प्रभाग रचनेविरोधात मनसेची राज्यपालांकडे दाद; राज यांच्या आवाहनानंतर पक्ष आक्रमक, सोमवारी याचिका दाखल करणार

महापालिका प्रभाग रचनेविरोधात जनतेने कोर्टाची पायरी चढावी, असे आवाहन राज ठाकरे यांनी नाशिककरांना केले. मात्र, नागरिकांनी केलेल्या दुर्लक्षामुळे अखेर महाराष्ट्र नवनिर्माण सेनाच आक्रमक झाली असून, त्यांनी या फेररचनेविरोधात थेट राज्यपालांकडे दाद मागितली आहे.

प्रभाग रचनेविरोधात मनसेची राज्यपालांकडे दाद; राज यांच्या आवाहनानंतर पक्ष आक्रमक, सोमवारी याचिका दाखल करणार
राज ठाकरे, मनसेप्रमुख
Follow us
| Updated on: Oct 02, 2021 | 10:43 AM

नाशिकः महापालिका प्रभाग रचनेविरोधात जनतेने कोर्टाची पायरी चढावी, असे आवाहन राज ठाकरे यांनी केले. मात्र, नागरिकांंनी केलेल्या दुर्लक्षामुळे अखेर महाराष्ट्र नवनिर्माण सेनाच आक्रमक झाली असून, त्यांनी या फेररचनेविरोधात थेट राज्यपालांकडे दाद मागितली आहे.

नाशिक महापालिका निवडणुकीसाठी तीन सदस्यीय प्रभाग रचना राहणार आहे. यापूर्वी 2007 च्या निवडणुकीतही तीन सदस्यीय प्रभाग रचना होती. त्याचा फायदा भाजप-शिवसेनेला झाला होता. त्यांच्याच बाजूने मतदारांनी कौल दिला होता. आता यावेळेसही हा फायदा भाजप-शिवसेनेला होईल, अशी शक्यता आहे. विशेषतः नाशिकमध्ये भाजपला बहुसदस्यीय प्रभाग रचना पथ्यावर पडणार आहे. शिवसेनेची खरे तर दोन सदस्यीय प्रभाग रचनेची मागणी होती. मात्र, शिवसेनेचे संघटन कौशल्य आणि हवा निर्माण करण्याच्या पद्धतीमुळे ते सहज तरून जाऊ शकतात. यात खरी कोंडी राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि मनसेची होऊ शकते. कारण प्रत्येक प्रभागात तीन उमेदवार देणे, तितकी चांगली माणसे पक्षात शोधणे, हे आव्हानात्मक मानले जात आहे. खरे तर काँग्रेसचीही दोन सदस्यीय प्रभाग रचनेची मागणी होती. मात्र, त्याची दखल घेतली नाही. शिवाय मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी याप्रकरणी जनतेने कोर्टाची पायरी चढावी, असे आवाहन केले होते. मात्र, नागरिकांनी या आवाहनाला प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे शेवटी नाशिक मनसेने राज्यपाल, मुख्यमंत्री आणि नगरविकास मंत्र्यांकडे पुन्हा एकदा तीन सदस्यीय फेररचनेची मागणी केली आहे. तसे निवेदन यांना दिले आहे. सोबतच मनसेचे जिल्हाध्यक्ष अॅड रतनकुमार इचम यांनी सोमवारी याचिका दाखल करण्याचा इशारा दिला आहे.

पालिकेतील पक्षीय बलाबल

नाशिकमध्ये यापूर्वी फेब्रुवारी 2017 मध्ये महापालिका निवडणुका झाल्या होत्या. त्यावेळी 29 प्रभाग 4 सदस्यांचे आणि 2 प्रभाग 3 सदस्यीय होते. या बहुसदस्यीय प्रभाव पद्धतीचा भाजपला पुरेपुर फायदा झाला. त्यांनी महापालिकेत निर्विवाद सत्ता काबीज केली. महापालिकेच्या एकूण 122 जागांपैकी 67 जागा भाजपने खिशात घातल्या. त्यानंतर शिवसेनेने 34 जागा मिळवत दुसरे स्थान पटकावले होते. काँग्रेस 6 आणि राष्ट्रवादी काँग्रेसलाही अवघ्या 6 जागांवर समाधान मानावे लागले, तर कधीकाळी 39 जागा मिळवून सत्तेत असणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पानिपत होऊन त्यांना फक्त 5 जागा मिळाल्या होत्या.

इच्छुक लागले कामाला

प्रभाग रचनेचा निर्णय झाल्यापासून महापालिका निवडणुकीसाठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेले इच्छुक कामाला लागले आहेत. त्यांनी मतांच्या जमवाजमवीची गणिते मांडायला सुरुवात केली आहे. खरे तर यापूर्वीच अनेकांनी आपापल्या भागातील मतदारांमध्ये संपर्क वाढवायला सुरुवात केली आहे. त्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजनही केले जात आहे. आता सारेच चित्र स्पष्ट झाल्याने आगामी काळात या कामाला गती येणार आहे.

इतर बातम्याः

मालेगाव ड्रग तस्करीचा अड्डा; माफियाची शहरात कोट्यवधींचा मालमत्ता, कुत्ता गोळीचा पुरवठा

NetZeroIndia:पर्यावरण संवर्धनासाठी सायकल रॅली; बापू जयंतीनिमित्त आयोजन

(Change the ward structure for municipal elections, MNS demands to the governor, will file a petition in the court)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.