NetZeroIndia:पर्यावरण संवर्धनासाठी सायकल रॅली; बापू जयंतीनिमित्त आयोजन

नाशिक सायकलिस्टस फाऊंडेशनतर्फे पर्यावरण संवर्धनासाठी, गांधी जयंतीनिमित्त नाशिक ते मुंबई सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.

NetZeroIndia:पर्यावरण संवर्धनासाठी सायकल रॅली; बापू जयंतीनिमित्त आयोजन
संग्रहित छायाचित्र.
Follow us
| Updated on: Oct 01, 2021 | 5:59 PM

नाशिकः नाशिक सायकलिस्टस फाऊंडेशनतर्फे पर्यावरण संवर्धनासाठी, गांधी जयंतीनिमित्त नाशिक ते मुंबई सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवारी सकाळी मुंबई नाका येथून या रॅलीस प्रारंभ झाला. लायन्स क्लब ऑफ कॉर्पोरेटचे अध्यक्ष विनय बिरारी आणि गौरी सामाजिक कल्याणकारी संस्थेच्या अध्यक्ष रोहिणी नायडू यांनी या रॅलीला हिरवा झेंडा दाखवला. 75 व्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त तसेच राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त आरोग्य व पर्यावरणाच्या दृष्टीने सायकल चळवळ व्यापक व्हावी म्हणून, NetZeroIndia ही चळवळ भारताचे प्रवेशद्वार गेटवे ऑफ इंडिया येथून सुरू करण्यात आली आहे.

सध्याच्या वातावरणात हरितगृह वायूचे प्रमाण वाढल्याने पृथ्वीचे तापमान वाढत आहे. वातावरणात मोठे बदल घडत आहेत. प्रत्येक नागरिकाने आपले कर्तव्य समजून हरितगृह वायूचे उत्सर्जन कमी करावे. त्यादृष्टीने दैनंदिन जीवनात वाहतुकीचे साधन म्हणून सायकलचा वापर किमान आठवड्यातून एकदा तरी करावा. नाही जमल्यास महिन्यातून एकदा तरी करावा. इलेक्ट्रिक बाईकचा वापर करावा. जेणेकरून प्रदूषण कमी होईल व पर्यावरणाची हानी टळेल. #NetZeroIndia या मोहिमेची दखल शासनाने घेतल्यास नक्कीच नागरिक आठवड्यातून एकदा किंवा किमान महिन्यातून एकदा “नो व्हेइकल डे” पाळतील असे मत नाशिक सायकलीस्टस फाऊंडेशनचे अध्यक्ष राजेंद्र वानखेडे यांनी केले. या राईडमध्ये 25 सायकलिस्ट सहभागी झाले. त्यात आठ महिलांनी देखील उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला. नाशिक ते मुंबई या 190 किमी प्रवास दरम्यान ठिकठिकाणी भेटी घेऊन प्रदूषण कमी करण्यासाठी आपण कशाप्रकारे योगदान देऊ शकतो याबद्दल सायकलिस्ट नागरिकांशी संवाद साधणार आहेत.

शनिवारी सकाळी 7 वाजता गेट वे ऑफ इंडिया येथे मान्यवरांच्या हस्ते “नेट झिरो इंडिया” या मोहिमेस प्रारंभ होईल. या राईडमध्ये राजेंद्र वानखेडे, चंद्रकांत नाईक, रवींद्र दुसाने, डॉ. मनीषा रौंदळ, साधना दुसाने, वैशाली शेलार, राजेश्वर सूर्यवंशी, रियाज अन्सारी, निरंजन जोशी, ऋतुराज वाघ, आनंद गायधनी, अविनाश लोखंडे, दविंदर भेला, किशोर काळे, माधुरी गडाख, मिलिंद इंगळे, नलिनी कड, प्रवीण कोकाटे, चिन्मयी शेलार, ऐश्वर्या वाघ, मोहन देसाई, गणेश माळी, सुरेश डोंगरे हे सहभागी झाले आहेत. याकामी दीपक मोरे, हेमंत खेलूकर, गजानन भावसार व भक्ती दुसाने यांनी सहाय्य केले. (Cycle Rally for Environment Conservation organized from Nashik)

इतर बातम्याः

सोन्याची आभाळाकडे वाटचाल; नाशिक सराफात पुन्हा उसळी!

खूशखबर! नाशिकमध्ये नोकर भरती मेळावा; 4 ऑक्टोबरला आयोजन

Non Stop LIVE Update
अनुज थापनच्या कुटुंबाची उच्च न्यायालयात धाव, सलमानवर कारवाईची मागणी
अनुज थापनच्या कुटुंबाची उच्च न्यायालयात धाव, सलमानवर कारवाईची मागणी.
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?.
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल.
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल.
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला...
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला....
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत.
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'.
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार.
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया.
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?.