कोरोनाचा फेरा चुकता चुकेना; नाशिकमध्ये अजून 950 रुग्णांवर उपचार सुरू

| Updated on: Sep 30, 2021 | 3:30 PM

नाशिक जिल्ह्यामध्ये कोरोनाचे रुग्ण कमी व्हायचे नाव घेत नाहीत. सध्या जिल्ह्यात 950 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत जिल्ह्यात 3 लाख 98 हजार 789 कोरोना रुग्णांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.

कोरोनाचा फेरा चुकता चुकेना; नाशिकमध्ये अजून 950 रुग्णांवर उपचार सुरू
संग्रहित छायाचित्र.
Follow us on

नाशिकः नाशिक जिल्ह्यामध्ये कोरोनाचे रुग्ण कमी व्हायचे नाव घेत नाहीत. सध्या जिल्ह्यात 950 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत जिल्ह्यात 3 लाख 98 हजार 789 कोरोना रुग्णांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. आतापर्यंत. 8 हजार 631 रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा नोडल अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली आहे.

सध्या नाशिक ग्रामीणमध्ये नाशिक 56, बागलाण १18, चांदवड 19, देवळा 24, दिंडोरी 28, इगतपुरी 7, कळवण 9, मालेगाव 15, नांदगाव 9, निफाड 126, पेठ 1, सिन्नर 218, त्र्यंबकेश्वर 5, येवला 85 अशा एकूण 620 पॉझिटीव्ह रुग्णांवर ग्रामीण भागात उपचार सुरू आहेत. तसेच नाशिक महानगरपालिका क्षेत्रात 292, मालेगाव महानगरपालिका क्षेत्रात 21 तर जिल्ह्याबाहेरील 17 रुग्ण आहेत. आजपर्यंत जिल्ह्यात 4 लाख 8 हजार 370 रुग्ण आढळून आले आहेत. नाशिक ग्रामीणमध्ये बुधवारी आढळून आलेल्या बाधितांमध्ये नाशिक ग्रामीणमध्ये नाशिक 15, बागलाण 2, चांदवड 1, देवळा 6, दिंडोरी ०२, इगतपुरी ००, कळवण ०२, मालेगाव ०५, निफाड १७, सिन्नर २५ , त्र्यंबकेश्वर 1, येवला 6 असे एकूण 81 पॉझिटीव्ह रुग्ण ग्रामीण भागात आढळून आले आहेत.

रुग्ण बरे होण्याची टक्केवारी

जिल्हयात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी नाशिक ग्रामीणमध्ये 96.89 टक्के, नाशिक शहरात 98.15 टक्के, मालेगाव मध्ये 97.06 टक्के तर जिल्हा बाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण 97.74 टक्के आहे. तसेच जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण 97.65. इतके आहे. नाशिक ग्रामीणमध्ये 4 हजार 166, नाशिक महापालिका क्षेत्रातून 3 हजार 982 मालेगाव महापालिका क्षेत्रातून 357 व जिल्हा बाहेरील 126 अशा एकूण 8 हजार 631 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

का वाढतोय कोरोनाचा विळखा?

नाशिकमध्ये अजूनही कोरोना रुग्णांची आकडेवारी कमी होताना दिसत नाही. सिन्नर आणि निफाड तालुक्यामध्ये रुग्णांची वाढ सातत्याने सुरू आहे. एकीकडे सरकारने शाळा सुरू करण्याची तयारी केली आहे. मात्र, दुसरीकडे कोरोना शून्यावर जायला तयार नाही. कोरोना नियमांचे पालन सध्या कुठेही होताना दिसत नाही. मोठेमोठे खासगी कार्यक्रम जिल्ह्यात होताना दिसतायत. एखाद्या कार्यक्रमाला जेवणावळीसाठी फक्त शंभर जणांच्या उपस्थितीची परवानगी असेल, तर नागरिक दुपारी बारापर्यंत शंभर आणि सायंकाळी शंभर जणांना बोलवातयत. प्रत्येक नियमाला काही ना काही पळवाट आहे. अनेक जण मास्क घालत नाहीत. त्यामुळे रुग्णांची संख्या काही केल्या कमी व्हायला तयार नाही. (950 corona patients undergoing treatment in Nashik)

इतर बातम्याः

देव पावला, सोनं खणखणीत घसरलं; जाणून घ्या नाशिक सराफातले भाव!

Special Report: अहो, नाशिकच काय? गल्लीपासून दिल्लीपर्यंत…नावात बरंच काही आहे!

तडाखेबंद पावसानं नाशिकमध्ये 14 धरणे फुल्ल; वार्षिक सरासरीचा चेंडू सीमेपार!