नाशिक महापालिकेतील नगरसेवकांची संख्या 122 वरून 133; मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

अखेर नाशिक महापालिकेतील नगरसेवकांची संख्या आता 122 वरून थेट 133 वर नेण्यात आली आहे. तसा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे.

नाशिक महापालिकेतील नगरसेवकांची संख्या 122 वरून 133; मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय
नाशिक महापालिका.
Follow us
| Updated on: Oct 28, 2021 | 10:05 AM

नाशिकः अखेर नाशिक महापालिकेतील नगरसेवकांची संख्या आता 122 वरून थेट 133 वर नेण्यात आली आहे. तसा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे.

नाशिकमध्ये 2012 साली झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी 2011 च्या जनगणनेचा आधार घेण्यात आला. त्यानंतर यावर्षी होणारी जनगणना कोरोनामुळे झाली नाही. त्यामुळे जुन्या जनगणनेनुसार प्रभाग रचना करण्याचे काम सुरू आहे. या काळात शहराच्या लोकसंख्येत साधारणतः साडेतीन चार लाखांची वाढ झाली. सध्या अंदाजे 30 लाखांच्या घरात लोकसंख्या असल्याचे समजते. त्यामुळे शहरात 151 नगरसेवक असावेत, असा प्रस्ताव पाठवण्यात आला होता. मात्र, त्याऐवजी नगरेसवकांची संख्या 122 वरून 133 अशी करण्यात आली आहे. दरम्यान, नगरसेवकांची संख्या वाढचा राजकीय परिणाम अनेकांना महाग पडू शकतो. महाविकास आघाडी नाशिक महापालिकेत आकारास येणार का, याबाबत अजून कोणताही ठोस निर्णय झालेला नाही. ही आघाडी आकाराला आली, तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि भाजपचे सुत जुळू शकते. त्यांची युती होण्याची शक्यता नाकारता येत नाही. जर महाविकास आघाडी आकाराला नाही आली, तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला थोडे जड जाऊ शकते. प्रत्येक ठिकाणी उमेदवार देण्याचीही अडचण होऊ शकते. एकंदर नाशिक महापालिकेच्या निवडणुकीत आता येणाऱ्या काळात रंगत येणार हे मात्र निश्चित.

पुन्हा रचना बदलणार

सध्या नाशिक महापालिकेत एकूण 61 प्रभाग आणि 122 नगरसेवक, तर पाच स्वीकृत नगरसेवक आहेत. सध्याच्या निवडणुकी तीन सदस्यीय प्रभाग रचना आहे. त्यानुसार नाशिकमधील प्रभागांचा कच्चा आराखडा तयार करण्याचे काम 6 ऑक्टोबरपासून सुरू झाले आहे. त्यासाठीनाशिकची 2011 मधील लोकसंख्या डोळ्यांसमोर ठेवून नवीन प्रभाग रचना करावी, अशी सूचना देण्यात आली आहे. सध्याच्या कामानुसार प्रारूप प्रभाग रचना कार्यक्रम दिवाळीनंतरच जाहीर होणार होता. सध्या कच्च्या प्रभागरचेने काम अंतिम टप्प्यात आले आहे. मात्र, आता नगरसेवकांच्या संख्येत बदल झाला आहे. त्यामुळे या रचनेत पुन्हा बदल करावा लागेल. त्यामुळे प्रभाग रचना कार्यक्रमाला विलंब लागू शकतो.

महापालिकेतील सध्याचे पक्षीय बलाबल

भाजप 67 शिवसेना 34 काँग्रेस 6 राष्ट्रवादी 6 मनसे 5 इतर 3

सध्याचे प्रभाग

29 प्रभाग 4 सदस्यीय 2 प्रभाग 3 सदस्यीय

इतर बातम्याः

कृषिमंत्र्यांच्या मतदार संघातील अनुदान वाटपात घोळ; चौकशी समितीचा अहवाल दाबण्याचा प्रयत्न, ठपका ठेवलेल्या दोषींवर कारवाईस टाळाटाळ

पाच महिन्यांपासून निफाडच्या आशा सेविकांचे पगार नाहीत; गोड दिवाळी जाणार कडू, आनंदावर विरजण

15 नोव्हेंबर पर्यंत आधार प्रमाणिकरण करा, अन्यथा कर्जमुक्तीचा लाभ नाही; नाशिकच्या शेतकऱ्यांना आवाहन

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.