AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Eknath Shinde-Ajit Pawar : एकनाथ शिंदे-अजित पवार आले एकत्र, भाजपला ठेवलं बाजूला, महायुतीत वादाची ठिणगी पडणार का?

Eknath Shinde-Ajit Pawar : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातली समीकरण बदलतायत. महायुतीमध्ये भिडू म्हणून एकत्र असलेले पक्षच परस्परांविरोधात जात आहेत. याची झलक नुकतीच पहायला मिळाली. अजून जिल्हा परिषदा आणि महापालिकेच्या निवडणुका व्हायच्या आहेत.

Eknath Shinde-Ajit Pawar : एकनाथ शिंदे-अजित पवार आले एकत्र, भाजपला ठेवलं बाजूला, महायुतीत वादाची ठिणगी पडणार का?
Ajit Pawar-Eknath Shinde
| Updated on: Nov 15, 2025 | 7:45 AM
Share

महाराष्ट्रात भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असं तीन पक्षांचं मिळून महायुती सरकार आहे. पण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत स्थानिक पातळीवरील समीकरणं बदलेली पहायला मिळतायत. काही ठिकाणी सत्ताधारी पक्षच परस्पराविरोधात निवडणूक रिंगणात उतरले आहेत. नंदूरबार नगरपालिका निवडणुकीत त्याची झलक पहायला मिळते आहे. राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील नगरपालिका आणि नगर परिषद निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे. येत्या 2 डिसेंबरला राज्यात नगरपालिका आणि नगर परिषदांच्या निवडणुका आहेत. 3 डिसेंबरला निकाल येईल. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील हा पहिल्या टप्प्यातील निवडणूक कार्यक्रम आहे.

त्यानंतर जिल्हा परिषदा आणि महापालिका निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होऊ शकतो. या निवडणुका जानेवारी महिन्यात होण्याची शक्यता आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांकडे मिनी विधानसभा म्हणून पाहिलं जातं. त्यातून जनमताचा कौल कुठल्या दिशेला आहे? ते समजतं. नगरपालिका, नगर परिषदा, जिल्हा परिषदा आणि नगरसेवक बनणारे लोकप्रतिनिधीच पुढे आमदार, खासदार, मंत्री बनतात. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतून भविष्यातील नेतृत्व आकाराला येतं. या निवडणुका कार्यकर्त्यांच्या निवडणुका म्हणून ओळखल्या जातात. जे कार्यकर्ते विधानसभा, लोकसभेला पक्षाचा प्रचार करतात. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत त्यांनी उमेदवारीची अपेक्षा असते. म्हणून या निवडणुका कार्यकर्ते आणि पक्ष विस्तार या दृष्टीने महत्वाच्या आहेत.

महायुतीतील वाद पुन्हा वाढण्याची शक्यता

नंदुरबार नगरपालिकेत एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीची युती झाल्याची सूत्रांची माहिती आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपाला बाजूला ठेवत युती केली आहे. शिवसेनेचे आमदार चंद्रकांत रघुवंशी आणि राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष डॉ. अभिजीत मोरे यांच्यात रात्री उशिरा बैठक झाली. नंदुरबार नगरपालिकेसाठी राष्ट्रवादीला दोन जागा सोडण्यात आल्या आहेत. भाजपाला बाजूला सारत शिवसेना आणि राष्ट्रवादीने युती केल्याने महायुतीतील वाद पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. नगरपालिकेत झालेल्या राष्ट्रवादी आणि सेनेच्या युतीमुळे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीवर याचे परिणाम जाणवणार आहेत. भाजपात हिना गावित आल्यामुळे भाजपची ताकद वाढलेली आहे. हिना गावित यांना शह देण्यासाठी राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र आल्याचे देखील बोलले जात आहे.

Follow Us
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्नचिन्ह; शिंदे गटाचा...
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्न चिन्ह, शिंदे गटाचा युत्किवाद ठाकरेंचं टेन्शन वाढवणार?
बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची व्यवस्था
Beed Maratha Protesters | बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची मोठी व्यवस्था
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले...
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले दर्शन; खास सजावटीने वेधले लक्ष!
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच...
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच, नेमका अर्थ काय?
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात...
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात... नेमकं काय म्हणाल्या?
जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत...
Manoj Jarange Patil : जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत...
Shivsena Hearing Big Update | शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत असं काय घडलं?
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे...
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे गटाचा युक्तिवाद; पक्षाचे चिन्ह कोणाला मिळणार?
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक...
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक मागणी... नेमकं काय म्हणाले?
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती...
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती, पर्यावरणपूरक गणपती देखावा