नाशिकसाठी 40 मॉड्युलर बेड, कोरोना उपायोजनांसाठी 49 कोटी; प्रशासनाच्या बैठकीत काय झाला निर्णय?

नाशिक महापालिकेने राज्यात सर्वात मोठा ऑक्सिजन प्लांट उभारला आहे. नाशिक जिल्ह्यात सरकारी रुग्णालयांसह खासगी रुग्णालयांना पुरवठा केला जाऊ शकतो इतका मोठा हा प्लांट आहे.

नाशिकसाठी 40 मॉड्युलर बेड, कोरोना उपायोजनांसाठी 49 कोटी; प्रशासनाच्या बैठकीत काय झाला निर्णय?
नाशिकमध्ये येणार मॉड्युलर आयसीयू बेड.
| Updated on: Feb 12, 2022 | 12:09 PM

नाशिकः नाशिककरांसाठी (Nashik) एक अतिशय महत्त्वाची बातमी. एकीकडे कोरोनाची (Corona) साथ कमी झालीय. ओमिक्रॉनचा (Omicron) धोका म्हणावा तितकासा नाही. मात्र, सातत्याने होणारे कोरोना बाधितांचे मृत्यू पाहता प्रशासनाने नाशिक जिल्हा रुग्णालय आणि मालेगाव उपजिल्हा रुग्णालयांमध्ये माड्युलर आयसीयू बेड खरेदीला मंजुरी दिलीय. जिल्हा प्रशासन, आरोग्य विभाग व जिल्हा परिषदेची संयुक्त आढावा बैठक झाली. यावेळी हा निर्णय घेण्यात आला. कोविड कामासाठी जिल्ह्याला 49 कोटींचा निधी मिळणार आहे. त्यातील 23 कोटी रुपये आले आहेत. त्या पैशातून जिल्हा रुग्णालयात 30 आणि मालेगावच्या उपजिल्हा रुग्णालयात असे 10 अत्याधुनिक बेडची खरेदी केली जाणार आहे. तर उर्वरित 26 कोटींचा निधीही मिळाला आहे. या खर्चाचे येत्या मार्चपर्यंत नियोजन करण्यात येणार आहे.

सर्वात मोठा ऑक्सिजन प्लांट

नाशिक महापालिकेने राज्यात सर्वात मोठा ऑक्सिजन प्लांट उभारला आहे. नाशिक जिल्ह्यात सरकारी रुग्णालयांसह खासगी रुग्णालयांना पुरवठा केला जाऊ शकतो इतका मोठा हा प्लांट आहे. पालिकेकडे यापूर्वी केवळ तेरा मेट्रीक टन इतक्या ऑक्सिनची क्षमता होती. मात्र, आता पालिकेने तब्बल तीन कोटी रुपये खर्च करून 140 मेट्रीक टन क्षमतेचा ऑक्सिजन प्लांट उभारला आहे. यामुळे नाशिकसह उत्तर महाराष्ट्रालाही ऑक्सिनज पुरवठा होऊ शकणार आहे. मात्र, सध्या कोरोनाचे मवाळ स्वरूप पाहता, याची तूर्तास गरज नाही.

इतरही तयारी चोख

नाशिकमध्ये महापालिकेने ऑक्सिजनची चोख व्यवस्था केली आहे. दररोज 4000 मेट्रीक टन ऑक्सिजन साठा उपलब्ध ठेवला जात आहे. त्यासाठी ऑक्सिजन निर्मिती करणारे 23 प्रकल्प उभारले आहेत. त्यातून 23 मेट्रीक टन ऑक्सिजनची रोज निर्मिती होणार आहे. द्रवरूप ऑक्सिजनसाठी 246 मेट्रीक टन क्षमतेच्या 19 टाक्या आहेत. 130 मेट्रीक टन साठ्याचे 7271 ऑक्सिजन सिलिंडरही तयार ठेवण्यात आले आहेत. महापालिका रुग्णालयांमध्ये 8 हजार खाटा सज्ज आहेत. 2200 खाटांना ऑक्सिजनची सुविधा आहे.

अशा आहेत खाटा

– महापालिका रुग्णालय – 8 हजार

-बिटको रुग्णालय – 650

– डॉ. झाकीर हुसेन रुग्णालय – 150

– ठक्कर डोम – 325

– संभाजी स्टेडियम – 280

– मीनाताई ठाकरे स्टेडियम – 180

– समाजकल्याण कोविड सेंटर – 500

– मोरी कोविड सेंटर – 200

– अंबर सेंटर – 300

– सातपूर मायको रुग्णालय – 50

– सावतानगर क्रॉम्प्टन हॉल – 60

इतर बातम्याः

Kumar Vishvas Birth Day Special | सृजन का बीज हूँ, जाया हो नही सकता, 10 वर्ष राजकारण, हजारो वर्ष कविता!!

Lata Mangeshkar | चैतन्याची परी, सांध्यपर्वातील वैष्णवी, हृदयामधल्या निशिगंधाचे फूल; लतादीदींच्या आठवणींचा मोहक कोलाज!

Nashik | महापालिकेच्या कोषागार विभागात घोटाळा, नियमित भरण्यावरच डल्ला, नेमके प्रकरण काय?