नाशिक जिल्हा खड्ड्यांचा बालेकिल्ला; महासभेत खराब रस्त्यावरून मोठा राडा, नगरसेवक बँडेज बांधून सभागृहात

Nashik news : नाशिकच्या रस्त्यावरून राजकारण पेटलं आहे. नाशिकच्या महासभेत खराब रस्त्यावरून मोठा राडा झाला.

नाशिक जिल्हा खड्ड्यांचा बालेकिल्ला; महासभेत खराब रस्त्यावरून मोठा राडा, नगरसेवक बँडेज बांधून सभागृहात
| Updated on: Aug 08, 2026 | 1:25 PM

नाशिक जिल्ह्यातील रस्त्यावरील खड्ड्यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. नाशिकमध्ये मागील काही दिवसांत खड्ड्याने 5 बळी घेतले आहेत. खड्ड्यामुळे अपघातात पीडित कुटुंबांनी घरातील कर्ते पुरुष गमावले आहेत. नाशिकमध्ये खड्ड्यामुळे 6 जणांचा बळी गेल्यानंतर अपघात सुरूच असल्याची माहिती मिळत आहे. या घटनेवरून मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांना सुनावलं. राज ठाकरेंच्या दौऱ्यानंतर आता खड्ड्यांवरून नाशिकच्या महापालिकेत हायव्होल्ट्रेज ड्रामा पाहायला मिळाले. ठाकरे गटाच्या नगरसेवकांनी सत्ताधाऱ्यांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

नाशिकच्या खड्ड्यांवरून राजकारण तापल्याचे पाहायला मिळत आहे. या मुद्यांवरून ठाकरे गटाच्या नगरसेवकांनी सत्ताधाऱ्यांविरोधात आक्रमक भूमिका घेतल्याचे समोर आलं आहे. ठाकरेंच्या नगरसेवकांनी महापालिकेतील महासभेत नाशिक जिल्हा खड्ड्यांचा बालेकिल्ला, अशी घोषणाबाजी करत प्रश्नावर लक्ष वेधलं. त्यामुळे नाशिक जिल्हा खड्ड्यांचा बालेकिल्ला, अशी टॅगलाइन ननव्याने चर्चेत आली.

विरोधकांचा आक्रमक पवित्रा 

नाशिकमध्ये खड्ड्यांच्या महासभेला सुरुवात झाल्यानंतर काही वेळातच विरोधी पक्षातील नगरसेवकांनी आक्रमक पवित्रा घेतला. नगरसेवकांनी डोक्याला बँडेज आणि जखमी झालेल्या अवस्थेत निषेध केला. नाशिककरांच्या हतबल आणि जखमी अवस्थेचे प्रतिरूप करत रुग्णवाहिका आणली. नगरसेवकांनी नाशिक जिल्हा खड्ड्यांचा बालेकिल्ला म्हणत मृत्यूमुखी पडलेल्या लोकांना भावपूर्ण श्रद्धांजली दिली.

सत्ताधाऱ्यांकडून पीडित कुटुंबाला मदतीचा हात

खड्ड्यावरून महासभेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप झाल्यानंतर कामकाजाला सुरुवात झाली. यावेळी नाशिकच्या महापौरांनी खड्ड्यांमुळे मृत्यूमुखी पडलेल्या कुटुंबांना महापौरांकडून मदतीचा धनादेश देण्यात आला. महापौरांनी प्रत्येकी 5 लाखांचा धनादेश देण्यात आलाय. नाशिकमधील एकूण 6 कुटुंबीयांना धनादेश देण्यात आला आहे.

मुख्यमंत्र्यांचा ठेकेदारांना अल्टिमेटम 

तत्पूर्वी, नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याची अपूर्ण कामे आणि रस्त्यांवरील खड्ड्यांच्या प्रश्नावर विशेष महासभेवरून काल एक बैठक झाली. मुंबईत खड्डा आणि इतर मुद्द्यावरून मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडली. त्यांनी या बैठकीत कुंभमेळ्याच्या कामांची सुस्त गती आणि खड्ड्यांच्या मुद्द्यावर मुख्यमंत्र्यांनी ठेकेदारांना अल्टिमेटम दिला होता. तर खड्डा बुजवण्यासाठी लागणारा डांबर हे पश्चिम आशियातील युद्धामुळे उपलब्ध होऊ शकले नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी  सांगितले.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us