इगतपुरी आणि कसारादरम्यान होणार सर्वात मोठा बोगदा, इंजिन्स बँकरची कटकट आता मिटणार…

कसारा-इगतपुरी घाटातील हा महत्वाचा प्रकल्प मार्गी लागला तर रेल्वेची इंजिन्स बँकर लावण्याची कटकट मिटणार आहे. मालगाड्यांना घाट चढण्यासाठी इंजिन्स बँकर लावावे लागते. अप, मिडल बोगदे तंत्रज्ञानाच्या मदतीने बांधण्याची योजना रेल्वेने आखली आहे.

इगतपुरी आणि कसारादरम्यान होणार सर्वात मोठा बोगदा, इंजिन्स बँकरची कटकट आता मिटणार...
| Edited By: | Updated on: Aug 02, 2022 | 9:23 AM

नाशिक : सह्याद्रीच्या पर्वतरांगामध्ये पाचव्या मार्गिकेसाठी बोगदे (Tunnel) खोदण्याचे काम सध्या सुरू आहे. हा रेल्वेचा अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. हा घाट समुद्रसपाटीपासून तब्बल अडीच हजार फूट उंचीवर असून इथे सध्या ब्रिटिशकालीन तिहेरी मार्गिका (Triple Way) उपलब्ध आहे. या बोगद्यांमुळे घाटात मेलएक्स्प्रेस बँकर इंजिन लावले जाते. या मार्गिकासाठी रेल्वे बोर्डाने सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले आहेत आणि कामही लवकर मार्गी लागण्याची शक्यता आहे. हा डोंगर घाट चढण्यासाठी माल गाड्यांना तब्बल सहा इंजिन्स बँकर (Engines Banker) म्हणून लावले जातात.

कसारा-इगतपुरी घाटातील रेल्वेचा महत्वाचा प्रकल्प मार्गी लागणार

कसारा-इगतपुरी घाटातील हा महत्वाचा प्रकल्प मार्गी लागला तर रेल्वेची इंजिन्स बँकर लावण्याची कटकट मिटणार आहे. मालगाड्यांना घाट चढण्यासाठी इंजिन्स बँकर लावावे लागते. अप, मिडल बोगदे तंत्रज्ञानाच्या मदतीने बांधण्याची योजना रेल्वेने आखली आहे. कसारा घाटातून पुढे तीन फाटे फुटतात. या मार्गाने दिल्ली आणि उत्तरप्रदेशला जाता येते. मुंबई ते भुसावळ दोन अतिरिक्त मार्ग बांधण्याचे रेल्वे ठरवले आहे. यामुळे प्रवाशांची वेळेची देखील मोठी बचत होणार आहे.

हा देशातील सर्वात मोठा बोगदा देखील ठरणार

घाटातून जाणारा हा मार्ग खूप जास्त उंचावर आहे. त्यामुळे चढ कापण्यासाठी बोगदे बांधण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे रेल्वे विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. फायनल लोकेशन सर्व्हेलारेल्वे बोर्डाने मंजुरी देखील दिली आहे. आता जो घाटात मार्ग आहे तो प्रचंड चढ उताराचा आहे. कसारा येथे घाट चढण्यासाठी तर बँकर इंजिन लावावे लागते. गाडी ओढण्यासाठी नेहमीच या मार्गावर अतिरिक्त इंजिनची मदत घ्यावी लागते. रेल्वेचा हा जर महत्त्वाकांक्षी प्रकल्प यशस्वीरित्या पूर्ण झाला तर हा देशातील सर्वात मोठा बोगदा देखील ठरणार आहे.