोनपेक्षाही जास्त आहे. कोंबडा-कोंबडीची ही जोडी विकत घ्यायची असेल तर तब्बल २० हजार रुपये मोजावे लागतील

लातूर जिल्ह्यातील उदगीर तालुक्यातील डोंगरशेळकी या गावातील बाबुराव मुंडे यांनी कोंबडा-कोंबडीची ही जोडी १५ हजारांना विकत घेतली. या फायटर कोंबड्यासाठी दररोज शेंगदाणे, मका, ज्वारी, गहू या सर्वांचा खुराक खायला घातला जातो. कोंबड्याच्या झु्ंजीसाठीच त्याला विशेष ट्रेनिंग देण्यात आलं आहे. मात्र त्याला विकत घ्यायचं असेल तर त्यासाठी २० हजार रुपयांची किंमत मोजावे लागतील, असं बाबुराव मुंडे यांनी स्पष्ट केलं.

दक्षिण भारतातील सर्वात मोठी यात्रा म्हणून परिचित असलेली माळेगाव ता. लोहा, जिल्हा नांदेड येथील यात्रा दिनांक 10 जानेवारी ते 14 जानेवारी दरम्यान होत आहे. या यात्रेत देशभरातील पशु प्रेमी आपले पशु यात्रेत घेवून सहभाग नोंदवत असतात. या यात्रेच्या माध्यमातून किरकोळ व्यापाराचा उत्पादनात वाढ होते.