Cyber crime | नाशिक शहरात सायबर क्राईममध्ये मोठी वाढ, सहा महिन्यांत तब्बल 361 तक्रारी दाखल…

सायबर क्राईममध्ये जरी मोठी वाढ होत असेल आणि गुन्हे देखील नोंद केले जात असतील तरीही तपास करण्यात पोलिसांना असंख्य अडचणी येत असल्याची वस्तुस्थिती आहे. किती मोठी फसवणुक सायबर क्राईममध्ये झाली तरीही त्या आरोपींना पकडण्यात पोलिसांना शक्यतो यश मिळत नाही

Cyber crime | नाशिक शहरात सायबर क्राईममध्ये मोठी वाढ, सहा महिन्यांत तब्बल 361 तक्रारी दाखल...
चंदन पुजाधिकारी

| Edited By: शितल मुंडे, टीव्ही 9 मराठी डिजीटल

Aug 02, 2022 | 8:29 AM

नाशिक : गेल्या काही दिवसांपासून नाशिक (Nashik) शहरात सायबर क्राईममध्ये मोठी वाढ झाल्याचे चित्र बघायला मिळते. इतकेच नाही तर शहर सायबर पोलिसांकडे तक्रारींचा पाऊस पडतोयं. लॉकडाऊननंतरच्या काळापासून सायबर गुन्ह्यांमध्ये (Cyber crime) लक्षणीय वाढ झाल्याचं समोर येतं आहे. फसवणूक, अकाऊंट हॅकिंग, बँकिंग फ्रॉड, नेट बँकिंग अशा सायबर गुन्ह्यांचा यामध्ये प्रामुख्याने समावेश आहे. शहर व परिसरात आर्थिक फसवणूक (financial fraud) होण्याच्या घटनांमध्ये झपाट्याने वाढ झाल्याचे आकडेवारीवरून पुढे येते आहे. धक्कादायक बाब यामध्ये म्हणजे सोशल मीडियाद्वारे पाठलाग करून टार्गेट (Target) केले जातंय.

नाशिक शहरात सायबर क्राईममध्ये मोठी वाढ

नाशिक शहरात सातत्याने वाढणारे सायबर क्राईम पाहुण पोलिसही चक्राहुन गेल्याचे चित्र आहे. सहा महिन्यांत तब्बल 361 तक्रारी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आल्यात. मात्र, हा आकडा अधिक मोठा असण्याची दाट शक्यता आहे. कारण आॅनलाईन पध्दतीने फसवणूक झाल्यावरती तक्रार नोंदणी करूनही पुढे काहीच होत नसल्याचे अनेकांचे म्हणणे आहे, यामुळे अर्ध्यापेक्षाही अधिक लोक आॅनलाईन फसवणूक झाल्यास पोलिस ठाण्यात येऊन तक्रार देखील नोंदवत नाहीत.

हे सुद्धा वाचा

सायबर क्राईम रोखण्यात पोलिसांना अपयश

सायबर क्राईममध्ये जरी मोठी वाढ होत असेल आणि गुन्हे देखील नोंद केले जात असतील तरीही तपास करण्यात पोलिसांना असंख्य अडचणी येत असल्याची वस्तुस्थिती आहे. किती मोठी फसवणुक सायबर क्राईममध्ये झाली तरीही त्या आरोपींना पकडण्यात पोलिसांना शक्यतो यश मिळत नाही. या गुन्ह्यांचा तपास करताना पोलिसांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. यामुळे नागरिकही शक्यतो आॅनलाईन पध्दतीने फसवणूक झाल्यास गुन्हा नोंद करणे टाळतात.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें