भोंगळ कारभाराचं उत्तम उदाहरण..; राज्य परिवहनच्या या अशा पराक्रमानं एकाचा तरी जीव राहिल का..?

महामंडळाच्या नादुरुस्त बसमुळे प्रवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागतो परंतु एक्सलेटरचा पेंडल तुटल्यानंतर दोरीचा वापर करून बस चालवल्याने नागरिकांना आपला जीव मुठीत धरून लाल परीचा आनंददायी प्रवास हृदयात धडधडत करणारा करावा लागला

भोंगळ कारभाराचं उत्तम उदाहरण..; राज्य परिवहनच्या या अशा पराक्रमानं एकाचा तरी जीव राहिल का..?
| Edited By: | Updated on: Apr 20, 2023 | 11:38 PM

इगतपुरी : राज्य परिवहन महामंडळाच्या पुन्हा एकदा भोंगळ कारभार नादुरुस्त बसच्या माध्यमातून समोर आला आहे. प्रवासामध्ये एक्सलेटरचा पेंडल तुटल्याने प्रवाशांनी आपला जीव मुठीत धरून प्रवास केला आहे. ही अंगावर शहारे आणणारी घटना एका प्रवाशाने आपल्या मोबाईलमध्ये कैद केली असून या घटनेचा धक्कादायक व्हिडीओ आता समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. कल्याण जवळच्या विठ्ठलवाडी आगारातून अंबळनेरच्या दिशेने निघालेल्या एसटीचा कसारा घाटात एक्सलेटरचा पेंडल तुटला यामुळे दोरीच्या सहाय्याने गाडी कंट्रोल करण्यात आली.

चालकाने हातात स्टेअरिंग घेऊन गाडी चालवली तर कंडक्टरन एक्सलेटरची दोरी हातात पकडून नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला.

नाशिकपर्यंत चालक आणि वाहकाने अशाच स्थितीत गाडी चालवत आणली होती. मेकॅनिकच्या सहाय्याने ही बस दुरुस्त करण्याचादेखील प्रयत्न केला गेला पण बस दुरुस्त झाली नाही दुपारच्या सुमारास नाशिकला पोहोचली. आता इथून दुसरी बस उपलब्ध करून देण्यासाठी चालक आणि वाहक प्रयत्न करत होते. या प्रकारामुळे परिवहन महामंडळ नागरिकांच्या जीवाशी खेळत असल्याचा हा धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे

एकीकडे राज्य सरकार महामंडळाच्या बसेस निर्णय वेगवान महाराष्ट्र गतिमान अशी जाहिरात करत आहे परंतु दुसरीकडे महामंडळाच्या बसची अशी दयनीय दुरावस्था असल्यामुळे प्रवाशांना आपला जीव मुठीत धरून बसने प्रवास करावा लागत आहे.

अनेक वेळा महामंडळाच्या नादुरुस्त बसमुळे प्रवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागतो परंतु एक्सलेटरचा पेंडल तुटल्यानंतर दोरीचा वापर करून बस चालवल्याने नागरिकांना आपला जीव मुठीत धरून लाल परीचा आनंददायी प्रवास हृदयात धडधडत करणारा करावा लागला या संपूर्ण प्रकारामुळे प्रवाशांनी संताप व्यक्त केला आहे.