Nashik Corona | कोरोना संपलाय म्हणता ना, पण नाशिकमध्ये पुन्हा 10 मृत्यू!

कोरोना संपला असा समज सर्वत्र पसरला आहे. त्यामुळे अनेक नागरिकांनी कोरोना लसीकरणाकडे पाठ फिरवली आहे. मात्र, दुसरीकडे नाशिक जिल्ह्यात रोज एका तरी कोरोना रुग्णाचा मृत्यू होत असल्याचे समोर येत आहे. विशेष म्हणजे 6 फेब्रुवारी ते 13 फेब्रुवारी दरम्यान कोरोनामुळे तब्बल 33 बळी गेल्याचे समोर आले. त्यानंतर पुन्हा 10 मृत्यू झाले आहेत.

Nashik Corona | कोरोना संपलाय म्हणता ना, पण नाशिकमध्ये पुन्हा 10 मृत्यू!
Corona
Follow us
| Updated on: Mar 02, 2022 | 11:29 AM

नाशिकः एकीकडे कोरोनाची (Corona) लाट संपली आहे, असे सांगण्यात येत आहे. महाराष्ट्रातील अनेक निर्बंध हटले आहेत. दिल्लीने (Delhi) तर निर्बंधमुक्तीकडे वाटचाल सुरू केलीय. मात्र, नाशिकमध्ये (Nashik) कोरोनाचे मृत्यू काही केल्या थांबताना दिसत नाहीत. गेल्या दहा दिवसांत चक्क 10 कोरोना रुग्णांचे मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. दरम्यान, आज बुधवारी जिल्हा सामान्य रुग्णालयाने दिलेल्या अहवालानुसार जिल्ह्यातील 4 लाख 66 हजार 555 कोरोना बाधितांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सद्यस्थितीत 307 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत 8 हजार 896 रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा नोडल अधिकारी डॉ.अनंत पवार यांनी दिली आहे.

कोठे आहेत रुग्ण?

जिल्ह्यात अनेक कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यात नाशिक ग्रामीणमध्ये नाशिक 18, बागलाण 9, चांदवड 12, देवळा 3, दिंडोरी 21, इगतपुरी 4, कळवण 6, मालेगाव 2, निफाड 15, पेठ 2, सिन्नर 9, सुरगाणा 15, त्र्यंबकेश्वर 45, येवला 8 असे एकूण 169 पॉझिटीव्ह रुग्णांवर ग्रामीण भागात उपचार सुरू आहेत. तसेच नाशिक महानगरपालिका क्षेत्रात 112, मालेगाव महानगरपालिका क्षेत्रात 5 तर जिल्ह्याबाहेरील 21 रुग्ण असून, असे एकूण 307 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत जिल्ह्यात 4 लाख 75 हजार 758 रुग्ण आढळून आले आहेत.

कसे होतायत मृत्यू?

कोरोना संपला असा समज सर्वत्र पसरला आहे. त्यामुळे अनेक नागरिकांनी कोरोना लसीकरणाकडे पाठ फिरवली आहे. मात्र, दुसरीकडे जिल्ह्यात रोज एका तरी कोरोना रुग्णाचा मृत्यू होत असल्याचे समोर येत आहे. विशेष म्हणजे 6 फेब्रुवारी ते 13 फेब्रुवारी दरम्यान कोरोनामुळे तब्बल 33 बळी गेल्याचे समोर आले आहे. यातले 18 बळी हे नाशिक महापालिका क्षेत्रात गेलेत, तर 16 बळी हे नाशिकच्या ग्रामीण भागात गेल्याचे समोर आले आहे. त्यात अजूनही कोरोनाचे मृत्यू सत्र सुरू आहे. त्यामुळे घराच्या बाहेर पडताना प्रत्येकाना मास्कचा वापर जरूर करावा. लस टोचून घ्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे.

असे आहेत कोरोना मृत्यू

– 1 मार्च 2022 रोजीचे मृत्यू – 01

– 28 फेब्रुवारी 2022 रोजीचे मृत्यू – 01

– 27 फेब्रुवारी 2022 रोजीचे मृत्यू – 01

– 26 फेब्रुवारी 2022 रोजीचे मृत्यू – 01

– 25 फेब्रुवारी 2022 रोजीचे मृत्यू – 01

– 24 फेब्रुवारी 2022 रोजीचे मृत्यू – 01

– 23 फेब्रुवारी 2022 रोजीचे मृत्यू – 01

– 22 फेब्रुवारी 2022 रोजीचे मृत्यू – 01

– 21 फेब्रुवारी 2022 रोजीचे मृत्यू – 01

– 20 फेब्रुवारी 2022 रोजीचे मृत्यू – 01

इतर बातम्याः

चर्चा तर होणारच: केंद्रीय मंत्री भागवत कराडांच्या दौऱ्याचे नाशिकमध्ये ‘कुर्रर्रर’ राजकीय नाट्य…!

कापडणीस पिता-पुत्राचा 4 जणांनी केला मर्डर; नाशिकमधील शेअर्स कंपनीच्या मॅनेजरचा सहभाग

चिन्मय, पूजा, सिद्धार्थला सुविचार गौरव पुरस्कार; जयंत पाटलांच्या हस्ते 10 मान्यवरांचा नाशिकमध्ये होणार सन्मान

Non Stop LIVE Update
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल.
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल.
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला...
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला....
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत.
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'.
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार.
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया.
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?.
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?.
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका.