दुचाकीने भरलेले कंटेनर पेटले; नाशिकमध्ये नव्या कोऱ्या 20 इलेक्ट्रिक बाइकचे उरले सांगाडे

पाथर्डी फाटा येथील उड्डाणपुलाच्या बोगद्याजवळ वाहन विक्रीची विविध दुकाने आहेत. त्यापैकी जितेंद्र ई-व्ही नावाच्या दुकानात चाळीस इलेक्ट्रिक दुचाकीचे घेऊन एक कंटेनर आले होते. यावेळी दुचाकी उतरणव्यापूर्वीच कंटेनरमधून धुराचे लोट बाहेर पडू लागले. त्यामुळे भयभित झालेल्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळावरून पळ काढला.

दुचाकीने भरलेले कंटेनर पेटले; नाशिकमध्ये नव्या कोऱ्या 20 इलेक्ट्रिक बाइकचे उरले सांगाडे
नाशिकमध्ये कंटेनरला लागलेल्या आगीत वीस दुचाकी जळून खाक झाल्या.
Follow us
| Updated on: Apr 10, 2022 | 12:46 PM

नाशिकः नाशिकमधील (Nashik) पाथर्डी फाट्याजवळ दुचाकीने भरलेल्या कंटेनरला आग (Fire) लागून 20 इलेक्ट्रिक बाइक (electric bike) भस्मसात झाल्याची घटना घडलीय. कंटेनर लोड करताना हा अपघात झाला. कंटेनरमध्ये एकूण 40 दुचाकी ठेवण्यात आल्या होत्या. त्यातील वीस दुचाकी या बाहेर काढण्यात यश आले, पण उर्वरित दुचाकी वाचवता आल्या नाहीत. आग लागल्याची माहिती मिळताच सिडको आणि अंबड एमआयडीसीच्या अग्निशन बंबांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी तासाभरात आग नियंत्रणात आणली. या घटनेत जवळपास पन्नास लाखांचे नुकसान झाल्याचे समजते. मात्र, ही आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अजून तरी समजलेले नाही. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली. ही आग पाहण्यासाठी बघ्यांनीही मोठी गर्दी केली.

बघ्यांची तोबा गर्दी

पाथर्डी फाटा येथील उड्डाणपुलाच्या बोगद्याजवळ वाहन विक्रीची विविध दुकाने आहेत. त्यापैकी जितेंद्र ई-व्ही नावाच्या दुकानात चाळीस इलेक्ट्रिक दुचाकीचे घेऊन एक कंटेनर आले होते. यावेळी दुचाकी उतरणव्यापूर्वीच कंटेनरमधून धुराचे लोट बाहेर पडू लागले. त्यामुळे भयभित झालेल्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळावरून पळ काढला. घटनास्थळावर बघ्यांची तोबा गर्दी झाली. हे पाहता पोलिसांनी हे कंटनेर मोकळ्या जागेवर न्यायला लावले.

आग लागली कशी?

कंटेनर मोकळ्या जागेत नेल्यानंतर अग्निशमन दलाच्या बंबांनी पाण्याचा मारा केला. त्यानंतर एकामागून एक दुचाकी काढण्यात आल्या. यात नव्या कोऱ्या वीस दुचाकींचा जळून कोळसा झाल्याने त्यांचे केवळ सांगाडे शिल्लक होते. तर उर्वरित वीस दुचाकी सुस्थितीत असल्याचे समजते. एखाद्यावेळेस रात्री अशी दुर्घटना घडली असती, तर जास्त नुकसान झाले असते. मात्र, ही आग कशामुळे लागली हे अजून तरी समोर आलेले नाही.

आग लागण्याची नेमकी कारणे काय?

सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे जेव्हा इंधन, ऑक्सिजन आणि उष्णता या तिन्ही गोष्टी एकत्र येतात तेव्हा आग तयार होते. अशात थंडीत मात्र हवेत गारवा असतो. पण तरीदेखील आगीच्या घटना समोर येणे ही चिंतेची बाब आहे.

 जंगलांमध्ये झाडांना आग लागणे हे नैसर्गिक असून शकते. इथे झाडे आणि फांद्यामध्ये घर्षण झाल्याने उष्णता निर्माण होते आग लागते.

 घरात जर आग लागली तर त्याचं कारण निष्काळजीपणा असून शकतो. गॅस चालू असणं, वीजेचा शॉक सर्कीट होणं, स्टोव्हचा वापर यामुळे आग लागण्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत.

 पेट घेणारी रसायने, पेट्रोलियम पदार्थ, विजेंच्या तारांची चुकीच्या पद्धतीने मांडणी केली तरीदेखील आग पेटते. सध्या मोठ्या प्रमाणात सॅनिटायझरचा वापर केला जातो. थंडीत आग लागण्याचे हे मुख्य कारण असू शकते.

 एखाद्या घरात , कंपनीत किंवा इतर कुठेही पेट घेणाऱ्या वस्तू अस्तव्यस्त पडल्या असतील आणि त्याचा आगीशी संबंध आला तर त्याने मोठे आगीचे लोळ पसरतात.

 अशात सिगारेट ओढून कुठेही फेकणे, सार्वजनिक ठिकाणी ती न विझवता फेकण्यामुळे अनेक आगीच्या घटना घडल्याचे समोर आले आहे. फटाक्यांच्या वापरामुळेही आग लागते. इतर बातम्याः

Special Report | देशातल्या सर्वात मोठ्या लेखकाची ख्यातनाम प्रकाशकांकडून लूट; कोण फोडणार पुस्तकांचा तुरुंग?

Kumar Vishvas Birth Day Special | सृजन का बीज हूँ, जाया हो नही सकता, 10 वर्ष राजकारण, हजारो वर्ष कविता!!

Lata Mangeshkar | चैतन्याची परी, सांध्यपर्वातील वैष्णवी, हृदयामधल्या निशिगंधाचे फूल; लतादीदींच्या आठवणींचा मोहक कोलाज!

Non Stop LIVE Update
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी.
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड.
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा.
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक.
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा.
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?.