AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का, ५ वेळी आमदार राहिलेल्या या नेत्याने दिला पदाचा राजीनामा

उद्धव ठाकरे हे जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. अशावेळी उद्धव ठाकरे यांना एका मोठ्या नेत्याने धक्का दिला. पाच वेळा आमदार राहिलेल्या नेत्याने पदाचा राजीनामा उद्धव ठाकरे यांना व्हॉट्सअपवर पाठवल्याची माहिती आहे.

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का, ५ वेळी आमदार राहिलेल्या या नेत्याने दिला पदाचा राजीनामा
| Updated on: Sep 10, 2023 | 3:58 PM
Share

चंदन पुजाधिकारी, प्रतिनिधी, नाशिक, १० सप्टेंबर २०२३ : नाशिकमधील एका मोठ्या नेत्याने उद्धव ठाकरे यांना रामराम ठोकला. उद्धव ठाकरे हे जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. असे असताना ठाकरे गटाच्या उपनेत्याने आपल्या पदाचा राजीनामा उद्धव ठाकरे यांना व्हॉट्सअप केला. गेल्या काही दिवसांपासून ते नाराज होते. आपल्याला डावलले जात असल्याचं त्यांना वाटत होतं. त्यामुळे पाच वेळा आमदार राहिलेल्या मोठ्या नेत्याने उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यापासून फारकत घेतली आहे. नाशिकमध्ये उद्धव ठाकरे गटाला आणखी एक धक्का बसला. शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे उपनेते बबनराव घोलप (Babanrao Gholap ) यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. बबनराव घोलप यांनी उद्धव ठाकरे यांना पदाचा राजीनामा व्हॉट्सॲप केल्याची सूत्रांची माहिती आहे. शिर्डीत लोकसभा मतदारसंघात नव्या संपर्कप्रमुखांची निवड केल्याने बबनराव घोलप नाराज असल्याची चर्चा आहे. त्यामुळे त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याची माहिती आहे.

म्हणून होते नाराज

बबनराव घोलप सध्या आउट ऑफ कव्हरेज आहेत. बबनराव घोलप शिर्डी लोकसभा मतदारसंघातून ठाकरे गटाकडून निवडणूक लढवण्यास इच्छुक होते. काही दिवसांपूर्वी शिर्डीचे माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी ठाकरे गटात प्रवेश केला. त्यांची उमेदवारी जवळपास निश्चित मानले जात असल्याने बबनराव घोलप नाराज होते.

पाच वेळा राहिले आमदार

बबनराव घोलप हे माजी मंत्री आहेत. देवळाली मतदारसंघात 5 वेळा आमदार राहिले आहेत. एकीकडे उद्धव ठाकरे उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असतानाच एका मोठ्या नेत्याने पदाचा राजीनामा दिला. नुकत्याच उद्धव ठाकरे यांच्या झालेल्या शिर्डी, संगमनेर दौऱ्यात देखील बबनराव घोलप यांना डावलण्यात आले होते.

बबनराव घोलप यांनी ३० वर्षे एकहाती वर्चस्व ठेवलं. शिवसेनेचे दोन गट झाले. त्यात भाजपची ताकद वाढली. परंतु, तीस वर्षांची सत्ता कायम ठेवण्यासाठी त्यांनी फिल्डिंग लावली होती. आपल्या लेकीला उभं करण्याचं ते स्वप्न पाहत होते. पण, भाऊसाहेब वाकचौरे पक्षात आल्याने ते अस्वस्थ होते. त्यामुळे नाराज झाल्याने त्यांनी राजीनामा दिल्याचं सांगितलं जातं.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.