कृषिमंत्री दादा भुसे यांच्या मुलाच्या उपस्थितीत अल्पवयीन मुलीचं लावलं लग्न; भाजप नेत्या चित्रा वाघ यांची कारवाईची मागणी

कृषिमंत्री दादा भुसे यांच्या मुलाच्या उपस्थितीत मालेगाव डोंगराळे येथे एका अल्पवयीन मुलीचे लग्न लावण्यात आल्याचा आरोप होत असून, याप्रकरणी कारवाईची मागणी करत एका व्यक्तीने बेमुदत उपोषणाचा इशारा दिला आहे. तर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनीही कारवाईची मागणी केली आहे.

कृषिमंत्री दादा भुसे यांच्या मुलाच्या उपस्थितीत अल्पवयीन मुलीचं लावलं लग्न; भाजप नेत्या चित्रा वाघ यांची कारवाईची मागणी
संग्रहित छायाचित्र.


नाशिकः कृषिमंत्री दादा भुसे यांच्या मुलाच्या उपस्थितीत मालेगाव डोंगराळे येथे एका अल्पवयीन मुलीचे लग्न लावण्यात आल्याचा आरोप होत असून, याप्रकरणी कारवाईची मागणी करत एका व्यक्तीने बेमुदत उपोषणाचा इशारा दिला आहे. तर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनीही कारवाईची मागणी केली आहे. त्यामुळे हे प्रकरण जिल्ह्यात चर्चेचा विषय झाले आहे.

या बहुचर्चित घटनेची सविस्तर माहती अशी की, मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथे एका तीस वर्षीय तरुणाचा विवाह नुकताच म्हणजे महिनाभरापूर्वी 30 ऑगस्ट रोजी पार पडला. याबाबत रत्नागिरी येथील अशोक पाटील या व्यक्तीने 25 सप्टेंबर रोजी पोलिस ठाण्यात एक तक्रार दिली आहे. या तक्रार अर्जात म्हटले आहे की, मालेगाव तालुक्यातल्या डोंगराळे येथे महिन्यापूर्वी झालेला विवाह बालविवाह आहे. याप्रकरणी लग्न लावणाऱ्यांविरुद्ध कारवाई करावी. ही कारवाई नाही झाल्यास आपण बेमुदत उपोषण करणार आहोत, असा इशारा संबंधितांनी दिला आहे. या वादात भाजप नेत्या चित्रा वाघ यांनीही उडी घेतली आहे. त्यांनी या लग्न सोहळ्यास कृषिमंत्री दादा भुसे यांचा मुलगा उपस्थित असल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली आहे. याबाबत कृषिमंत्री दादा भुसे यांच्या मुलाशी दूरध्वनीवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो होऊ शकला नाही. त्यामुळे त्यांचे म्हणणे समजू शकले नाही.

नगरमध्येही घडली होती घटना…

अहमदनगर जिल्ह्यात नुकतीच एक विचित्र घटना समोर आली आहे. आई-वडिलांनीच एका 14 वर्षीय मुलीचं लग्न लावून दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मुलगी गर्भवती झाल्यानंतर तिला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यानंतर जिल्हा रुग्णालयाच्या डॉक्टरांच्या निदर्शनास ही बाब आली. डॉक्टरांनी या प्रकरणाची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी या प्रकरणी मुलीच्या आई-वडिलांवर गुन्हा दाखल केला आहे. नगर तालुक्यातील एका गावात 2020 साली अल्पवयीन मुलीचे तिच्याच आई-वडिलांनी लग्न लावून दिले. लग्न झाल्यानंतर काही महिन्यातच तिला गर्भधारणा झाली. त्यामुळे तिला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. यावेळी मुलगी अल्पवयीन असल्याचे डॉक्टरांच्या निदर्शनास आले. त्यांनतर डॉक्टरांनी सर्व प्रकार MIDC पोलिसांना सांगितला. दरम्यान या प्रकरणी MIDC पोलीस ठाण्यात मुलीचे आई-वडील, पती आणि सासू-सासरे यांच्याविरोधात अत्याचार, पोस्को आणि बालविवाह प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.

इतर बातम्याः

शिवारतुंबव्या पावसाचे नाशिकमध्ये थैमान; गोडबार छाटणीपूर्वीच द्राक्षबागांवर नांगर, पिकांचा चिखल अन् शेताचे तळे!

नाशिकमध्ये साहित्य संमेलन होणारच; नोव्हेंबरच्या तारखांची चाचपणी

नको, नको म्हणतानाही बहाद्दराने पुरात घातली गाडी; नाशिकमधली चित्तथरारक घटना!

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI