Leopard Attack : बिबट्या घरात घुसून शिकार करीत असल्यामुळे नागरिकांमध्ये भीती, आतापर्यंत पाच शिकार, सीसीटीव्ही पाहून…

सुरुवातीला बिबट्या एका कोपऱ्यातून अंगणात प्रवेश करतो. त्यानंतर तिथं भक्ष्याचा शोध घेत असतो. परंतु त्याला काहीचं दिसत नसल्यामुळे तो तिथं असलेल्या झोपडीत घुसतो.

Leopard Attack : बिबट्या घरात घुसून शिकार करीत असल्यामुळे नागरिकांमध्ये भीती, आतापर्यंत पाच शिकार, सीसीटीव्ही पाहून...
Leopard Attack
Image Credit source: tv9marathi
| Updated on: Jan 31, 2023 | 2:14 PM

नाशिक : नाशिकच्या निफाड (Nashik Nifad) तालुक्यातील म्हाळसाकोरे येथे सात वर्षांच्या चिमुकल्याची शिकार करत ठार केल्याची घटना ताजी असताना, दुसऱ्याच दिवशी निफाड तालुक्यातीलचं रसलपूर येथे बिबट्याने (Leopard Attack) कुत्र्याची शिकार केल्याची घटना घडली आहे. ही शिकार सीसीटीव्हीमध्ये चित्रित झाली आहे. बिबट्याने पाळीव कुत्र्यांची ही पाचवी शिकार केल्याने बिबट्याची दहशत निर्माण झाली आहे. वनविभागाने (Maharashtra Forest Department) या बिबट्याचा बंदोबस्त करत जेरबंद करावा अशी मागणी निवृत्ती भोसले यांच्या सह परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.

मागच्या काही दिवसात बिबट्याचे दर्शन आणि हल्ल्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. निफाड तालुक्यातील म्हाळसाकोरे परिसरात बिबट्याने सात वर्षांच्या मुलाचा जीव घेतला. त्यानंतर तीन शिकारी बिबट्याने केल्या. विशेष म्हणजे सीसीटीव्हीत काल रात्री बिबट्याने एका कुत्र्याला टार्गेट केल्याचं स्पष्ट दिसत आहे.

सुरुवातीला बिबट्या एका कोपऱ्यातून अंगणात प्रवेश करतो. त्यानंतर तिथं भक्ष्याचा शोध घेत असतो. परंतु त्याला काहीचं दिसत नसल्यामुळे तो तिथं असलेल्या झोपडीत घुसतो. त्यानंतर बाहेर आलेल्या कुत्र्यावरती हल्ला करतो आणि त्या कुत्र्याला फरफटत घेऊन जातो. शेतकऱ्यांनी बिबट्याला जेरबंद करावं अशी मागणी केली आहे.