देव कुणाला कुठे दिसेल सांगता येत नाही, या अवलियाला तो रामफळात दिसला अन् बघा कसे साकारले बजरंगबली…

| Updated on: Apr 06, 2023 | 12:09 PM

संपूर्ण देशभरामध्ये आज हनुमान जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर नाशिकच्या एका चित्रकाराने अनोख्या पद्धतीने हनुमान जयंती साजरी केली आहे.

देव कुणाला कुठे दिसेल सांगता येत नाही, या अवलियाला तो रामफळात दिसला अन् बघा कसे साकारले बजरंगबली...
Image Credit source: TV9 Network
Follow us on

येवला, नाशिक : आज संपूर्ण देशभरामध्ये हनुमान जयंतीचा उत्सव ठीक ठिकाणी पाहायला मिळत आहे. विविध धार्मिक कार्यक्रमांचे देखील आयोजन करण्यात आले आहे. हनुमान भक्त आज हनुमान जयंतीच्या निमित्ताने हनुमान मंदिरात जाऊन पूजा विधी करत दर्शन घेत आहे. बजरंग बली की जय अशा घोषणा देत अनेक मंदिरे गर्दीने फुलून गेली आहे. मात्र, दुसरीकडे मंदिरात न जाता बजरंग बलीचा जयघोष न करता एका कलाकारांना हनुमान जयंती अनोख्या पद्धतीने साजरी करत केली आहे. आपली कलाकारी दाखवत हनुमान भक्त असलेल्या चित्रकाराने रामफळावर रेखाटलेली चित्रे पाहून तुम्हाला सुद्धा आश्चर्याचा धक्का बसेल. सध्या हीच चित्रे सोशल मिडियावर आजच्या दिवशी चर्चेचा विषय ठरत आहे.

हनुमान जयंती निमित्ताने हनुमानाचे काहीतरी चित्र काढावे अशी कल्पना येवल्यातील चित्रकार गोरख बोरसे यांना सुचली होती. सगळीच चित्रे कागदावर, फळ्यावर आणि भिंतीवर काढतो त्यामुळे हनुमान जयंतीला काहीतरी वेगळंपण असावे अशी त्यांची इच्छा होती.

गोरख बोरसे या चित्रकाराने चक्क रामफळावरच हनुमानाच्या विविध प्रतिकृती साकारल्या आहे. हनुमान जयंतीचे औचित्य साधून या चित्रकाराने श्रीराम आणि हनुमान यांच्यातील जवळचं नातं राम फळावर साकारले आहे.

हे सुद्धा वाचा

बजरंग बली च्या विविध प्रतिकृती आपल्या हाताच्या साह्याने साकारून हनुमान जयंती गोरख बोरसे या चित्रकाराने आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरी केली आहे. रामफळांवर काढलेले चित्राचे फोटो देखील व्हायरल होऊ लागले असून अनोख्या पद्धतीने चित्रकाराने हनुमान जयंती साजरी केल्याचे बोलले जात आहे.

योगेश बोरसे यांनी यापूर्वीही विविध जयंतीच्या निमित्ताने महापुरुषांचे फोटो साकारले आहेत. अनेक वर्षांपासून चित्रकार म्हणून योगेश बोरसे कलाकार म्हणून अनोख्या पद्धतीने जयंती साजरी करणे किंवा शुभेच्छा देण्याचा प्रयत्न करत असतात. त्यापैकीच एक आजचा दिवस होता.

देशभरात हनुमान जयंतीच्या निमित्ताने शुभेच्छा दिल्या जातात. त्यामुळे हनुमान जयंतीला अनोख्या पद्धतीने शुभेच्छा देण्याचा विचार बोरसे यांच्या मनात आला आणि त्यांनी तो सत्यात उतरवला असून त्यानंतर त्याची चर्चा देखील होऊ लागली आहे.

आज संपूर्ण देशात हनुमान जयंती साजरी केली जात आहे. अनेक ठिकाणी हनुमान चालिसा म्हंटली जात आहे. हनुमान जन्मस्थळ असलेल्या नाशिकमध्येही मोठ्या प्रमाणात हनुमान भक्तांनी गर्दी केली आहे. बजरंग बली की जय म्हणत संपूर्ण परिसर जय घोषणे दुमदुमून गेला आहे.