नाशिककरांवर पाणीकपातीचे संकट, आठवड्यातून एक दिवस पाणी कपातीचा निर्णय घेण्यामागील कारण काय?

नाशिककरांवर यंदाच्या वर्षी पाणी कपातीचे संकट आहे. यामध्ये एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापासून पाणी कपात केली जाणार आहे. त्यात महत्वाची बाब म्हणजे दर महिन्याला आठवड्यातील एक दिवस अधिकची कपात केली जाणार आहे.

नाशिककरांवर पाणीकपातीचे संकट, आठवड्यातून एक दिवस पाणी कपातीचा निर्णय घेण्यामागील कारण काय?
Image Credit source: TV9 Network
Follow us
| Updated on: Mar 28, 2023 | 8:58 AM

नाशिक : धरणांचा जिल्हा म्हणून नाशिक जिल्ह्याची ओळख संपूर्ण राज्यात आहे. सर्वाधिक धरणे आणि पाणीसाठा हा नाशिकमध्ये होत असतो. त्यात महत्वाची बाब म्हणजे मुंबईसह मराठ वाड्यात देखील नाशिकमधील धरणातून पाणी दिले जाते. त्यामुळे नाशिकला मुबलक पाणीसाठा असतो. त्यामुळे शक्यतोवर नाशिककरांवर पाणीबाणीची वेळ येत नाही. मात्र, यंदाच्या वर्षी पाणीकपातीचा निर्णय नाशिक महानगर पालिकेने घेतला असून तसा प्रस्ताव शासनाकडे पाठविला आहे. त्यामुळे यंदाच्या वर्षी आठवड्यातील एक दिवस नाशिकमध्ये पालिकेकडून केला जाणारा पाणी पुरवठा केला जाणार नाहीये. त्यामागील कारण म्हणजे धरणातील पाणी साठा नसून पावसाळा लांबण्याची शक्यता आहे,

यंदाच्या वर्षी जून मध्ये पडणारा पाऊस यंदाच्या वर्षी उशिरा पडू शकतो असं जाणकारांचे मत आहे. त्याचे कारण म्हणजे पॅसिफिक समुद्रात अल निनो वादळ येणार असल्याची माहिती आहे. आणि त्यामुळे जून महिण्यात येणारा पहिल्या पावसाच्या सरी उशिरा दाखल होणार आहे.

याच संपूर्ण पार्श्वभूमीवर नाशिक महानगर पालिकेकडून केला जाणारा पाणीपुरवठा आठवड्यातील एक दिवस बंद केला जाणार आहे. जुलै पर्यन्त जरी पाऊस पडला नाहीतरी नाशिककरांना पाणी पुरेल इतका पाणीसाठा आहे. मात्र, पावसाळा लांबणीवर गेल्यास परिस्थिती बदलू शकते.

हे सुद्धा वाचा

नाशिक महानगर पालिकेत आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या उपस्थित पाण्याच्या संदर्भात बैठक झाली होती. त्यामध्ये सर्व बाजूने माहिती घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. कदाचित पाऊस जून महिण्यात पडला नाहीतर त्यावेळी पाणीकपात करण्यापेक्षा आधीच दोन महीने पाणी कपात करण्याचा निर्णय घेण्याचे ठरविले आहे.

एप्रिलच्या पहिल्या आठवडयापासून ही अंमलबजावणी केली जाणार असल्याची माहिती समोर येत आहे. नाशिक महानगर पालिकेने याबाबत शासनाकडे प्रस्ताव पाठविला आहे. त्यामुळे आठवड्यातील एक दिवस पाणी मिळणार नाही अशी स्थिती पुढील कळत राहणार आहे.

पाणी कपातीच्या संदर्भात नाशिकमध्ये दर महिन्याला बैठक होणार आहे. त्यामध्ये आढावा घेऊन पाणीकपात वाढविणे किंवा कमी करणे असे असणार आहे. मात्र, सध्याची परिस्थिती आणि उपलब्ध महितीनुसार दर महिन्याला पाणी कपातीचा एकद दिवस वाढविला जाणार आहे.

त्यामध्ये एप्रिलमध्ये आठवड्यातील एक दिवस पाणी कपात, त्यानंतर मे महिण्यात दोन दिवस पाणी कपात आणि जून महिण्यात तीन दिवस पाणी कपात केली जाईल असे सध्याचे नियोजन आहे. त्यामुळे यंदाच्या वर्षी नाशिककरांवर पाणीकपातीचे संकट असणार आहे.

Non Stop LIVE Update
तू ज्या शाळेत शिकतो बेटा, त्याचा मी हेडमास्तर; अजित पवारांचा खोचक टोला
तू ज्या शाळेत शिकतो बेटा, त्याचा मी हेडमास्तर; अजित पवारांचा खोचक टोला.
राजसाहेबांचं भाषण झोंबलंय, पिक्चर अभी... मनसे नेत्याचा राऊतांना इशारा
राजसाहेबांचं भाषण झोंबलंय, पिक्चर अभी... मनसे नेत्याचा राऊतांना इशारा.
पैसे मोजताना मी स्वतः...मातोश्रीवरचा तो किस्सा राणेंनी भरसभेत सांगितला
पैसे मोजताना मी स्वतः...मातोश्रीवरचा तो किस्सा राणेंनी भरसभेत सांगितला.
बाप तो बाप... बारामतीत शरद पवारांच्या सभास्थळी टोले लगावणारे बॅनर
बाप तो बाप... बारामतीत शरद पवारांच्या सभास्थळी टोले लगावणारे बॅनर.
माझ्याकडे असा दारूगोळा आहे, पण मी...; उज्ज्वल निकम यांचं सूचक वक्तव्य
माझ्याकडे असा दारूगोळा आहे, पण मी...; उज्ज्वल निकम यांचं सूचक वक्तव्य.
'हेमंत करकरेंना कसाबने नाहीतर RSS समर्थक पोलीस अधिकाऱ्यानं घातली गोळी'
'हेमंत करकरेंना कसाबने नाहीतर RSS समर्थक पोलीस अधिकाऱ्यानं घातली गोळी'.
मतांसाठी कसाबची बाजू... लाज बाळगा; भाजप नेत्याची वडेट्टीवारांवर टीका
मतांसाठी कसाबची बाजू... लाज बाळगा; भाजप नेत्याची वडेट्टीवारांवर टीका.
2004ला दादा मुख्यमंत्री, पवारांनी प्रस्ताव नाकारला, कुणाचा गौप्यस्फोट?
2004ला दादा मुख्यमंत्री, पवारांनी प्रस्ताव नाकारला, कुणाचा गौप्यस्फोट?.
संताच्या ओव्या, अभंग, मोदी..., सोशल मीडियावरील फडणवीसांचा अनोखा प्रचार
संताच्या ओव्या, अभंग, मोदी..., सोशल मीडियावरील फडणवीसांचा अनोखा प्रचार.
ठाकरेंची कशावरून सटकली? 'त्या' वक्तव्यावरून शिंदेंनी लगावला खोचक टोला
ठाकरेंची कशावरून सटकली? 'त्या' वक्तव्यावरून शिंदेंनी लगावला खोचक टोला.