हनुमानाचा जन्म कुठे झाला? नाशिकची अंजनेरी पुन्हा चर्चेत! महंत गोविंदानंदाचं अभ्यासकांना आव्हान

| Updated on: May 28, 2022 | 9:12 AM

Hanuman Birth Place controversy :अंजनेरी हे ठिकाण नाशिक जिल्ह्यातील त्रंबकेश्वर तालुक्यात आहे. या तालुक्यात एका डोंगराला अंजनेरी असं नाव देण्यात आलेलं आहे.

हनुमानाचा जन्म कुठे झाला? नाशिकची अंजनेरी पुन्हा चर्चेत! महंत गोविंदानंदाचं अभ्यासकांना आव्हान
मंदत गोविंदानंद आणि हनुमानाची प्रतिकृती
Image Credit source: TV9 Marathi
Follow us on

नाशिक : अयोध्या, ज्ञानवापी, काशी यानंतर आता हनुमान जन्मस्थळाचा (Hanuman Birth place controversy) वाद पुन्हा उफाळून आलाय. हनुमानाचा जन्म अंजनेरीमध्ये झाल्याचा दावा करण्यात आला होता. यावरुन महंत गोविंदानंद (Mahant Govidanand) आक्रमक झालेत. त्यांनी थेट नाशिकच्या पुरोहित आणि अभ्यासकांना आव्हान दिलंय. नाशिकच्या अंजनेरीमध्ये हनुमानाचं जन्मस्थळ असल्याचा पुरावा द्या, असं आव्हानं गोविंदानंद यांनी दिलंय. हनुमानाच्या जन्मस्थळावर कोणाशीही आणि कोणत्याही चर्चेसाठी तयार असल्याचा दावा गोविंदानंद यांनी केला आहे. हनुमानाचा (Lord Hanuman) जन्म हा किष्किंधामध्येच झाल्याच दावा महंत गोविंदानंद यांनी केलाय. त्यावरुन चर्चेचं आव्हान देत महंत गोविंदानंद हे त्रंबकेश्वरमध्ये दाखल झालेत.

काय आहे प्रकरण?

नाशिकमध्ये अंजनेरी पर्वत नावाचं ठिकाण आहे. या ठिकाणी हनुमानाचा जन्म झाला, असा विश्वास अनेक भाविक व्यक्त करतात. अंजनेरी इथं हनुमानाचं एक मंदिर आहे. अंजनीपुत्र अशी ख्याती असलेल्या हनुमानाचा जन्म याच नाशिकच्या अंजनेरी पर्वतावर झाला, असा एक युक्तिवाद केला होता. त्यावरुन वाद निर्माण झाला आहे. हनुमानाचा जन्म अंजनेरी पर्वतावर झालेला नाही, असं म्हणत महंत गोविंदानंद यांनी म्हटलंय. हनुमानाचा जन्म हा किष्किंधामध्येच झाल्याचा दावादेखील त्यांनी केलेला आहे.

अंजनेरी हे ठिकाण नाशिक जिल्ह्यातील त्रंबकेश्वर तालुक्यात आहे. या तालुक्यात एका डोंगराला अंजनेरी असं नाव देण्यात आलेलं आहे. या डोंगरावर हनुमानाप्रमाणे अंजनीमातेचंही मंदिर आहे. नाशिकमधील पंचवटीत राम-सीता-लक्ष्मण राहत होते, अशी श्रद्ध महाराष्ट्रातल्या काही लोकांची आहे. हनुमानाचा जन्मही अंजनेरीच्या डोंगरावर झाल्याचाही विश्वास भाविकांकडून व्यक्त केला जातो.

हे सुद्धा वाचा

पाहा काय म्हणाले गोविंदानंद?

2020 पासून वाद!

नाशिकमध्ये हनुमानाचा जन्म झाला की नाही, याआधीच दोन राज्यांत हनुमानाच्या जन्मस्थळावरुन वाद झाल्याचं बघायला मिळालेलं होतं. दक्षिणेतील आंध्र प्रदेश आणि कर्नाटक यांच्या हनुमानच्या जन्मस्थळावरुन वाद झालेला होता. हनुमानाचा जन्म हंपीजवळच्या किष्किंधामधल्या अंजनाद्री टेकट्यांमध्ये झाल्याचा दावा कर्नाटककडून केला गेलाय. तर आंध्र प्रदेशनं तिरुमलाच्या सात टेकड्यांमध्ये अर्थात सप्तगिरीत असलेल्या अंजनाद्रीमध्ये हनुमानाचा जन्म झाला, असा दावा केलाय.

नाशिकचा हनुमान कनेक्शन काय?

नाशिकचा आणि हनुमान जन्मस्थळाचा एकमेकांशी काय संबंध असाही एक सवाल आता उपस्थित होतो. याचा एकसमान धागा नावात दडलेला आहे. हनुमानाची आजी अर्थात अंजनी यांच्या नावाचं साधर्म्य नाशिकसोबत अन्य दोन ठिकाणी सुरु असलेल्या हनुमानाच्या जन्मस्थळावरुन दिसून आलं आहे. अंजनेरी, अंजनाद्री आणि अजेयानाद्री अशा तीन नावांमध्ये अंजनीचं नाव आल्यानं वादा छेडला गेलाय. दरम्यान, बीबीसी मराठीवर प्रसिद्ध झालेल्या अनघा पाठक यांच्या रिपोर्टनुसार, हनुमानाचं जन्मस्थळ नेमकं कोणतं? याचे कोणतेही ठोस पुरावे नसल्याचं मत जाणकारांनी व्यक्त केलंय.