Maharashtra Live Updates : कसब्याच्या जागेवरून महाविकास आघाडीत बिघाडी होण्याची चिन्ह

आयेशा सय्यद, Tv9 मराठी

| Edited By: |

Updated on: Feb 01, 2023 | 6:03 AM

दिवसभरातील महत्वाच्या बातम्या वाचा एका क्लिकवर...

Maharashtra Live Updates : कसब्याच्या जागेवरून महाविकास आघाडीत बिघाडी होण्याची चिन्ह

आज 31 जानेवारी. आजचा दिवस महत्वाचा आहे. आजपासून संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु होतंय. उद्या देशाचा अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. त्याआधी आज सर्व पक्षीय बैठक बोलावण्यात आली आहे. यात अधिवेशन योग्य पद्धतीने चालण्यासाठी सरकारची पक्षाच्या वतीने विरोधकांना आवाहन करण्यात येणार आहे. निवडणूक आयोगापुढे ठाकरे अन् शिंदे गटाने लेखी उत्तर सादर केले आहे. आता लक्ष निवडणूक आयोगाच्या निर्णयाकडे लागले आहे. तसंच राज्यातील राजकीय, सामाजिक बातम्यांचा या लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून आढावा घेणार आहोत. सर्व जिल्ह्यातील घडामोडी, मनोरंजन, अर्थकारणाशी संबंधित बातम्याही तुम्हाला इथे वाचायला मिळतील, एका क्लिकवर…

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
 • 31 Jan 2023 10:01 PM (IST)

  कसब्याच्या जागेवरून महाविकास आघाडीत बिघाडी होण्याची चिन्ह

  पुणे :

  – कसब्याच्या जागेवरून महाविकास आघाडीत बिघाडी होण्याची चिन्ह,

  – कसब्यात पोटनिवडणूक लढवण्यासाठी महाविकास आघाडीत इच्छुकांची गर्दी,

  – काँग्रेसकडून १०, राष्ट्रवादीकडून १० तर ठाकरे गटाकडून दोघेजण इच्छुक

  – उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झालेली असताना उमेदवार अद्याप निश्चित होईना

 • 31 Jan 2023 08:27 PM (IST)

  मुंबई : वादातून युवकाची हत्या

  मिरा रोडच्या एमटीएनएल रोडवर शिल्लक कारणातून वाद

  एका युवकाची हत्या धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली

  युवकाची हत्येच्या आरोपाखाली मिरा रोड पोलिसांनी एकूण नऊ आरोपी गजाआड

  हत्येमध्ये अजून लोक सहभागी होते का याचा तपास मिरा रोड पोलीस करताहेत

  अंकुश राजच्या नातेवाइकांच्या एक आरोपीसोबत पेट्रोल भरण्यासाठी गेला होता

  पेट्रोल पंपावर झालेल्या वादातून अंकुश राजवर जीवघेणे हल्ला केला

 • 31 Jan 2023 05:35 PM (IST)

  किरीट सोमय्या तथ्य नसलेला माणूस; खासदार प्रियंका चतुर्वेदी यांची टीका

  मुंबईः किरीट सोमय्या तथ्य नसलेला माणूस आहे

  किरीट सोमय्यांना अनिल परबांनी तोंडावर दाखवून दिलं

  भाजपनं काही लोकांना सोडलंय कधी हातोडा घेऊन पळतात हे हास्यास्पद आहे

  पत्रकार परिषदा आणि आरोप करणे एवढचं यांचे काम आहे

  सोमय्यांची सीएची पदवी तपासावी लागेल

  शीतल म्हात्रेची अवस्था न घर का न घाट का

  टीव्ही वर येऊन बोललं म्हणजे काम केलं असं दाखवायचं

  दुसऱ्याच्या मानसिक संतुलनावर बोलतात मात्र यांना अक्कलचं नाही

  प्रियंका चतुर्वेदींचा शीतल म्हात्रे यांच्यावर हल्लाबोल

 • 31 Jan 2023 05:28 PM (IST)

  नगर : महिलेवर बिबट्याचा हल्ला

  बिबट्याच्या हल्ल्यात ५० वर्षीय सखुबाई मैड जखमी

  महिलेच्या दोन्ही हातांना गंभीर दुखापत

  आरडाओरडा केल्याने बिबट्याने ठोकली धूम

  संगमनेर तालुक्यातील दरेवाडी येथील आज दुपारची घटना

  महिलेला उपचारासाठी अहमदनगर जिल्हा रुग्णालयात पाठवले

  वन विभागाने पिंजरा लावून बिबट्याला जेरबंद करण्याची स्थानिकांची मागणी

 • 31 Jan 2023 04:35 PM (IST)

  परभणी: स्कॉर्पिओचा टायर फुटल्याने झालेल्या अपघातात 12 जखमी,

  परभणीच्या पाथरी तालुक्यातील घटना

  स्कॉर्पिओचा टायर फुटल्याने झालेल्या अपघातात 12 जखमी

  अपघातात जखमी असलेले सर्व जखमी बीड जिल्ह्यातील माजलगाव येथील

  जखमींना पाथरी ग्रामीण रुग्णालयात प्रथम उपचार

  पुढील उपचारासाठी परभणीत हलवण्यात आले

 • 31 Jan 2023 04:10 PM (IST)

  शिक्षकाची विद्यार्थ्यास बेदम मारहाण

  कल्याणमधील आदर्श हिंदी हायस्कूलमधील धक्कादायक प्रकार

  वर्गातील मुलाबरोबर मस्ती करतो म्हणून शिक्षकाने केली मारहाण

  पाच वर्षाच्या चिमुकल्याला बेदम मारहाण

  मुलावर कल्याण रुक्मिणीबाई रुग्णालयात उपचार सुरू

  महात्मा फुले पोलिसांनी ही गुन्हा दाखल केला.

 • 31 Jan 2023 04:08 PM (IST)

  पुणे : या भागात सभा, मिरवणुकीस निर्बंध

  कसबापेठ मतदारसंघात पूर्वपरवानगी न घेता सभा, मिरवणुका काढण्यास निर्बंध

  पोटनिवडणूकीच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांचे आदेश

  समर्थ, फरासखाना, विश्रामबाग, दत्तवाडी आणि खडक या पाच ठाण्यांच्या हद्दीत निर्बंध

  आदेशाचे उल्लंघन झाल्यास कलम 188 नुसार कारवाई केली जाणार

 • 31 Jan 2023 03:18 PM (IST)

  कल्याणमधील धक्कादायक घटना

  ३२ वर्षीय महिलेकडून 15 वर्षीय अल्पवयीन मुलाचे लैंगिक शोषण

  दारू पाजली, अश्लिल चित्रपट दाखवून लैंगिक शोषण

  सुधारगृहात गेल्यानंतर गुन्हा आला उघडकीस

  कोलशेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, आरोपी महिलेला अटक

 • 31 Jan 2023 03:15 PM (IST)

  मुंबई : दोन बुलेट चोरट्यांना अटक

  मुंबईतील पोलिसांनी बुलेट चोर बंटी बबलीला केली अटक

  नोव्हेंबर ते जानेवारी या कालावधीत दोन्ही बुलेट चोरांनी 3 बुलेट चोरल्या

  चौथी बुलेट चोरीला जाण्यापूर्वीच कस्तुरबा पोलिसांनी त्यांना रंगेहात पकडले

  ही बुलेट २५ हजार रुपयांना विकली होती

  कागदाशिवाय बुलेट बाईक विकत घेणाऱ्यालाही अटक

 • 31 Jan 2023 02:06 PM (IST)

  एमपीएससी चा नवा पॅटर्न २०२५ पासूनच

  पुणे : MPSC चे नवीन नियम 2025 पासून लागू होणार,

  मंत्रिमंडळ बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आंदोलनाची माहिती दिली,

  त्यानंतर इतरही मंत्र्यांनी यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना अवगत केले आणि हे नियम 2025 पासून लागू करण्याची विनंती केली,

  मुख्यमंत्र्यांकडून तत्वतः मान्यता मिळाल्याची माहिती,

  एमपीएससीला राज्य सरकारतर्फे विनंती करण्यात येणार,

  यासंदर्भात लवकरच अधिकृत घोषणा होण्याची शक्यता.

 • 31 Jan 2023 02:00 PM (IST)

  भारताचा क्रिकेटपटू व अष्टपैलू खेळाडू शार्दूल ठाकूर मंत्रालायत दाखल

  मुंबई : शार्दूल ठाकूर घेणार मुख्यमंत्री यांची भेट,

  लग्नाचे निमंत्रण देण्यास आलेची प्राथमिक माहिती.

 • 31 Jan 2023 01:17 PM (IST)

  वसई विरार महापालिकेच्या परिवहन सेवेच्या बस डेपोत उभ्या असणाऱ्या बस ला भीषण आग लागली

  नालासोपारा:-वसई विरार महापालिकेच्या परिवहन सेवेच्या बस डेपोत उभ्या असणाऱ्या बस ला भीषण आग लागली आहे.

  या आगीत कोणतीही जीवित हानी झाली नाही मात्र 4 ते 5 बस पूर्णपणे जळून खाक झाल्या आहेत.

  नालासोपारा पूर्वेकडील सनशाईन टॉवरच्या बाजूला असणाऱ्या वसई विरार परिवहन बस डेपोला आज 12 च्या सुमारास ही भीषण आग लागली आहे

  आज दुपारी 12 च्या सुमारास एका बसला लागली होती. त्यानंतर त्या आगीचा भडका उडाल्याने आजूबाजूच्या 4 ते 5 बस ही या आगीच्या भक्ष्यस्थानी येऊन त्याही जळून खाक झाल्या आहेत.

  ज्या बस ला ही आग लागली त्या बस अनेक दिवसांपासून बस डेपोत उभ्या होत्या. याच बस मध्ये अनेक गर्दुले, दारुडे येऊन बसतात, कोणीतरी सिगारेट ओडून टाकली असावी आणि त्यातूनच ही आग लागली असल्याचा अंदाज स्थानिक रहिवाशांनी वर्तविला आहे.

  वसई विरार शहर महानगरपालिकेच अग्निशमन विभाग घटनास्थळी पोहचले असून आगीवर नियंत्रण मिळवले आहे.

 • 31 Jan 2023 01:14 PM (IST)

  वसई विरार: बस डेपोत उभ्या असणाऱ्या बसला भीषण आग

  वसई विरार महापालिकेच्या परिवहन सेवेच्या बस डेपोत उभ्या असणाऱ्या बसला भीषण आग

  या आगीत कोणतीही जीवितहानी नाही, 4 ते 5 बस पूर्णपणे जळून खाक

  नालासोपारा पूर्वेकडील सनशाईन टॉवरच्या बाजूला असणाऱ्या वसई विरार परिवहन बस डेपोला आज 12 च्या सुमारास भीषण आग

  एका बसला लागली होती. त्यानंतर त्या आगीचा भडका उडाल्याने आजूबाजूच्या 4 ते 5 बस ही या आगीच्या भक्ष्यस्थानी येऊन जळून खाक

  महानगरपालिकेच अग्निशमन विभाग घटनास्थळी पोहचले असून आगीवर नियंत्रण

 • 31 Jan 2023 01:05 PM (IST)

  बॉक्स ऑफिसचा 'बादशहा' Pathaan ; 6 दिवसांत इतक्या कोटी रुपयांची कमाई

  प्रदर्शनानंतर फक्त ६ दिवसांत पठाण सिनेमाने कमावले इतके कोटी रुपये; आकडा ऐकल्यानंतर व्हाल थक्क

  भारतातच नाही तर, परदेशात देखील 'पठाण' सिनेमाता बोलबाला... वाचा सविस्तर

 • 31 Jan 2023 12:56 PM (IST)

  शिवसैनिक म्हाडा ऑफिसमध्ये का घुसले?

  अनिल परब यांचं कार्यालय तोडण्यात आलं. त्याचा जाब विचारण्यासाठी शिवसैनिक म्हाडा ऑफिसमध्ये घुसले आहेत.

 • 31 Jan 2023 12:53 PM (IST)

  शिवसैनिक म्हाडा ऑफिसमध्ये घुसले

  शिवसेना नेते आणि माजी मंत्री अनिल परब यांचं म्हाडा वसाहतीमधील कार्यालय तोडण्यात आलं. त्याचा निषेध करण्यासाठी शिवसैनिक म्हाडा ऑफिसमध्ये घुसले आहेत.

 • 31 Jan 2023 12:51 PM (IST)

  कसबा पोटनिवडणुकीत राष्ट्रीय समाज पक्षाचीही उडी

  पुणे : रासपनं कसबा पोटनिवडणुक लढवावी कार्यकर्त्यांचा आग्रह,

  रासपच्या शहर कार्यकारिणीची आज बैठक,

  बैठकीनंतर महादेव जानकरांना प्रस्ताव पाठवणार,

  महादेव जानकर भाजपला मदत करणार की जागा लढवणार ?

  महादेव जानकर भाजपबरोबर युतीला पाठिंबा देणार का ?

  बालाजी पवार रासपकडून निवडणूक लढवण्यास इच्छुक.

 • 31 Jan 2023 12:02 PM (IST)

  किरीट सोमय्या यांना पोलिसांना अडवले

  अनिल परब यांच्या ऑफिसची पाहणी करण्यासाठी सोमय्या निघाले

  किरीट सोमय्या यांना पोलिसांनी रोखण्याचा प्रयत्न केला

  सोमय्या यांचा पोलिसांशी काही वेळ वाद

  वांद्र परिसरात पोलिसांनी सोमय्या यांना रोखले

  बीकेसीजवळ सोमय्या यांची गाडी अडवली

 • 31 Jan 2023 11:21 AM (IST)

  राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू  यांच्या अभिभाषणाने अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात

  द्रौपदी मुर्मू म्हणाल्या...

  जगाला  हेवा वाटावा, अशी भारताची वाटचाल

  मागील 9 वर्षातील कामामुळे भारताकडे बघण्याचा दृष्टीकोण बदलला

  भारतात वेगवान आणि निडरपणे काम करणारं सरकार सत्तेत

  सबका साथ सबका, सबका विकास हेच मोदी सरकारचं ध्येय

 • 31 Jan 2023 11:04 AM (IST)

  IND vs NZ : मॅच हरल्याची खंत नाही, न्यूझीलंडचा एक खेळाडू खूप पॉझिटिव्ह गोष्ट बोलला

  IND vs NZ : सगळे तक्रार करतायत. पण तो मात्र शिकण्यासारखी गोष्ट बोलून गेला. वाचा सविस्तर....

 • 31 Jan 2023 11:03 AM (IST)

  WOMEN IPL मध्ये 'या' 4 महिला क्रिकेटपटूंवर पडणार पैशांचा पाऊस, फ्रेंचायजींमध्ये लागणार स्पर्धा

  'त्या' चौघींना विकत घेण्यासाठी फ्रेंचायजींमध्ये चुरस दिसून येईल. कोण आहेत त्या? वाचा सविस्तर....

 • 31 Jan 2023 09:49 AM (IST)

  बजेटपूर्वी आर्थिक आघाडीवर मोठा झटका

  2023-24 मध्ये विकासाचा दर 3 वर्षात सर्वात कमी

  अर्थसंकल्पापूर्वीच सरकार इकोनॉमिक सर्व्हे सादर करणार

  सर्व्हेत वाढीचा दर 6 ते 6.8 टक्के राहण्याची शक्यता

  सर्वेक्षणात 2023-24 साठी बेसलाईन ग्रोथ 6.5 टक्के असू शकते

 • 31 Jan 2023 09:47 AM (IST)

  शालेय मुलींना अश्लील फिल्म दाखवणाऱ्या नराधम शिक्षकास अटक

  कोल्हापूर : विजयकुमार बागडी याला पोलिसांनी केली अटक,

  7 पीडित मुलींनी दिली तक्रार,

  राधानगरी पोलिसांनी केली अटक,

  राधानगरी तालुक्यातील शेळेवाडी इथं घडला होता प्रकार.

 • 31 Jan 2023 09:28 AM (IST)

  बालसुधारगृहाच्या भिंतींना शिडी लावत आठही अल्पवयीन आरोपी गेले पळून

  येरवाड्याच्या बाल सुधार गृहातून मध्यरात्री वेगवेगळ्या गुन्ह्यातील ८ विधी संघर्ष बालक सुधारगृहातून पळाले

  बालसुधारगृहाच्या भिंतींना शिडी लावत आठही अल्पवयीन आरोपी गेले पळून

  आठही विधी संघर्षित बालक वेगवेगळ्या टोळीत सदस्य असल्याची प्राथमिक माहिती

  पुण्यातील येरवडा येथे असलेल्या पंडित जवाहरलाल नेहरू बालसुधारगृहात हे आठही विधी संघर्ष बालकांना काही दिवसापूर्वी वेगवेगळ्या गुन्हा प्रकरणात ठेवण्यात आले होते

  काल मध्यरात्री ११ ते १२ च्या सुमारास सुधारगृहाच्या संरक्षण भिंतीला शिडी लावून हे विधी संघर्षित बालक पळवून गेले आहेत

  सुधारगृह तोडून खतरनाक विधी संघर्ष बालक पळाल्याने शहरात एकच खळबळ..पोलीस तपास सुरू

 • 31 Jan 2023 09:27 AM (IST)

  शेतकऱ्यांच्या दूध खरेदी दरातही 2 रुपयांची वाढ करण्याचा निर्णय

  पुणेकरांच कात्रज दूध आणखी 2 रुपयांनी महागलं

  शेतकऱ्यांच्या दूध खरेदी दरातही 2 रुपयांची वाढ करण्याचा निर्णय

  कात्रज दूध संघाच्या संचालक मंडळाच्या बैठकीत निर्णय

  इंधनाचे दर वाढत असल्यानं वाहतूकीचा खर्च वाढला असल्यानं संघाचा निर्णय

  पुणेकरांना कात्रज दूध खरेदी करता लागणार 2 रुपयाची कात्री ..

  1 तारखेपासून नवे दर होणार लागू.

 • 31 Jan 2023 08:56 AM (IST)

  पश्चिम महाराष्ट्रात पक्ष वाढीसाठी मनसेने कंबर कसली

  कोल्हापूर : मनसेचे नेते अमित ठाकरे आज कोल्हापूर दौऱ्यावर,

  थोड्याच वेळात अंबाबाईच दर्शन घेऊन करणार दौऱ्याची सुरुवात,

  अकरा वाजता महाविद्यालय विद्यार्थी विद्यार्थिशी साधणार संवाद,

  महा संपर्क अभियानांतर्गत पदाधिकाऱ्याच्या कामाचा देखील घेणार आढावा.

 • 31 Jan 2023 08:46 AM (IST)

  आज पेट्रोल-डिझेलचा भाव काय

  कच्चा तेलाच्या किंमतीत घसरण

  मुंबईमध्ये पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेलचा दर 94.27 रुपये प्रति लिटर

  अहमदनगर पेट्रोल 106.53 तर डिझेल 93.03 रुपये प्रति लिटर

  अकोल्यात पेट्रोल 106.20 रुपये आणि डिझेल 92.75 रुपये प्रति लिटर

  अमरावतीत 107.61 तर डिझेल 94.11 रुपये प्रति लिटर

  औरंगाबाद 107.62 पेट्रोल आणि डिझेल 94.08 रुपये प्रति लिटर

  नागपूरमध्ये पेट्रोल 106.70 तर डिझेल 93.23 रुपये प्रति लिटर

  नांदेडमध्ये पेट्रोल 108.12 तर डिझेल 94.60 रुपये प्रति लिटर

  जळगावमध्ये पेट्रोल 106.46 आणि डिझेल 92.98 रुपये प्रति लिटर

  नाशिकमध्ये पेट्रोल 107.11 रुपये आणि डिझेल 93.59 रुपये प्रति लिटर

  लातूरमध्ये पेट्रोल 107.89 तर डिझेल 94.36 रुपये प्रति लिटर

  कोल्हापूरमध्ये पेट्रोल 106.90 आणि डिझेल 93.42 रुपये प्रति लिटर

  पुण्यात पेट्रोलचा भाव 106.26 आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर

  सोलापूरमध्ये पेट्रोलचा दर 106.86 रुपये तर डिझेल 93.37 रुपये प्रति लिटर

 • 31 Jan 2023 08:23 AM (IST)

  Jasprit Bumrah vs Shaheen Afridi : 'तुमचा जसप्रीत बुमराह आमच्या शाहीन शाह आफ्रिदीसमोर काहीच नाही'

  कुठल्या पाकिस्तानी क्रिकेटपटूने उधळली ही मुक्ताफळ? वाचा सविस्तर....

 • 31 Jan 2023 08:23 AM (IST)

  IND vs WI : दिप्ती शर्माने वेस्ट इंडिजची वाट लावली, टीम इंडियाचा तुफानी विजय

  IND vs WI : या दोघींच्या बॉलिंगसमोर वेस्ट इंडिजची शरणागती. वाचा सविस्तर....

 • 31 Jan 2023 08:06 AM (IST)

  एमआयएम राज्यातील मोठ्या दलित संघटनेशी आघाडी करण्याची शक्यता

  एमआयएम राज्यातील मोठ्या दलित संघटनेशी आघाडी करण्याची शक्यता

  वंचितचा हात सोडल्यानंतर एमआयएम नव्या दलित संघटनेला सोबत घेणार

  आंबेडकर घराण्यातील व्यक्तीलाच सोबत घेण्यासाठी एमआयएमचे प्रयत्न सुरू

  प्रकाश आंबेडकर यांचे बंधू आनंदराज आंबेडकर यांच्याशी एमआयएम आघाडी करण्याची शक्यता

  एमआयएम कडून आनंदराज आंबेडकर यांना सोबत घेण्याचे प्रयत्न सुरू

  महिना दोन महिन्यांत रिपब्लिकन सेना आणि एमआयएमची आघाडी घोषित होण्याची शक्यता

  एमआयएमच्या अंतर्गत सूत्रांची गोपनीय माहिती

  महापालिका आणि लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर एमआयएम आनंदराज आंबेडकर यांना घेणार सोबत

 • 31 Jan 2023 08:03 AM (IST)

  स्मार्ट सिटीच्या भोंगळ कारभाराविरोधात पर्यावरण प्रेमी आज येणार एकत्र

  नाशिक : रामकुंड परिसरात स्मार्ट सिटी कडून अनेक पुरातन वास्तूंची मोडतोड,

  रामकुंड परिसरातील पुरातन पायऱ्या स्मार्ट सिटी प्रशासनानं तोडल्या,

  सांडव्यावरच्या देवीचे नक्षीकाम असलेले दगडी बांधकाम देखील अद्याप पूर्ण केले नाही,

  संतप्त पर्यावरण आणि गोदाप्रेमी आज स्मार्ट सिटी प्रशासनाला विचारणार जाब.

 • 31 Jan 2023 08:00 AM (IST)

  पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील हाताने गुण देण्याची पद्धत कायमची बंद

  सोलापूर : यापुढे उत्तरपत्रिका तपासणी संगणकावर ऑनस्क्रीन करणार,

  यासाठी जिल्ह्यात 17 केंद्र स्थापन केली असून विषयाचे तज्ञ प्राध्यापक संगणकावर पेपर तपासत आहेत,

  उत्तर पत्रिका तपासणीतील मानवी हस्तक्षेप कमी व्हावा, त्यावर हाताने खाडाखोड करता येऊ नये आणि वेळेची बचत व्हावी यासाठी ही पद्धत अवलंबली आहे,

  यंदा पहिल्यांदाच सर्व अभ्यासक्रमाच्या उत्तरपत्रिकांची संगणकावर ऑन स्क्रीन तपासणी केली जात आहे,

  पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर विद्यापीठाशी जिल्ह्यातील 109 महाविद्यालय संलग्न आहेत.

 • 31 Jan 2023 07:31 AM (IST)

  एमपीएससी विद्यार्थ्यांच पुण्यात आज अराजकीय साष्टांग दंडवत आंदोलन

  एमपीएससी विद्यार्थ्यांच पुण्यात आज अराजकीय साष्टांग दंडवत आंदोलन

  राज्यसेवा परीक्षेतील बदल 2025 पासून लागू करण्याच्या मागणीसाठी एमपीएससीचे विद्यार्थी पुन्हा उतरणार रस्त्यावर

  पुण्यातील अलका टॉकीज चौकात विद्यार्थी करणार आंदोलनं

  आज सकाळी 10 वाजल्यापासून आंदोलनाला सुरुवात होणार आहे

 • 31 Jan 2023 07:29 AM (IST)

  आजपासून संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन

  आजपासून संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन

  दोन टप्प्यांमध्ये 66 दिवस चालणार अधिवेशन

  केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन उद्या देशाचा अर्थसंकल्प मांडणार

  राष्ट्रपतीच्या अभिभाषणाने होणार अधिवेशनाची सुरुवात

  केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यंदाच्या वर्षातील आर्थिक सर्वेक्षण अहवाल संसदेत मांडणार

Published On - Jan 31,2023 7:28 AM

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI