काँग्रेसला सर्वात मोठा धक्का, नाशिकचा बडा नेता भाजपाच्या गळाला, निवडणुकीत बसणार मोठा फटका!

स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक लागल्यापासून राज्यात मोट्या राजकीय घडामोडी घडत आहेत. असे असतानाच आता काँग्रेसला सर्वात मोठा धक्का बसला आहे. भाजपाची ताकद चांगलीच वाढणार आहे.

काँग्रेसला सर्वात मोठा धक्का, नाशिकचा बडा नेता भाजपाच्या गळाला, निवडणुकीत बसणार मोठा फटका!
devendra fadnavis
| Updated on: Nov 12, 2025 | 8:08 PM

Shirish Kotwal Will Join BJP : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची घोषणा झाली आहे. त्यानंतर आता राज्यभरात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. तिकीट मिळवण्यासाठी तसेच उमेदवारी अर्ज भरण्यासाठी सगळीकडे लगबग चालू झाली आहे. दुसरीकडे विजयासाठी अनेक नगरपरिषदा आणि नगरपंचायीतत युती आणि आघाडीचे समीकरण घडवून आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. असे असतानाच आता काँग्रेसला सर्वात मोठा धक्का बसला आहे. येथे माजी आमदार थेट भाजपात प्रवेश करणार आहे. या पक्षप्रवेशामुळे आता नाशिक जिल्ह्याचे राजकारण बदलणार आहे.

नाशिकमध्ये नेमकं काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार काँग्रेसला नाशिक जिल्ह्यात मोठा धक्का बसणार आहे. नाशिक जिल्हा काँग्रेस अध्यक्ष तसेच चांदवड विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार शिरीष कोतवाल उद्या (13 नोव्हेंबर) भाजपात जाहीर प्रवेश करणार आहेत. या पक्षप्रवेशासाठी संपूर्ण तयारी झालेली आहे. एकीकडे स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक लागलेली असताना आता शिरीष कोतवाल आपल्या शेकडो समर्थकांसह थेट भाजपात प्रवेश करणार आहेत. या पक्षप्रवेशाची संपूर्ण नाशिक जिल्ह्यात चर्चा रंगली आहे. कारण कोतवाल यांच्याकडे काँग्रेसने महत्त्वाची जबाबदारी सोपवलेली होती. ते नाशिक जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष होते. या जिल्ह्यात कोतवाल यांच्याच नेतृत्त्वात काँग्रेस पक्ष निवडणूक लढवणार होता. परंतु थेट सेनापतीच सोडून जात असल्याने नाशिकमध्ये काँग्रेसला हा सर्वात मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे.

फडणवीस यांच्या उपस्थितीत होणार प्रवेश

माजी आमदार शिरीष कोतवाल यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपा प्रवेश होणार आहे. त्यांच्या भाजपा प्रवेशामुळे नाशिक जिल्हा तसेच चांदवाड तालुक्यातही काँग्रेसला फटका बसणार आहे. तर भाजपाची या जिल्ह्यात मोठी ताकद वाढणार आहे. शिरीष कोतवाल यांनी भाजप आमदार डॉ. राहुल आहेर यांच्या विरोधात काँग्रेसच्या तिकिटावर विधानसभा निवडणूक लढवली होती. परंतु त्यांचा पराभव झाला होता. आता हेच कोतवाल भाजपात जाणार आहेत.

नेमका निकाल काय लागणार?

नगरपंचायत आणि नगरपरिषदांची निवडणूक लागल्यामुळे नाशिक जिल्ह्यात मोठ्या घडामोडींना वेग आला आहे. असे असताना काँग्रेसला कोतवाल यांच्या रुपात हा फटका बसला आहे. त्यामुळे आता या निवडणुकीत चांदवड तालुक्यात नेमके काय होणार? तसेच नाशिक जिल्ह्यातही भाजपाची नेमकी काय प्रगती होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.