दसऱ्याच्या तोंडावर खूशखबर, सोनं पुन्हा झालंय स्वस्त!

नाशिकमध्ये शनिवारी सोने पुन्हा स्वस्त झाले. चोवीस कॅरेट सोन्याचे दर 10 ग्राम 47,000 रुपये, तर बावीस कॅरेट सोन्याचे दर 10 ग्राम 45,170 रुपये नोंदवले गेले.

दसऱ्याच्या तोंडावर खूशखबर, सोनं पुन्हा झालंय स्वस्त!
संग्रहित छायाचित्र.
Follow us
| Updated on: Oct 09, 2021 | 3:44 PM

नाशिकः नाशिकमध्ये शनिवारी सोने पुन्हा स्वस्त झाले. चोवीस कॅरेट सोन्याचे दर 10 ग्राम 47,000 रुपये, तर बावीस कॅरेट सोन्याचे दर 10 ग्राम 45,170 रुपये नोंदवले गेले.

दसऱ्याच्या तोंडावर सराफा बाजारात नाशिकमध्ये रोज जोरदार उलाढाल होताना दिसत आहे. विशेष म्हणजे सप्टेंबर महिन्यापासून सोन्याचे दर स्वस्तच झाले आहेत. 1 सप्टेंबर रोजी नाशिकमध्ये चोवीस कॅरेट सोन्याचे दर 48,810, तर बावीस कॅरेट सोन्याचे दर हे 45,590 होते. त्या तुलनेत ऑक्टोबर महिन्यात अजूनही सोन्याचे दर स्वस्त आहेत. शनिवारी चोवीस कॅरेट सोन्याचे दर 10 ग्राम 47,000 रुपये, तर बावीस कॅरेट सोन्याचे दर 10 ग्राम 45,170 रुपये नोंदवले गेले. दरम्यान, आता सराफा व्यापाऱ्यांचे डोळे येणाऱ्या दसरा आणि दिवाळी सणाकडे लागले आहेत. साडेतीन मुहूर्तापैकी एक म्हणून दसऱ्याकडे पाहिले जाते. अनेकजण या दिवशी सोन्याची खरेदी करतात. सोन्याच्या अंगठ्या, लॉकेट, नाणे खरेदी करण्यावर ग्राहकांचा भर असतो. यंदा ऑगस्टपर्यंत नाशिकमध्ये म्हणावा तसा पाऊस नव्हता. मात्र, सप्टेंबरमध्ये जोरदार हजेरी लावली. त्यामुळे दसऱ्याला जोरदार उलाढाल होण्याचे संकेत आहेत. दरम्यान, पुढच्या काही वर्षांत सोन्याच्या किमती आभाळाला टेकणार असल्याचा असा अंदाज बहुतांश जाणकारांनी वर्तविला आहे.

एचडीएफसी सिक्योरिटीजच्या तज्ज्ञांच्या मते, पुढच्या 3 ते 5 वर्षांत सोन्याचा दर आताच्या तुलनेत दुप्पट होऊ शकतो. तर पुढच्या 5 वर्षांत 10 ग्रॅम सोन्याचा दर 90 हजारांवर जाऊन पोहोचेल, असे संकेत क्‍वाड्रिगा इग्नियो फंडकडून देण्यात आले आहेत. याच काळात आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोन्याचा दर प्रतिऔंस 3000 ते 5000 डॉलर्स इतका असू शकतो. कोरोनाच्या पार्श्वभूमवीर अनेक देशांमध्ये आर्थिक पॅकेजेस दिली जात आहेत. मात्र, त्यामुळे मध्यवर्ती बँकांची अवस्था बिकट होऊ शकते. परिणामी आगामी काळात सोन्याचे दर अक्षरश: गगनाला भिडू शकतात, असे क्‍वाड्रिगा इग्नियो फंडकडून सांगण्यात आले आहे.

सोने खरेदी करण्यासाठी आता तुम्हाला दुकानात जाण्याची गरज नाही. कारण आपण दररोज पैसे ट्रान्सफर करण्यासाठी वापरत असलेल्या ‘गुगल पे’ वरुनही आता सोनं खरेदी करता येईल. एवढेच नव्हे तर ‘गुगल पे’वर सोने साठवून ठेवण्याचीही सुविधा असेल. त्यामुळे तुम्हाला घरात सोनं ठेवण्याची जोखीमही पत्करावी लागणार नाही.

इतर बातम्याः

शिवारतुंबव्या पावसाचे नाशिकमध्ये थैमान; गोडबार छाटणीपूर्वीच द्राक्षबागांवर नांगर, पिकांचा चिखल अन् शेताचे तळे!

कृषिमंत्री दादा भुसे यांच्या मुलाच्या उपस्थितीत अल्पवयीन मुलीचं लावलं लग्न; भाजप नेत्या चित्रा वाघ यांची कारवाईची मागणी

बाहेर पडताना जरा जपून, उत्तर महाराष्ट्राला आज वादळी पावसाचा तडाखा बसण्याची शक्यता!

Non Stop LIVE Update
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास.
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?.
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.