AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nashik Election | सुरगाण्यात चिठ्ठीच्या बळावर शिवसेनेची डरकाळी; 3 ठिकाणचे नगराध्यक्ष बिनविरोध

नाशिक जिल्ह्यातील 6 नगरपंचायतीपैकी कळवण, देवळा, निफाडमध्ये नगराध्यक्ष बिनविरोध निवडला गेला आहे. कारण या ठिकाणी नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या दिवशी फक्त एकेक अर्ज दाखल करण्यात आला आहे.

Nashik Election | सुरगाण्यात चिठ्ठीच्या बळावर शिवसेनेची डरकाळी; 3 ठिकाणचे नगराध्यक्ष बिनविरोध
Shiv Sena
| Updated on: Feb 15, 2022 | 12:34 PM
Share

नाशिकः नाशिक (Nashik) नगरपंचायत निवडणुकीत (Nagar Panchayat)अखेर आज सुरगाणा येथे शिवसेनेने आपली सत्ता कायम राखली आहे. चिठ्ठीचा कौल शिवसेनेला मिळाला. त्यामुळे भरत वाघमारे विजयी झाले. त्यांनी भाजपचे विजय कानडे यांचा पराभव केला. सुरगाणा येथील भाजप नगरसेविका काशीबाई पवार यांचा सहलीदरम्यान हृदयविकाराने मृत्यू झाला होता. त्यामुळे शिवसेना आणि भाजपच्या उमेदवाराला समसमान मते मिळाली. अखेर चिठ्ठी टाकून नगराध्यक्ष पदाचा निकाल घोषित करण्यात आला. दुसरीकडे पेठमध्ये नगराध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादी, माकप, भाजप व अपक्षांनी युती केली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे करण करवंदे यांची निवड निश्चित मानली जातेय. तर दिंडोरी येथे नगराध्यक्ष निवडणुकीसाठी शिवसेना विरुद्ध भाजप अशी लढत होतेय. मात्र, येथे अपेक्षेप्रमाणे शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र आलेत. त्यामुळे शिवसेना उमेदवार मेघा धिंदळे यांचा विजय सुकर असल्याचे समजते.

तीन ठिकाणी बिनविरोध

जिल्ह्यातील 6 नगरपंचायतीपैकी कळवण, देवळा, निफाडमध्ये नगराध्यक्ष बिनविरोध निवडला गेला आहे. कारण या ठिकाणी नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या दिवशी फक्त एकेक अर्ज दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे कळवणमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते कौतिक पगार, निफाडमध्ये शहरविकास आघाडीच्या रूपाली गंधवे, देवळा येथे भाजपच्या भारती अशोक आहेर यांची निवड निश्चित आहे. दिंडोरी नगरपंचायतीमध्ये नगराध्यक्ष पदासाठी 3 आणि पेठमध्ये 2 अर्ज आहेत.

दिंडोरीची उत्सुकता

दिंडोरीत केंद्रीय मंत्री डॉ. भारती पवार यांना जोरदार धक्का बसला आहे. या ठिकाणी 17 पैकी 6 जागा मिळवून शिवसेना सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. तर भाजपला केवळ 4 जागांवर समाधान मानावे लागले आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस येथे एकत्र आले, तर सहजपणे महाविकास आघाडीची सत्ता येऊ शकते. विशेष म्हणजे दिंडोरी हा डॉ. भारती पवार यांचा लोकसभा मतदार संघ असून, त्यांचे येथे मजबूत जाळे आहे. त्यामुळे या निवडणुकीत काय होणार, याची उत्सुकता लागली आहे. हे चित्रही थोड्याच वेळात स्पष्ट होणार आहे. आता यानंतर जिल्ह्यात महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीचा रणसंग्राम रंगणार आहे.

इतर बातम्याः

Mirza Ghalib | जगण्याचं तत्वज्ञान मलमली भाषेत सांगणाऱ्या असदुल्लाह-ख़ाँ-‘ग़ालिब’ का पता…!

महाराष्ट्राचा महापिता कर्नाटकाच्या मातीत एकाकी, समाधीवर साधे छप्परही नाही; पानिपतकारांच्या डोळ्यांत पाणी, पोटात गोळा!

Lata Mangeshkar | चैतन्याची परी, सांध्यपर्वातील वैष्णवी, हृदयामधल्या निशिगंधाचे फूल; लतादीदींच्या आठवणींचा मोहक कोलाज!

T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर
T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर.
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास.
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया.
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम.
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल.
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट.
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.