नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक पडणार लांबणीवर

| Updated on: Oct 01, 2021 | 1:53 PM

राज्य सहकार व पणन विभागाने कृषी उत्पन्न बाजार समितीला येत्या 23 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक पुन्हा एकदा लांबवणीवर पडली आहे.

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक पडणार लांबणीवर
नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती
Follow us on

नाशिकः राज्य सहकार व पणन विभागाने कृषी उत्पन्न बाजार समितीला येत्या 23 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक पुन्हा एकदा लांबवणीवर पडली आहे.

कोरोनाच्या भयंकर लाटेच्या पार्श्वभूमीवर नाशिक बाजार समितीला यापूर्वी दोनवेळेस मुदतवाढ देण्यात आली आहे. ही मुदवाढही प्रत्येक सहा-सहा महिन्यांची होती. याची मुदत खरे तर 19 ऑगस्टला संपली होती. मात्र, जिल्ह्यात अजूनही निफाड आणि सिन्नर ही शहरे कोरोनासाठी हॉटस्पॉट ठरत आहेत. येथे रोज मोठ्या संख्येने रुग्ण सापडत आहेत. पुन्हा निवडणूक म्हटला की प्रचार आला. त्यामुळे बाजार समितीच्या संचालकांना मुदतवाढ देण्याची मागणी होत होती. सध्याच्या संचालकांनी जिल्हा उपनिबंध कार्यालायला तसा अर्जही दिला होता. हा अर्ज कार्यालयाने पुढे पणन मंडळाकडे पाठवला. त्यानंतर सहकार व पणन विभागाने एक परिपत्रक काढले. त्यात ज्या कृषी उत्पन्न बाजार समितींची मुदत संपली होती, त्यांना 23 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आल्याचे कळवण्यात आले आहे. पणन व वस्त्रोद्योग विभागाचे कार्यासन अधिकारी जयंत भोईर यांनी जिल्हा उपनिबंधक व सर्व बाजार समित्यांना हे पत्र पाठवले आहे.

यांना पाठवल्या आदेशाच्या प्रती

पणन व वस्त्रोद्योग विभागाच्या कार्यासन अधिकाऱ्यांनी या आदेशच्या प्रती सर्व बाजार समित्यांचे सचिव, सर्व जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, सर्व विभागीय सहनिबंधक, राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, कृषी आणि पणन मंडळाचे कार्यकारी संचालक, पुण्याचे पणन संचालक, महाराष्ट्र राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाच्या सचिवांना पाठवल्या आहेत. त्यामुळे नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीची होणारी निवडणूक लांबवणीवर पडल्याचे सिद्ध झाले आहे. सध्या कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची चर्चा आहे. ही भीती एकदा संपली की, निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे.

हायकोर्टाची स्थगिती

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीची मुदतवाढ 19 ऑगस्ट रोजी संपली होती. त्यानंतर येथे प्रशासकांची नियुक्ती करून निवडणुका घेण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या होत्या. मात्र, बाजार समितीप्रकरणी एक याचिका दाखल आहे. या याचिकेच्या सुनावणीत हायकोर्टाने मुख्यमंत्र्यांच्या आदेशाला स्थगिती दिली होती. (Election of Nashik Agricultural Produce Market Committee will be postponed)

इतर बातम्याः

भुजबळ धमकीप्रकरणी दूध का दूध पानी का पानी होणार; आमदार कांदेंसह छोटा राजनच्या पुतण्याला समन्स

आई राजा उदो उदो: नवरात्रोत्सवात वणीचे सप्तश्रृंगी मंदिर 24 तास सुरू; यात्रा रद्द, दर्शनासाठी कडक नियम

आयपीएल बुकीची ‘माया’ पडली महागात; 30 लाखांची लाच घेणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकाला नाशिकमध्ये बेड्या