AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

देव पावला, सोनं खणखणीत घसरलं; जाणून घ्या नाशिक सराफातले भाव!

नाशिकच्या (Nashik) सराफा बाजारपेठेत गुरुवारी (30 सप्टेंबर) सोने चक्क हजार रुपयांनी, तर चांदी तीन हजारांनी स्वस्त झाली.

देव पावला, सोनं खणखणीत घसरलं; जाणून घ्या नाशिक सराफातले भाव!
संग्रहित छायाचित्र.
| Edited By: मनोज कुलकर्णी | Updated on: Sep 30, 2021 | 3:02 PM
Share

नाशिकः नाशिकच्या (Nashik) सराफा बाजारपेठेत गुरुवारी (30 सप्टेंबर) सोने चक्क हजार रुपयांनी, तर चांदी तीन हजारांनी स्वस्त झाली. 24 कॅरेट सोन्याचे (Gold) दर दहा ग्रॅममागे 46000 नोंदवले गेले, तर 22 कॅरेट सोन्याचे दर दहा ग्रॅममागे 44500 नोंदवले.

नाशिकच्या सराफा व्यापऱ्यांनी पुराच्या भीतीमुळे बुधवारी दुकानांची आवराआवर केली होती. त्यामुळे गुरुवारी दुपारी तीनच्या सुमारास इथले व्यवहार सुरळीत सुरू झाले. सोन्याच्या दरात सप्टेंबर महिन्यात किरकोळ चढ-उतार पाहायला मिळते आहे. रोज शंभर ते दोनशे रुपयांनी भाव वाढतात किंवा उतरतात असेच चक्र या महिन्यात सुरू आहे. नाशिकच्या सराफा बाजारात सोमवारी 24 कॅरेट सोन्याचे दर दहा ग्रॅममागे 46600 नोंदवले गेले, तर 22 कॅरेट सोन्याचे दर दहा ग्रॅममागे 44500 नोंदवले. चांदीचे दर किलोमागे 61800 रुपये नोंदवले. मंगळवारी या दरात मोठी चढउतार पाहायला मिळाली नाही. मंगळवारी 24 कॅरेट सोन्याचे दर दहा ग्रॅममागे 46250 नोंदवले गेले, तर 22 कॅरेट सोन्याचे दर दहा ग्रॅममागे 45000 नोंदवले. चांदीचे दर किलोमागे 61000 रुपये होते. बुधवारी 24 कॅरेट सोन्याचे दर दहा ग्रॅममागे 46500 नोंदवले गेले, तर 22 कॅरेट सोन्याचे दर दहा ग्रॅममागे 45500 नोंदवले. चांदीचे दर किलोमागे 62500 रुपये नोंदवले गेले. गुरुवारी सोन्याच्या घसरण पाहायला मिळाली. 24 कॅरेट सोन्याचे दर 500 रुपयांनी घसरून दहा ग्रॅममागे 46000 नोंदवले गेले, तर 22 कॅरेट सोन्याचे दर तब्बल एक हजाराने घसरून दहा ग्रॅममागे 44500 नोंदवले. चांदीचे दर किलोमागे तीन हजारांनी घसरून 59500 रुपये नोंदवले गेले. दरम्यान, सोन्या-चांदीच्या या दरावर तीन टक्के जीएसटी लागू असेल.

दसऱ्याकडे डोळे सराफा व्यापाऱ्यांचे डोळे आता येणाऱ्या दसऱ्याकडे लागले आहेत. साडेतीन मुहूर्तापैकी एक म्हणून दसऱ्याकडे पाहिले जाते. अनेकजण या दिवशी सोन्याची खरेदी करतात. सोन्याच्या अंगठ्या, लॉकेट, नाणे खरेदी करण्यावर ग्राहकांचा भर असतो. यंदा ऑगस्टपर्यंत नाशिकमध्ये म्हणावा तसा पाऊस नव्हता. मात्र, सप्टेंबरमध्ये जोरदार हजेरी लावली. त्यामुळे दसऱ्याला जोरदार उलाढाल होण्याचे संकेत आहेत.

नाशिकच्या सराफा बाजारात गुरुवारी सोन्याची घसरण पाहायला मिळाली. बुधवारी पुराच्या भीतीने अनेक जणांनी दुकानातल्या ऐवजाची आवराआवर केली होती. आता आज दुपारी उशिरा व्यवहार सुरू झाले आहेत. – गिरीश नेवासे, अध्यक्ष, दी नाशिक सराफा असोसिएशन

नाशिकच्या सराफा बाजारपेठेत गुरुवारी 24 कॅरेट सोन्याचे दर दहा ग्रॅममागे 46000 नोंदवले गेले, तर 22 कॅरेट सोन्याचे दर दहा ग्रॅममागे 44500 नोंदवले. येणाऱ्या काळात सोन्याच्या किमती वाढण्याची शक्यता आहे. – चेतन राजापूरकर, डायरेक्टर, इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन, महाराष्ट्र (Gold and silver became cheaper in Nashik’s bullion market)

इतर बातम्याः

Special Report: अहो, नाशिकच काय? गल्लीपासून दिल्लीपर्यंत…नावात बरंच काही आहे!

6 कोटींची उलाढाल ठप्प; नाशिकमध्ये महापुराच्या भीतीनं सराफा बंद

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?