साहेब, तुमच्या सोईनुसार 2 तारखेला या, नाशिक पोलिसांची नारायण राणेंना विनंती

| Updated on: Aug 25, 2021 | 11:48 AM

अशी अपेक्षा आहे माननीय मंत्रिमहोदय 2 सप्टेंबरला येतील आणि तपास प्रक्रियेत सहभागी होतील. कधीही मुभा आहे, कधीही येऊ शकतात, सहकार्याची भूमिका अपेक्षित आहे, ते सहकार्य करत आहेत, त्यांचा आदर करतो, स्वागत करतो, असं नाशिक पोलीस आयुक्त दीपककुमार पांडे म्हणाले.

साहेब, तुमच्या सोईनुसार 2 तारखेला या, नाशिक पोलिसांची नारायण राणेंना विनंती
Narayan Rane_Nashik Police
Follow us on

नाशिक : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांना कानशिलात लगावण्याचं वक्तव्य करणारे केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांना जामीन मंजूर झाला आहे. महाड कोर्टाने (Mahad court) जामीन दिला असला तरी नाशिक पोलिसातही (Nashik Police) गुन्हा दाखल असल्याने, त्यांना नोटीस पाठवण्यात आली आहे. त्यानुसार 2 सप्टेंबरला नारायण राणे यांना नाशिक पोलिसांत हजेरी लावायची आहे. याबाबत आज नाशिक पोलीस आयुक्त दीपककुमार पांडे यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली.

अशी अपेक्षा आहे माननीय मंत्रिमहोदय 2 सप्टेंबरला येतील आणि तपास प्रक्रियेत सहभागी होतील. कधीही मुभा आहे, कधीही येऊ शकतात, सहकार्याची भूमिका अपेक्षित आहे, ते सहकार्य करत आहेत, त्यांचा आदर करतो, स्वागत करतो, असं नाशिक पोलीस आयुक्त दीपककुमार पांडे म्हणाले.

नाशिक पोलीस आयुक्त काय म्हणाले?

सायबर पोलीस स्टेशन नाशिकमध्ये गुन्हा नोंद झाला होता. त्यासंदर्भात नारायण राणे साहेबांना रत्नागिरी संगमेश्वरमध्ये अटक झाली. त्यानंतर रायगड पोलीस ताब्यात घेऊन गेले. महाड येथे गुन्हा दाखल झाल्याने कोर्टात दाखल केले. सुनावणी काल उशिरापर्यंत चालली. न्यायालयाने जामीन दिला. त्यानंतर नाशिक पोलिसांनी अटकेची भूमिका बदलली. केंद्रीय मंत्री नारायण राणे साहेबांना दोन सप्टेंबर रोजी दुपारी 12 च्या आत पोलिसात येऊन जबाब नोंदवण्याची विनंती केली आहे. ती त्यांनी स्वीकारली आहे.

अशी अपेक्षा आहे माननीय मंत्रिमहोदय 2 सप्टेंबरला येतील आणि तपास प्रक्रियेत सहभागी होतील.

राणेसाहेब कधीही येऊ शकतात

कधीही मुभा आहे, कधीही येऊ शकतात, सहकार्याची भूमिका अपेक्षित आहे, ते सहकार्य करत आहेत, आदर करतो, स्वागत करतो, असं नाशिक पोलीस आयुक्त दीपककुमार पांडे म्हणाले.

सायबर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवला आहे. त्याच्या संदर्भात जे कोणी व्यक्ती आहेत, त्यांचा जबाब नोंदवला जातो. पुरावे सादर करण्यासाठी मुभा दिली जाते. मंत्रिमहोदयांना २ सप्टेंबरची तारीख दिली आहे. ती त्यांनी स्वीकारली आहे.. साहेब तुम्ही या आणि तुमचा जबाब नोंदवा.

समजपत्र दिलं आहे, सहकार्य न झाल्यास काय कारवाई होऊ शकते हे राणेंना दिलं आहे. त्यावर त्यांनी स्वाक्षरीही केली आहे. सध्याची जी परिस्थिती आहे त्यावर समाधानी आहे, असं दीपककुमार पांडे म्हणाले.

फडणवीसांनी आक्षेप घेतला, नाशिक पोलीस छत्रपती आहेत का? त्यावर दीपककुमार म्हणाले

माजी मुख्यमंत्री साहेब ते खूप सज्ञान आहेत, त्यांचा कायद्याचा अभ्यास आहे, त्यांना काही चॅलेंज नाही. माझं थोडं ज्ञान आहे, माझी शिकवण आहे, त्यानुसार आदेश काढला, जर तो चुकीचा असेल, संविधानाच्या २३६,२३७ खाली न्यायालयात जाऊन क्रॉस करु शकतात. मी माझ्या आदेशावर ठाम आहे, न्यायसंगत आहे. मात्र काल राणे साहेबांना जामीन मंजूर झाला, साहेबांनाी लिहून दिलं आहे अशी पुनरावृत्ती होणार नाही, म्हणून अटक करण्याचा अर्थ नाही, त्यामुळे मंत्रिमहोदयांना नोटीस देऊन पूर्तता केली, असं नाशिक पोलीस आयुक्त दीपककुमार पांडे म्हणाले.

कारवाईदरम्यान शिस्त पाळली

प्रोटोकॉलनुसार, मंत्रिमहोदयांशी आदरपूर्वक वागलं पाहिजे, शिस्त पाळली पाहिजे, ते पाळण्यात आलं. कोणतीही हयगय झालेली नाही. मंत्रिमहोदयांचा पूर्ण आदर सन्मान झाला, यापुढेही करु, असं पांडेंनी सांगितलं.

कारवाईवर समाधानी

राणेंना अटक करण्याची कॉम्पिटिशन नव्हती. दोन संविधानिक व्यक्तींमध्ये वाद झाला होता, या गोष्टीची पुनरावृत्ती होऊ नये, समाजात तेढ निर्माण होऊ नये, यासाठी अटकेचे आदेश दिले होते. साहेबांनी कोर्टात लिहून दिलं आहे, पुनरावृत्ती होणार नाही, त्यानंतर अटकेची कारवाई बदलली. आमच्या पथकाने योग्य कारवाई केली, त्यावर मी समाधानी आहे.

नारायण राणेंना जामीन हा महाड कोर्टाकडून त्या खटल्यात मिळाला आहे. आमच्या केसमध्ये अजून अटकेची कारवाई झालेली नाही. आम्ही फक्त २ सप्टेंबरला हजर राहून तपासात सहकार्य करण्याची विनंती केली आहे. त्यांनी ते स्वीकारलं आहे. मी या कारवाईबाबत समाधानी आहे, असंही दीपककुमार पांडे यांनी नमूद केलं.

VIDEO : नाशिक पोलीस आयुक्त दीपक पांडे यांची पत्रकार परिषद

संबंधित बातम्या 

राणे म्हणाले, तुम्ही राष्ट्रपती की पंतप्रधान, आता नाशिक पोलीस आयुक्त म्हणतात, ते कोर्टात सांगा!

देवेंद्र फडणवीस म्हणाले, नाशिक पोलीस आयुक्त छत्रपती आहेत का? आता पोलीस आयुक्तांकडून उत्तर

Narayan Rane : जामीन मिळताच नारायण राणेंना दुसरा धक्का, नाशिक पोलिसांकडून नोटीस जारी