आनंदवार्ताः नाशिक-सुरत विमानसेवा 1 नोव्हेंबरपासून, दिल्लीसाठीही लवकरच मुहूर्त

| Updated on: Oct 28, 2021 | 10:23 AM

नाशिककरांसाठी एक अतिशय आनंददायी बातमी. नाशिक-सुरत विमानसेवा येत्या 1 नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. त्यामुळे व्यापारी वर्गांमध्ये उत्साह आहे.

आनंदवार्ताः नाशिक-सुरत विमानसेवा 1 नोव्हेंबरपासून, दिल्लीसाठीही लवकरच मुहूर्त
संग्रहित छायाचित्र.
Follow us on

नाशिकः नाशिककरांसाठी एक अतिशय आनंददायी बातमी. नाशिक-सुरत विमानसेवा येत्या 1 नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. त्यामुळे व्यापारी वर्गांमध्ये उत्साह आहे.

सध्या नाशिकहून मुंबई, पुणे, बंगळुरू अशी विमानसेवा सुरू आहे. मात्र, सुरतसाठी अशी सोय नव्हती. ही सेवा सुरू करा, अशी व्यापाऱ्यांची मागणी होती. ती आता पूर्ण होणार आहे. नाशिक-सुरत विमानसेवेसाठी स्टार एअर कंपनीने पुढाकार घेतला आहे. सध्या आठवड्यातून दोन दिवस ही सेवा सुरू राहणार आहे. त्यानंतर तिच्या फेऱ्या वाढवल्या जातील, असे कंपनीकडून सांगण्यात आले आहे. आता कोरोना प्रवासाबाबतचे निर्बंधही शिथिल होत आहे. त्यात दिल्लीमध्ये टाइम स्लॉट मिळाल्यानंतर नाशिक-दिल्ली विमानसेवा ही लवकरच सुरू होणार आहे. डबघाईस आलेल्या जेट एअरवेजसोबत इंडिगो कंपनीनेही त्यासाठी तयारी केली आहे.

कोरोनाच्या दोन लाटेने सारे जग हादरून गेले. देशात कडक टाळेबंदी लागू करण्यात आली. महाराष्ट्रातही हेच नियम लागू करण्यात आले. त्यामुळे विमान प्रवास, एसटी प्रवास साऱ्यांवरच बंदी आणण्यात आली. अनेकांना काही तातडीच्या कामासाठी दुसऱ्या जिल्ह्यात जायचे असले तरी पास काढावा लागायचा. आता या निर्बंधात शिथिलता आणण्यात आली आहे. मात्र, अजूनही विमान प्रवास सुरळीत नाही. यात अजून शिथिलता येण्याची गरज आहे. त्यानंतरच विमानसेवा सुरळीत सुरू होणार आहे. दरम्यान, नाशिक येथून सध्या पुणे, बेळगाव, अहमदाबादला विमान सेवा सुरू करण्यात आली आहे. सोबतच स्टार एअर कंपनीची नाशिक-बेळगाव विमानसेवा सुरू आहे. डबघाईस आलेल्या जेट एअरवेजनेही 22 सप्टेंबरपासून सेवा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, त्यांची नाशिक-दिल्ली सेवा पुढील वर्षी सुरू होण्याची शक्यता आहे, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.

इंडिगोही शर्यतीत

जेट एअरवेजची नाशिक-दिल्ली विमानसेवा बंद पडली होती. त्यामुळे दुसऱ्या कंपनीने नाशिक-दिल्ली विमान सुरू करावे, यासाठी यासाठी प्रयत्न करण्यात आले होते. त्यानंतर उडाण योजनेंतर्गत इंडिगो कंपनीला नाशिक-दिल्ली विमान सेवा सुरू करण्यात परवानगी मिळाली. येत्या 25 सप्टेंबरपासून ही सेवा सुरू होणार होती. मात्र, दिल्ली विमानतळावर विमान उतरण्यासाठी आणि उड्डानासाठी कंपनीला अजून तरी वेळ मिळाली नव्हती. नागरी उड्डाण मंत्रालयाची मान्यता मिळाल्यानंतर इंडिगोच्या विमानाचा मार्ग मोकळा होणार आहे. शिवाय कोरोनाचे विमान प्रवास निर्बंध पाहता ही सेवा कधी सुरू होणार, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

दिल्लीला प्रतिसाद

नाशिककरांनी दिल्लीच्या विमान सेवेला उदंड प्रतिसाद दिला होता. पुणे, बेळगाव, अहमदाबादपेक्षाही या विमानात प्रवासी संख्या जास्त होती. नाशिकहून रेल्वेने अडीच-तीन तासांमध्ये मुंबई गाठता येते. मात्र, दिल्लीची तसे नाही. हे पाहता खासदार हेमंत गोडसे यांनीही ही सेवा सुरू करण्यासाठी विशेष प्रयत्न केले आहेत.

इतर बातम्याः

नाशिक महापालिकेतील नगरसेवकांची संख्या 122 वरून 133; मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

CCTV VIDEO | नाशकात शालेय मुलांची रस्त्यात हाणामारी, तलावात बुडवून विद्यार्थ्याची हत्या