आयपीएल बुकीची ‘माया’ पडली महागात; 30 लाखांची लाच घेणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकाला नाशिकमध्ये बेड्या

आयपीएल बुकीकडून तीन लाखांची लाच घेणाऱ्या नाशिकच्या वादग्रस्त पोलीस उपनिरीक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने रंगेहात बेड्या ठोकल्या आहेत. महेश शिंदे असे लाचखोर अधिकाऱ्याचे नाव आहे.

आयपीएल बुकीची 'माया' पडली महागात; 30 लाखांची लाच घेणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकाला नाशिकमध्ये बेड्या
संग्रहित छायाचित्र.

नाशिकः आयपीएल बुकीकडून तीन लाखांची लाच घेणाऱ्या नाशिकच्या पोलीस उपनिरीक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने रंगेहात बेड्या ठोकल्या आहेत. महेश शिंदे असे लाचखोर अधिकाऱ्याचे नाव आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, नाशिकच्या ग्रामीण भागात अनेक ठिकाणी आयपीएलच्या क्रिकेट सामन्यांवर सर्रास बेटींग लावली जाते. देवळाली कॅम्प येथील फ्लॅटवरही ही बेटींग सुरू होती. याची माहिती शिंदे याच्या हाती लागली. त्याने या व्यक्तींवर कारवाई करण्याऐवजी बुकीकडे चार लाखांच्या लाचेची मागणी केली होती. मात्र, त्यात तोडपाणी होऊन तीन लाख रुपये देण्याचे ठरले. याची कुणकुण लाचलुचपत प्रतिबंधक पथकाला लागली. त्यांनी सापळा रचना. संजय खराटे या व्यक्तीकडून तीन लाखांची लाच घेताना पोलीस उपनिरीक्षक महेश शिंदेला बेड्या ठोकल्या. दरम्यान, पोलिसांनी याप्रकरणी पुढील तपास सुरू केला आहे. ग्रामीण भागात बेटींग जाळे मोठ्या प्रमाणात पसरले आहे. त्यामुळे कारवाईने जोर पकडला, तर याची पाळेमुळे खणणे पोलिसांना सहज शक्य आहे.

शिंदेचे झाले होते निलंबन

महेश शिंदे हा वादग्रस्त पोलीस अधिकारी आहे. तो हिरावाडी येथे राहतो. त्याने सातपूर येथील निखिल गवळी खून प्रकरणावर संशयितांना मदत केली होती. पोलीस तपासात हे निष्पन्नही झाले होते. त्यामुळे तत्कालीन उपनिरीक्षक कुलवंतकुमार सरंगल यांनीत्याचे निलंबन केले होते. त्यानंतर त्याची उपनगर, मध्यवर्ती गुन्हे शाखेमध्ये नियुक्ती करण्यात आली होती. तिथून त्याने ग्रामीण पोलीस दलात बदलीसाठी जुगाड जमवले. येथील जिल्हा अधीक्षकांकडून गुन्हे शाखेत स्वतःची वर्णी लावून घेतली असल्याची दबक्या आवाजात पोलिस वर्तुळात चर्चा आहे.

पोलिसात खळबळ; प्रतिमा डागाळली

महेश शिंदेला बेड्या ठोकल्याचे कळताच पोलीस दलात खळबळ निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे या कारवाईने पोलीस दलाची प्रतिमाही डागाळली आहे. शिंदे पूर्वीपासून वादग्रस्त पोलीस अधिकारी आहे. निलंबन होऊनची त्याची गुन्हे शाखेत वर्णी लागल्याबद्दल आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. पोलिसांनी वेगवान तपास केला, तर बेटींगची साखळी उद्धवस्त होऊ शकते. (30 lakh bribe taken in Nashik, police sub-inspector arrested)

इतर बातम्याः

आई राजा उदो उदो: नवरात्रोत्सवात वणीचे सप्तश्रृंगी मंदिर 24 तास सुरू; यात्रा रद्द, दर्शनासाठी कडक नियम

भुजबळ धमकीप्रकरणी दूध का दूध पानी का पानी होणार; आमदार कांदेंसह छोटा राजनच्या पुतण्याला समन्स

नाशिक येथे कृषी भवन उभारणार; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI