AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नाशिकमध्ये सोमवारपासून घुमणार प्रार्थनेचे सूर; जिल्ह्यात एकूण 3029 शाळांचा होणार श्रीगणेशा

अखेर कोरोना संसर्ग कमी झाला आहे असे मानून नाशिक जिल्ह्यात सोमवारपासून शाळांचा श्रीगणेशा होणार आहे. त्यात शहरात 227 तर जिल्ह्यात 2802 अशा एकूण 3029 शाळा सुरू होणार आहेत.

नाशिकमध्ये सोमवारपासून घुमणार प्रार्थनेचे सूर; जिल्ह्यात एकूण 3029 शाळांचा होणार श्रीगणेशा
संग्रहित छायाचित्र.
| Edited By: मनोज कुलकर्णी | Updated on: Oct 02, 2021 | 11:57 AM
Share

नाशिकः अखेर कोरोना संसर्ग कमी झाला आहे असे मानून नाशिक जिल्ह्यात सोमवारपासून शाळांचा श्रीगणेशा होणार आहे. त्यात शहरात 227 तर जिल्ह्यात 2802 अशा एकूण 3029 शाळा सुरू होणार आहेत.

नाशिक जिल्ह्यात सध्याच 618 माध्यमिक शाळा सुरू आहेत. या शाळांमध्ये एकूण विद्यार्थी संख्या 1 लाख 7 हजार 285 आहेत. मात्र, प्रत्यक्षात 62 हजारांच्या जवळपास विद्यार्थीत शाळेत येत आहेत. अनेक पालक अजूनही कोरोनाच्या भीतीमुळे विद्यार्थ्यांना शाळेत पाठवायला तयार नाहीत. सरकारने यापूर्वी ज्या शाळा सुरू केल्या तिथे सॅनिटायझेशन आणि प्रतिबंधात्मक उपायोजना करण्याच्या सूचना केल्या. मात्र, त्यासाठी निधीची तरतूद केली नाही. त्यामुळे या शाळांमध्ये ना सॅनिटायझेशन होते, ना कसली प्रतिबंधात्मक उपाययोजना. या साऱ्या पार्श्वभूमीवर सोमवारी पुन्हा जिल्ह्यात 2802 शाळा सुरू होणार आहेत. त्यात नाशिक शहरात 8 वी ते 12 च्या 227 शाळा आहेत. तर जिल्ह्यातील पाचवीते ते बारावीच्या 2802 शाळांचा समावेश आहे. यासाठी शाळांना भल्या मोठ्या सूचना देण्यात आल्या आहेत.

शिक्षकांना लसीकरणाची सक्ती करा

राज्य सरकारने एकीकडे शाळा सुरू करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. मात्र, जिल्ह्यातील 20 टक्के शिक्षकांनी अजूनही कोरोना लस घेतलेली नाही. त्यामुळे शाळा सुरू होऊन मुलांमध्ये कोरोना पसरल्यास याला जबाबदार कोण, असा सवाल पालकांमधून होत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शिक्षकांना 5 सप्टेंबरपर्यंत लस घेण्याचे निर्देश दिले होते. मात्र, त्यानंतरही अनेक शिक्षकांनी लस घेतली नसल्याचे समजते. अनेकांनी लसीबाबतच्या गैरसमजातून लसीकरणाकडे पाठ फिरवली आहे. काही जणांनी काहीही कारण नसताना चालढकलपणा केला आहे. शिक्षकेतर कर्मचाऱ्यांमध्येही हीच परिस्थिती आहे. विशेष म्हणजे किती शिक्षकांनी लस घेतली याची निश्चित आकडेवारी कुठेही उपलब्ध नाही. त्यामुळे शिक्षकांना कोरोना लसीकरण सक्तीचे करावे, अशी मागणी होत आहे.

नियमांचे पालन नाही

नाशिक जिल्ह्यात कोरोनाची रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. मात्र, नागरिकांनी कोरोनाच्या नियमांकडे पाठ फिरवली आहे. जुन्या नाशिकमधील पंचवटी, रामकुंड परिसरात बाजार असो, की इतर ठिकाणी लोक गर्दी करत आहेत. शालिमार, अशोकस्तंभ, मध्यवर्ती बसस्थानक परिसर, अशोकामार्ग, गंगापूररोड, महात्मानगर, दीपालीनगर, इंदिरानगरसह संपूर्ण शहरातही हीच परिस्थिती आहे. विशेषतः अनेकांनी मास्क वापरणेच बंद केले आहे.

इतर बातम्याः

प्रभाग रचनेविरोधात मनसेची राज्यपालांकडे दाद; राज यांच्या आवाहनानंतर पक्ष आक्रमक, सोमवारी याचिका दाखल करणार

भुजबळांच्या नावे पुन्हा खणखणले धमकीचे फोन; जिल्हाधिकाऱ्यांच्याही नावाचा वापर

(3029 schools to be started in Nashik district from Monday)

Follow Us
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना..
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना भाई है म्हणत...