AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘कॉम्प्रोमाइजचं राजकारण करणं मला शक्य नाही’, पंकजा मुंडे यांचं मोठं विधान

'मला संधी का मिळत नाही, हे संधी न देणारेच सांगू शकतील ', असं विधान पंकजा मुंडे यांनी नाशिकमधील मुलाखतीच्या कार्यक्रमात केलं.

'कॉम्प्रोमाइजचं राजकारण करणं मला शक्य नाही', पंकजा मुंडे यांचं मोठं विधान
पंकजा मुंडे
Chetan Patil
Chetan Patil | Updated on: Jan 08, 2023 | 7:22 PM
Share

चैतन्य अशोक गायकवाड, Tv9 मराठी, नाशिक: विद्यार्थ्यांना करिअर विषयी मार्गदर्शन मिळावे यासाठी नाशिकच्या व्ही प्रोफेशनल्स या संस्थेतर्फे आज आरोग्य विज्ञान विद्यापीठात करिअरबाबत मार्गदर्शनासाठी विशेष चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. या चर्चासत्रात विविध क्षेत्रातील तज्ज्ञ मान्यवरांनी सहभाग घेतला. याच कार्यक्रमात भाजपच्या राष्ट्रीय सचिव माजी मंत्री पंकजा मुंडे यांची मुलाखत घेण्यात आली. यावेळी पंकजा मुंडे यांना त्यांचे वडील गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर पुढचे दशकभराचे राजकारण कसे बघता? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर पंकजा यांनी सविस्तर प्रतिक्रिया दिली.

“मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत पहिल्यांदा मी आमदार झाल्यानंतर सुधीर गाडगीळ यांनी माझी मुलाखत घेतली होती. तेव्हा मी उत्तर दिलं होतं की, ज्या निमित्ताने मी राजकारणात आले, ते करण्यासाठी माझ्या मनात अमुक-अमुक विचार आहे”, असं पकंजा मुंडे म्हणाल्या.

“ज्या गोष्टी मनात बाळगून मी राजकारणात आलेय. त्या गोष्टी समाजासाठी करण्याची जर मला मुभा नसेल, तर कॉम्प्रोमाइजचं राजकारण करणं मला शक्य नाही”, असं स्पष्ट विधान पंकजा यांनी केलं.

“प्रत्येक किलोमीटरवर हायवेवर एक एक्झिट असतो. स्वाभिमानाचा एक्झिट केव्हाही बरा. त्यामुळे राजकारणातून बाहेर पडायची मला भीती वाटत नाही”, असं पंकजा मुंडे यांनी सांगितलं.

“मी आता ज्या उंचीवर आहे, त्या उंचीवर येणं साध्या लोकांना जमत नाही”, असंही पंकजा मुंडे म्हणाल्या.

यावेळी पंकजा मुंडे यांना पक्षाकडून विधान परिषद किंवा इतर ठिकाणी का संधी दिली जात नाही? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर पंकजा यांनी उत्तर देणं टाळलं. “याचे उत्तर मी नाही देऊ शकत. मला संधी न देणारे याचे उत्तर देऊ शकतील”, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.

पंकजा यांना संकट आल्यावर काय करता? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी उत्तर दिलं. “मी फार बोलत नाही. खूप low feel झाल्यावर मी मित्र-मैत्रिणी यांच्याशी बोलते. माझे खूप मित्र आहेत. माधुरी मिसाळ यांना मी माझी मोठी बहीण मानते. त्यांनी खूप खूप मायेचा हात दिलाय”, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.

Follow Us
अखेर दिशा सालियन मृत्यू प्रकरणात CBI FIR दाखल; संशयितांच्या यादीत...
अखेर दिशा सालियन मृत्यू प्रकरणात CBI FIR दाखल; संशयितांच्या यादीत मोठी नावे
परत येईन की नाही, माहीत नाही; मी... मनोज जरांगे अचानक असं का म्हणाले?
परत येईन की नाही, माहीत नाही; मी... मनोज जरांगे अचानक असं का म्हणाले?
Ganeshotsav 2026 : नाशिकमध्ये 27 हजार रुपये किलोचा गोल्डन मोदक चर्चेत,
Ganeshotsav 2026 : नाशिकमध्ये 27 हजार रुपये किलोचा गोल्डन मोदक चर्चेत, खास काय?
मंत्री पंकजा मुंडे यांच्या घरी बाप्पाचे आगमन, छगन भुजबळांनी घेतले अंजी
Ganpati Bappa Morya | मंत्री पंकजा मुंडे यांच्या घरी बाप्पाचे आगमन, छगन भुजबळांनी घेतले अंजीरवाडी मंडळात दर्शन
गणेश चतुर्थीच्या दिवशी संजय राऊतांची बाप्पाकडे खास मागणी; देशावरील ...
Sanjay Raut | गणेश चतुर्थीच्या दिवशी संजय राऊतांची बाप्पाकडे खास मागणी; देशावरील हुकूमशाही...
कोकणात गणेशोत्सवाचा उत्साह! महिलांनी पारंपारिकरित्या डोक्यावरून आणली..
कोकणात गणेशोत्सवाचा उत्साह! महिलांनी पारंपारिकरित्या डोक्यावरून आणली बाप्पांची मूर्ती
लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी पहाटेपासून भाविकांची अलोट गर्दी, शिव...
लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी पहाटेपासून भाविकांची अलोट गर्दी, शिव शंकर थीम ठरतेय आकर्षण
CM देवेंद्र फडणवीस यांचा गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर खास संदेश,
CM देवेंद्र फडणवीस यांचा गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर खास संदेश, ट्वीट करत दिल्या शुभेच्छा
टीव्ही 9 मराठी न्यूजरूममध्ये गणपती बाप्पाची पारंपरिक उत्साहात आरती
टीव्ही 9 मराठी न्यूजरूममध्ये गणपती बाप्पाची पारंपरिक उत्साहात आरती
परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स...
FDA Raid | परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्सचा अन्न परवाना निलंबित