AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पाच महिन्यांपासून निफाडच्या आशा सेविकांचे पगार नाहीत; गोड दिवाळी जाणार कडू, आनंदावर विरजण

निफाड तालुक्यातील आशा सेविकांचे गेल्या पाच महिन्यांपासून पगार नाहीत. त्यामुळे दिवाळी कशी साजरी करायची, असा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाला आहे.

पाच महिन्यांपासून निफाडच्या आशा सेविकांचे पगार नाहीत; गोड दिवाळी जाणार कडू, आनंदावर विरजण
संग्रहित छायाचित्र.
| Edited By: | Updated on: Oct 26, 2021 | 3:57 PM
Share

लासलगावः निफाड तालुक्यातील आशा सेविकांचे गेल्या पाच महिन्यांपासून पगार नाहीत. त्यामुळे दिवाळी कशी साजरी करायची, असा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाला आहे.

निफाड तालुक्यातील आशा सेविका कोरोना काळामध्ये आपली सेवा बजावत आहेत. मात्र, ऐन दिवाळीच्या तोंडावर निफाड पंचायत समिती आरोग्य विभागामध्ये काम करणाऱ्या 370 आशा सेविका आणि 18 सुपरवायझर यांचा पगार गेल्या पाच महिन्यांपासून थकला आहे. त्यामुळे दिवाळी सण कसा साजरा करायचा, असा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाल आहे. आम्ही आशा सेविका व गट प्रवर्तक यांनी कोरोना काळात सर्व्हे, लसीकरण केले. मात्र, गेल्या पाच महिन्यांपासून आमचा पगार झालेल्या नसल्याने आमची दिवाळी ही गोड जाण्याऐवजी कडू जायची वेळ आली आहे, अशी खंत आशा गट प्रवर्तक मनीषा खैरनार यांनी व्यक्त केली. निफाड तालुका कोरोना हॉटस्पॉट असताना आशा सेविकांनी कोरोना काळात सेवा बजावली. नुसते काम करू घेतले गेले. मात्र, अजून पगार नाही. तो तातडीन करावा, अशी मागणी आशा सेविका विद्या ताजणे यांनी केली आहे. दरम्यान, आशा सेविका व गटप्रवर्तक यांच्या पगारास तालुका व जिल्हा निधी शिल्लक नसल्याने उशीर झाला आहे. पैसे येताच पगार करू, असे आश्वासन निफाडचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुजित कोशिरे यांनी दिले आहे.

नाशिकमध्ये कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान

महापालिकेतील अधिकारी व कर्मचार्‍यांची दिवाळी यंदा गोड होणार आहे. कारण नाशिक महापालिकेने अधिकारी व कर्मचाऱ्यांना तब्बल 15 हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती महापौर सतीश कुलकर्णी यांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना दिली. नाशिक महापालिकेत जवळपास पाच हजार कर्मचारी आहेत. त्यांना जास्तीत जास्त पस्तीस हजार रुपयांचा बोनस मिळावा अशी मागणी साऱ्याच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी महापालिका आयुक्तांकडे केली होती. मात्र, एकीकडे आधीच महापालिका आर्थिक संकटात आहे. ते पाहता या कर्मचाऱ्यांना पंधरा हजारांचा सानुग्रह अनुदान देण्याची घोषणा महापौर सतीश कुलकर्णी यांनी केली आहे.

मानधनावरील कर्मचाऱ्यांनाही लाभ

नाशिक महापालिका आस्थापनेवरील गट ‘क’ आणि गट ‘ड’ मधील कर्मचाऱ्यांत अंगणवाडी सेविका, मदतनीस, सफाई कामगार यांना हे सानुग्रह अनुदान मिळेल. गट ‘क’ मधील सातव्या वेतन आयोगाच्या लेव्हल – 15 आणि त्यापेक्षा कमी वेतन घेणाऱ्या कर्मचाऱ्यांना या सानुग्रह अनुदान लाभ मिळेल. सोबतच ज्या कर्मचाऱ्यांच्या सहाव्या वेतनमधील बँडमधील वेतनश्रेणी ही 9300-34,800 व ग्रेड पे 4400 रुपयांपेक्षा कमी वेतन घेणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही हे अनुदान मिळेल. गेल्या वर्षीच्या दिवाळीनंतर मानधनावर कार्यरत असणारे अंगणवाडी कर्मचारी, मानधनावर सहा महिन्यांपेक्षा जास्त काळ कार्यरत असणारे कर्मचारी यांनाही सानुग्रह अनुदान मिळेल.

इतर बातम्याः

गब्बर कांदा व्यापाऱ्यांचे कारनामेः 100 कोटींचा ब्लॅकमनी जमीन खरेदीत, नाशिकमधले 26 जण रडारवर 

नाशिककरांचं अनोखं पर्यावरण प्रेमः 100 झाडांनी बहरलेल्या उद्यानाचा जंगी वाढदिवस साजरा!

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.