एकीकडे हेल्मेट सक्तीची कारवाई, दुसरीकडे वाहतुक पोलीसांच्या नाक्कावर टिच्चून कोंबून विद्यार्थ्यांची वाहतुक

| Updated on: Dec 03, 2022 | 9:51 AM

नाशिक शहराच्या हद्दीत बहुतांश शाळेत परिवहन समिती कार्यान्वित नाही, समित्या फक्त कागदावरच असल्याचे दिसून येत आहे.

एकीकडे हेल्मेट सक्तीची कारवाई, दुसरीकडे वाहतुक पोलीसांच्या नाक्कावर टिच्चून कोंबून विद्यार्थ्यांची वाहतुक
Image Credit source: Google
Follow us on

नाशिक : नाशिक शहरात 1 डिसेंबर पासून हेल्मेट सक्ती करण्यात आली आहे. त्यासाठी शहर पोलिस दलाचे वाहतुक पोलीस कार्यरत आहे. त्यानुसार ठिकठिकाणी चेकिंग पॉइंट ठरवून देण्यात आले आहे. मात्र, याच पोलीसांच्या समोरून शहरात विविध ठिकाणी विद्यार्थ्यांना अक्षरशः कोंबून वाहतुक केली जात आहे. यामध्ये रिक्षा वाहतुकीचे प्रमाण अधिक आहे. मात्र, आरटीओ विभाग सोडाच वाहतुक पोलीस आणि स्वतः पालक दुर्लक्ष करीत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. अनेक पालक आजही व्यस्त असल्याने मुलं शाळेत सुरक्षित जातात की नाही ? त्यांना शाळेत सोडणारी वाहने कोणती आहे ? याबाबत कुठलीही विचारपूस करीत नसल्याची बाब समोर येत आहे. शाळांच्या परिवहन समित्याही कागदावरच असल्याचे यामधून दिसून येत आहे. आरटीओ विभागाकडून तपासणी केल्याचा दावा केला जातो मात्र त्यांच्या शालेय विद्यार्थ्यांची नियमबाह्य कोंबून होणारी वाहतुक दिसत नाही. एकूणच शहरात असे दोन चित्र दिसत असल्याने सगळं काही रामभरोसेच असल्याचे दिसून येत आहे.

नाशिक शहराच्या हद्दीत बहुतांश शाळेत परिवहन समिती कार्यान्वित नाही, समित्या फक्त कागदावरच असल्याचे दिसून येत आहे.

शहरातील वाहतुक पोलीसांच्या नाक्कावर टिच्चून रिक्षा चालक, बस, व्हॅन विद्यार्थ्यांना अक्षरशः कोंबून विद्यार्थ्यांची वाहतुक करत आहे.

हे सुद्धा वाचा

आरटीओ आणि वाहतुक पोलीस जाणूनबुजून याकडे दुर्लक्ष करतात का ? असा सवालही यानिमित्ताने उपस्थित होण्यास वाव आहे.

शाळेतील परिवहन समित्याही नावालाच असल्याने कदाचित अपघात झाल्यास याला जबाबदार कोण ? पालकही याकडे दुर्लक्ष करीत आहे का ? असे प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.

मागील महिन्यात पोलीस आयुक्तांच्या अध्यक्षेतेखाली झालेल्या बैठकीत सूचना देऊनही दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे.