मुलींचे अपहरण करून विक्री करणाऱ्या टोळीला पकडण्यात ओझर पोलिसांना यश, दोन महिन्यात तब्बल 2 मुलींचे केले होते अपहरण…

मुलींचे अपहरण करणाऱ्या टोळीला पकडण्यात ओझर पोलिसांना यश मिळालयं. विशेष म्हणजे या टोळीला महाराष्ट्रातून नाही तर गुजरात आणि मध्यप्रदेश येथून अटक करण्यात आलीयं. ओझरमध्ये 2 महिन्यात 2 मुलींचे अपहरण झाल्याने एकच खळबळ उडाली होती.

मुलींचे अपहरण करून विक्री करणाऱ्या टोळीला पकडण्यात ओझर पोलिसांना यश, दोन महिन्यात तब्बल 2 मुलींचे केले होते अपहरण...
| Edited By: | Updated on: Aug 02, 2022 | 9:59 AM

नाशिक : ओझरमध्ये (Ojhar) गेल्या काही दिवसांपासून मुलींच्या अपहरणाच्या घटना सातत्याने घडत होत्या. लहान मुलींचे अपहरण करून परराज्यात विकणारी टोळी ओझरमध्ये सक्रिय झाली होती. यामुळे पोलिसांचे (Police) धाबे दाणाणले होते. मात्र, आता मुलींचे अपहरण करणाऱ्या टोळीला पकडण्यात पोलिसांना मोठे यश आलंय. नाशिक ग्रामीण पोलिसांनी ही मोठी कारवाई केलीयं. पोलिसांनी चार आरोपींना पकडले असून यामध्ये दोन महिला तर दोन पुरूषांचा समावेश आहे. धक्कादायक (Shocking) बाब म्हणजे यामध्ये ओझर शहरातील एका महिलेचा देखील समावेश आहे.

मुलींचे अपहरण करणाऱ्या टोळीला पकडण्यात ओझर पोलिसांना मोठे यश

मुलींचे अपहरण करणाऱ्या टोळीला पकडण्यात ओझर पोलिसांना यश मिळालयं. विशेष म्हणजे या टोळीला महाराष्ट्रातून नाही तर गुजरात आणि मध्यप्रदेश येथून अटक करण्यात आलीयं. ओझरमध्ये 2 महिन्यात 2 मुलींचे अपहरण झाल्याने एकच खळबळ उडाली होती. ओझरमधील एक महिला पैशांसाठी हे सर्व करत असल्याचे पुढे आलंय. ओझर पोलीस गुन्हे शोध पथकाने आरोपींना अटक केलीयं. अजून काही महत्वाची माहिती या आरोपींकडून मिळण्याची शक्यता वर्तवली जातंय.

मुलींचे अपहरण करणाऱ्या टोळीमध्ये ओझर शहरातील महिलेचाच समावेश

पोलिसांकडून या ऑपरेशनला मुस्काान असे नाव देण्यात आले. अल्पवयीन मुलींना फूस लावून विकणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात ओझर पोलिसांना यश मिळालयं. ज्या मुलींचे अपहरण करण्यात आले त्यासर्व दहा ते बारा वयोगटातील मुली आहेत. आरोपींनी पंचवटी, सातपूर, फुलेनगर इथल्या मुलींना फूस लावून पळवून नेण्याची कबुली देखील दिलीयं. ओझर गुन्हे शोध पथक पाच दिवस गुजरात आणि मध्यप्रदेशमध्ये तळ ठोकून होते. शेवटी ऑपरेशन मुस्कानला यश मिळाले.