AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs WI : दिप्ती शर्माने वेस्ट इंडिजची वाट लावली, टीम इंडियाचा तुफानी विजय

IND vs WI 3rd T20 : भारताची स्टार गोलंदाज दिप्ती शर्माने सोमवारी वेस्ट इंडिज विरुद्ध जबरदस्त गोलंदाजी केली. संपूर्ण कॅरेबियाई टीमने दिप्तीसमोर शरणागती पत्करली.

IND vs WI : दिप्ती शर्माने वेस्ट इंडिजची वाट लावली, टीम इंडियाचा तुफानी विजय
Dipti sharmaImage Credit source: AFP
| Updated on: Jan 31, 2023 | 7:44 AM
Share

IND vs WI 3rd T20 : भारताची स्टार गोलंदाज दिप्ती शर्माने सोमवारी वेस्ट इंडिज विरुद्ध जबरदस्त गोलंदाजी केली. संपूर्ण कॅरेबियाई टीमने दिप्तीसमोर शरणागती पत्करली. 3 देशांच्या T20 सीरीजमध्ये ग्रुप स्टेजच्या शेवटच्या सामन्यात दिप्ती आणि राजेश्वरील गायकवाडने भेदक गोलंदाजी केली. त्यांनी वेस्ट इंडिजच्या टीमला 94 धावांवर रोखलं. त्यानंतर भारतीय महिला टीमने 13.5 ओव्हर्समध्ये विजयी लक्ष्य गाठलं. टीम इंडियाने 8 विकेटने विजय मिळवला. दिप्तीने 4 ओव्हर्समध्ये 2 मेडनसह 11 रन्स देऊन 3 विकेट काढल्या. राजेश्वरीने चार ओव्हर्समध्ये 9 रन्स देऊन एक विकेट काढला. पूजा वस्त्राकरने चार ओव्हर्समध्ये 19 धावा देऊन 2 विकेट काढल्या. वेस्ट इंडिजसाठी हॅली मॅथ्यूजने सर्वाधिक 34 धावा केल्या. अन्य बॅट्समन भारतीय गोलंदाजीसमोर टिकू शकले नाहीत. संपूर्ण कॅरेबियाई टीमने 20 ओव्हर्समध्ये 6 विकेट गमावून 94 धावा केल्या.

भारताकडून कोणी किती धावा केल्या?

भारत आणि दक्षिण आफ्रिकेच्या टीमने 2 फेब्रुवारीला होणाऱ्या फायनलच तिकीट आधीच पक्क केलं आहे. भारताची सलामीवीर जेमिमा रॉड्रिग्सने 39 चेंडूत नाबाद 42 रन्स केल्या. कॅप्टन हरमनप्रीत कौरने 23चेंडूत नाबाद 32 धावा केल्या. दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 54 धावांची भागीदारी केली. स्मृती मांधनाने 5 आणि हरलीन देओलने 13 धावा केल्या.

दिप्तीची जबरदस्त गोलंदाजी

टीम इंडियाची कॅप्टन हरमनप्रीत कौरने टॉस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय बॉलर्सनी हा निर्णय योग्य ठरवला. वेस्ट इंडिजच्या फलंदाजांवर सुरुवातीपासून दबाव ठेवला. रेणुका सिंह आणि शिखा पांडेंने सुरुवातीच्या 3 ओव्हर टाकल्या. त्यानंतर कॅप्टन हरमनप्रीतने दिप्तीच्या हाती चेंडू सोपवला. तिने चौथ्या ओव्हरमध्ये एकही धाव न देता सलग दोन चेंडूंवर रशादा विलियम्स (8) आणि शमॅन कॅम्पबेलची (0) विकेट काढली. तिने कॅप्टनचा विश्वास सार्थ ठरवला. 4 ओव्हरमध्ये दिल्या अवघ्या 5 रन्स

एकाबाजूने दिप्ती आणि दुसऱ्याबाजूने राजेश्वरीने आघाडी संभाळली. 9 व्या ओव्हरमध्ये राजेश्वरीने जेनाबा जोशेफची विकेट काढली. त्यानंतर पूजा वस्त्राकारने वेस्ट इंडिजची कॅप्टन मॅथ्यूजचा विकेट काढला. वेस्ट इंडिजची टीम 12 व्या ते 15 व्या ओव्हर दरम्यान फक्त 5 धावा करु शकली. 18 व्या ओव्हरच्या दुसऱ्या चेंडूवर दिप्तीने शबिका गजनबीला स्टम्पआऊट केलं. डावाच्या अखेरच्या चेंडूवर आलियाला वस्त्राकारने बाद केलं.

फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.