नाशिकमध्ये मंगळवारी गोळाबाराची प्रात्यक्षिके; प्रतिबंधित क्षेत्रात जाण्यास नागरिकांना मनाई

| Updated on: Oct 02, 2021 | 12:45 PM

नाशिक जिल्ह्यात मंगळवारी, पाच ऑक्टोबर रोजी गोळाबाराची प्रात्यक्षिके होणार आहेत. त्यामुळे इगतपुरी आणि नाशिक तालुक्यातील एक्स सेक्टर या ठिकाणी जाण्यास मनाई करण्यात आली आहे.

नाशिकमध्ये मंगळवारी गोळाबाराची प्रात्यक्षिके; प्रतिबंधित क्षेत्रात जाण्यास नागरिकांना मनाई
नाशिक येथील गोळीबार प्रात्यक्षिकाचे संग्रहित छायाचित्र.
Follow us on

नाशिकः नाशिक जिल्ह्यात मंगळवारी, पाच ऑक्टोबर रोजी गोळाबाराची प्रात्यक्षिके होणार आहेत. त्यामुळे इगतपुरी आणि नाशिक तालुक्यातील एक्स सेक्टर या ठिकाणी जाण्यास मनाई करण्यात आली आहे.

जनरल स्टाफ ऑफिसर ट्रेनिंग मुख्यालय तोफखाना यांच्या मार्फत देवळाली कॅम्प आर्टिलरी स्कूल तर्फे इगतपुरी व नाशिक तालुक्यातील एक्स सेक्टर सकाळी 06.00 ते 04.00 या वेळेत गोळीबाराची प्रात्याक्षिके केली जाणार आहे. त्या अनुषंगाने प्रतिबंधित केलेल्या क्षेत्रात नागरिकांनी प्रवेश करू नये, असे आवाहन अपर जिल्हादंडाधिकारी भागवत डोईफोडे यांनी केले आहे. जिल्हादंडाधिकाऱ्यांच्या आवाहनानुसार, इगतपुरी तालुक्यातील टाकेद खुर्द, अधरवड, बेळगाव, तऱ्हाळे, सोनांशी, आडसर खुर्द, वारशिंगवणे, तळवाडी, कावाडदरा, सामनेरे, घोटी खुर्द, लहान घोटीची वाडी, नांदुरवैद्य, टाकेद बुद्रुक, धामनगाव, नांदगाव बुद्रुक, साकुर दमला, बेळगांव कुऱ्हे, मालुंजे, गंभीरवाडी, भरविर खुर्द, लहवित, अस्वली आणि नाशिक तालुक्यातील वंजारवाडी या गावाचे मुलकी हद्दीतील काही भागात तोफांच्या मारा रेषेत येत आहे. संबंधित एक्स सेक्टर या गावातील नागरीकांनी प्रतिबंधित क्षेत्रात जाण्यास सक्त मनाई करण्यात आली असून, या क्षेत्रात जनावरांना जाऊ देवू नये, याबाबत संबंधित गावांमध्ये जाहीर दवंडीही देण्यात आली आहे. प्रतिबंधित करण्यात आलेल्या क्षेत्रात प्रवेश केल्यास प्राण धोक्यात येऊन हानी झाल्यास त्याची जबाबदारी सरकारवर राहणार नाही. सदर सूचनेचा भंग केल्यास त्या व्यक्तिविरुध्द कायदेशीर कार्यवाही केली जाईल, असा इशाराही देण्यात आला आहे.

अन्यथा कडक कारवाई

प्रतिबंधित क्षेत्रात गेल्यास व्यक्तीला गंभीर इजा पोहचू शकतो. एखाद्याचा जीवही जाऊ शकतो. हे पाहता नागरिकांनी स्वतः या भागाकडे अजिबात फिरकू नये. लहान मुले आणि शेतात जाण्यासाठी गेलेल्या व्यक्तींनीही खबरदारी घ्यावी. मनाई केलेल्या वेळेत या भागात कोणी आढळल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशाराही जिल्हादंडाधिकाऱ्यांनी दिला आहे.

नाशिक जिल्ह्यात मंगळवारी, पाच ऑक्टोबर रोजी गोळाबाराची प्रात्यक्षिके होणार आहेत. त्यामुळे इगतपुरी आणि नाशिक तालुक्यातील एक्स सेक्टर या ठिकाणी जाण्यास मनाई करण्यात आली आहे. या सूचनेचा भंग केल्यास त्या व्यक्तिविरुध्द कायदेशीर कार्यवाही केली जाईल.
– भागवत डोईफोडे, जिल्हादंडाधिकारी

इतर बातम्याः

नाशिकमध्ये सोमवारपासून घुमणार प्रार्थनेचे सूर; जिल्ह्यात एकूण 3029 शाळांचा होणार श्रीगणेशा

भुजबळांच्या नावे पुन्हा खणखणले धमकीचे फोन; जिल्हाधिकाऱ्यांच्याही नावाचा वापर

(Demonstrations of firing in Nashik on Tuesday; Citizens are not allowed to enter the restricted area)