Corona | नाशिकमध्ये काळजाचा थरकाप उडवणारे मृत्यू तांडव; कोरोनाने आठवड्यात 29 बळी!

| Updated on: Feb 13, 2022 | 3:34 PM

एकीकडे कोरोना नाही म्हणून मास मुक्तीपर्यंतची चर्चा सुरू आहे. मात्र, दुसरीकडे नाशिकमध्ये मृत्यूसत्र पाहता, अजून धोका टळला नाही, याची जाणीव सतत होताना दिसतेय.

Corona | नाशिकमध्ये काळजाचा थरकाप उडवणारे मृत्यू तांडव; कोरोनाने आठवड्यात 29 बळी!
कोल्हापूरात कोरोनाचे रुग्ण
Image Credit source: TV9
Follow us on

नाशिकः एक अतिशय धक्कादायक आणि काळजाचा थरकाप उडवणारी बातमी. नाशिकमध्ये (Nashik) 6 फेब्रुवारी ते 12 फेब्रुवारी दरम्यान कोरोनामुळे (Corona) तब्बल 29 बळी (victim) गेल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे नाशिक जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत देण्यात येणाऱ्या आकडेवारीनुसार हे बळी गेल्याचे समोर आले. यातले 16 बळी हे नाशिक महापालिका क्षेत्रात गेलेत, तर 14 बळी हे नाशिकच्या ग्रामीण भागात गेल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे काल 12 फेब्रुवारी रोजी सुद्धा 5 जणांचा कोरोनाने मृत्यू झालाय. त्यात 3 रुग्ण नाशिक महापालिका क्षेत्रातील आहेत, तर उर्वरित 2 रुग्ण हे नाशिकच्या ग्रामीण भागातील आहेत. एकीकडे कोरोना नाही म्हणून मास मुक्तीपर्यंतची चर्चा सुरू आहे. मात्र, दुसरीकडे नाशिकमध्ये मृत्यूसत्र पाहता, अजून धोका टळला नाही, याची जाणीव सतत होताना दिसतेय.

आजचा अहवाल काय?

नाशिक जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज 13 फेब्रुवारी रोजी प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील 4 लाख 63 हजार 752 कोरोना बाधितांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सद्यस्थितीत 1 हजार 751 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच उपचार सुरू असलेल्या रुग्णांमध्ये 229 ने घट झाली आहे. आत्तापर्यंत 8 हजार 870 रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा नोडल अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली आहे. मृतांमध्ये नाशिक ग्रामीणमधील 4 हजार 289, तर नाशिक महानगरपालिका क्षेत्रातील 4 हजार 91 रुग्णांचा समावेश आहे. मालेगाव महानगरपालिका क्षेत्रातून 364 व जिल्हा बाहेरील 126 मृत्यूंची नोंद झाली आहे.

सध्या कोठे आहेत रुग्ण?

सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांत नाशिक ग्रामीणमध्ये नाशिक 158, बागलाण 100, चांदवड 66, देवळा 60, दिंडोरी 136, इगतपुरी 44, कळवण 72, मालेगाव 57, नांदगाव 47, निफाड 189, पेठ 35, सिन्नर 151, सुरगाणा 98, त्र्यंबकेश्वर 72, येवला 101 असे एकूण 1 हजार 386 पॉझिटीव्ह रुग्णांवर ग्रामीण भागात उपचार सुरू आहेत. तसेच नाशिक महानगरपालिका क्षेत्रात 300, मालेगाव महानगरपालिका क्षेत्रात 12 तर जिल्ह्याबाहेरील 53 रुग्ण असून असे एकूण 1 हजार 751 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत जिल्ह्यात 4 लाख 74 हजार 373 रुग्ण आढळून आले आहेत. जिल्हयात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी नाशिक ग्रामीणमध्ये 96.78 टक्के, नाशिक शहरात 98.39 टक्के, मालेगावमध्ये 97.29 टक्के तर जिल्हा बाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण 97.83 टक्के आहे. तसेच जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण 97.76 टक्के इतके आहे.


असे सुरूय मृत्यू सत्र…

06 फेब्रुवारी रोजी कळवलेले मृत्यू – 04

– नाशिक मनपा – 02
– मालेगाव मनपा – 00
– नाशिक ग्रामीण- 02
– जिल्हा बाह्य- 00

07 फेब्रुवारी रोजी कळवलेले मृत्यू – 05

– नाशिक मनपा – 03
– मालेगाव मनपा- 00
– नाशिक ग्रामीण- 02
– जिल्हा बाह्य – 00

08 फेब्रुवारी रोजी कळवलेले मृत्यू – 03

– नाशिक मनपा – 02
– मालेगाव मनपा- 00
– नाशिक ग्रामीण- 01
– जिल्हा बाह्य – 00

09 फेब्रुवारी रोजी कळवलेले मृत्यू – 03

– नाशिक मनपा – 01
– मालेगाव मनपा – 00
– नाशिक ग्रामीण – 02
– जिल्हा बाह्य – 00

10 फेब्रुवारीरोजी कळवलेले मृत्यू – 04

– नाशिक मनपा – 02
– मालेगाव मनपा – 00
– नाशिक ग्रामीण – 02
– जिल्हा बाह्य – 00

11 फेब्रुवारी रोजी कळवलेले मृत्यू – 05

– नाशिक मनपा – 03
– मालेगाव मनपा – 00
– नाशिक ग्रामीण – 02
– जिल्हा बाह्य – 00

12 फेब्रुवारी रोजी कळवलेले मृत्यू – 05

– नाशिक मनपा – 03
– मालेगाव मनपा – 00
– नाशिक ग्रामीण – 02
– जिल्हा बाह्य – 00

इतर बातम्याः

महाराष्ट्राचा महापिता कर्नाटकाच्या मातीत एकाकी, समाधीवर साधे छप्परही नाही; पानिपतकारांच्या डोळ्यांत पाणी, पोटात गोळा!

Kumar Vishvas Birth Day Special | सृजन का बीज हूँ, जाया हो नही सकता, 10 वर्ष राजकारण, हजारो वर्ष कविता!!

Lata Mangeshkar | चैतन्याची परी, सांध्यपर्वातील वैष्णवी, हृदयामधल्या निशिगंधाचे फूल; लतादीदींच्या आठवणींचा मोहक कोलाज!