AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nashik leopard rescue video: बिबट्याला वनविभागाचे जीवदान; पिंजरा विहिरीत सोडून केली सुटका!

नाशिक जिल्ह्यामध्ये विहिरीत पडलेल्या बिबट्याला वाचवण्यात वनविभागाला (Forest Department) यश मिळाले आहे. नाशिक तालुक्यातल्या गिरणारेजवळच्या वाडगावमध्ये ही घटना घडली. येथे भक्ष्याच्या शोधात फिरताना बिबट्या विहिरीत पडला होता. त्याची वर येण्यासाठी जीवाच्या आकांताने धडपड सुरू होती.

Nashik leopard rescue video: बिबट्याला वनविभागाचे जीवदान; पिंजरा विहिरीत सोडून केली सुटका!
नाशिकमध्ये विहिरीत पडलेल्या बिबट्याला वाचवण्यात आले.
| Edited By: मनोज कुलकर्णी | Updated on: Apr 21, 2022 | 4:48 PM
Share

नाशिकः नाशिकमध्ये (Nashik) बिबट्या (leopard) आणि मानव संघर्ष नवा नाही. गेल्या वर्षात तर अशा अनेक घटना घडल्या. घरातल्या अंगणात खेळणाऱ्या बाळाला उचलून पळणाऱ्या बिबट्याशी दोन हात करणारी आई तुम्हाला इथेच दिसली. जोडीला थेट गावात घुसून गावकऱ्यांवर हल्ला करणारा बिबट्याचा थरारही जिल्ह्याने अनुभवला. मात्र, आज घडलेली घटना थोडी वेगळीय. नाशिक जिल्ह्यामध्ये विहिरीत पडलेल्या बिबट्याला वाचवण्यात वनविभागाला (Forest Department) यश मिळाले आहे. नाशिक तालुक्यातल्या गिरणारेजवळच्या वाडगावमध्ये ही घटना घडली. येथे भक्ष्याच्या शोधात फिरताना बिबट्या विहिरीत पडला होता. त्याची वर येण्यासाठी जीवाच्या आकांताने धडपड सुरू होती. मात्र, विहिरीत पाणीही होते. विहिरीची खोलीही कमीत कमी पन्नासेक फूट सहज असेल. मात्र, बिबट्या विहिरीत पडल्याचे समजताच नागरिकांनी वनविभागाला कळवले. त्याला बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू झाले. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी एक पिंजरा आणला. तो दोरी लावून आत सोडला. पिंजरा विहिरीत आल्यानंतर बिबट्याने त्यात हळूच उडी मारली. या पिंजऱ्याला पुन्हा दोरीच्या सहाय्याने विहिरीबाहेर काढण्यात आले. या घटनेमुळे एका बिबट्याचा आज जीव वाचलाय.

हिंस्त्र प्राणी शहराकडे

बिबट्यासारखा हिंस्त्र प्राणी वारंवार गाव आणि शहराकडे धाव घेण्याचे प्रमाण गेल्या काही वर्षांत वाढले आहे. मानवाने प्राण्यांचा अधिवास बळकावला. जंगलांची अक्षरशः कत्तल केली. त्यामुळे पर्यावरणाचे संतुलन बिघडले आहे. पर्जन्य चक्रात प्रचंड बदल झाले आहेत. एकाचवेळी अतिवृष्टी आणि एकाचवेळी दुष्काळाचा अनुभव आपण घेत आहोत. निसर्गाला ओरबाडने मानवाने थांबवले नाही, तर यापेक्षा भयंकर परिणामांना सामोरे जावे लागेल, असा इशारा पर्यावरण तज्ज्ञ देत आहेत. इतर बातम्याः

Special Report | देशातल्या सर्वात मोठ्या लेखकाची ख्यातनाम प्रकाशकांकडून लूट; कोण फोडणार पुस्तकांचा तुरुंग?

Mirza Ghalib | जगण्याचं तत्वज्ञान मलमली भाषेत सांगणाऱ्या असदुल्लाह-ख़ाँ-‘ग़ालिब’ का पता…!

महाराष्ट्राचा महापिता कर्नाटकाच्या मातीत एकाकी, समाधीवर साधे छप्परही नाही; पानिपतकारांच्या डोळ्यांत पाणी, पोटात गोळा!

Follow Us
ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याची मागणी; जंतर-मंतरवर आंदोलन चिघळलं
Delhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याची मागणी; जंतर-मंतरवर आंदोलन चिघळलं, पोलिसांकडून आंदोलकांना...
शिवाजी पार्कमध्ये CJPचं आंदोलन; स्थानिक संतापले, इथे आंदोलन नको म्हणत
Mumbai : शिवाजी पार्कमध्ये CJPचं आंदोलन; स्थानिक संतापले, इथे आंदोलन नको म्हणत....
पाण्यातील खड्ड्यांचा इशारा दुर्लक्षित केला अन् अनर्थ घडला; दिवेआगरच्या
Diveagar Beach Raigad : पाण्यातील खड्ड्यांचा इशारा दुर्लक्षित केला अन् अनर्थ घडला; दिवेआगरच्या समुद्रात 8 मुलांचा दुर्दैवी अंत
मीनाक्षी शिंदे म्हणजे ठाण्याची लेडी डॉन...; राऊतांचा शिंदेंवर निशाणा
Sanjay Raut : मीनाक्षी शिंदे म्हणजे ठाण्याची लेडी डॉन...; राऊतांचा मीनाक्षी शिंदेंवर थेट निशाणा
कपडे बदलतात तसं पक्ष बदलता....; रोहित पवारांचा नेमका कोणावर निशाणा?
Rohit Pawar : कपडे बदलतात तसं पक्ष बदलता....; रोहित पवारांचा नेमका कोणावर निशाणा?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणातील दोन शूटर जेरबंद, मुख्य सूत्रधार अद्यापही...
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणातील दोन शूटर जेरबंद, मुख्य सूत्रधार अद्यापही फरार...
ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याची मागणी; दिल्लीत आंदोलनाचा भडका....
Delhi Protest : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याची मागणी; दिल्लीत आंदोलनाचा भडका, इंटरनेट सेवा बंद
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदी
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदीतील खाजगी क्लासची सहल
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT स्थापन, 23 अधिकारी...
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे यांच्या घराबाहेर...